तिस्क, उसगाव येथे स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद
फोंडा, ३० नोव्हेंबर – हिंदु जनजागृती समिती आणि तिस्क-उसगाव येथील हिंदवी स्वराज्य संघटना यांनी विश्रांती सभागृह, तिस्क-उसगाव येथे संयुक्तपणे आयोजित केलेल्या एक दिवसाच्या स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्गाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वर्गाला हिंदवी स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी श्री. सौरभ आमले, हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक सत्यविजय नाईक, सौ. सुमेधा नाईक, श्री. अर्जुन खरात आणि कु. सुरभी छत्रे यांची उपस्थिती होती.
यामध्ये स्वसंरक्षणासंबंधी विविध प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली. स्वसंरक्षण आणि राष्ट्र अन् धर्म यांचे रक्षण करणे यांसाठी, तसेच मनुष्यातील शारीरिक आणि मानसिक दुर्बलता घालवून त्याच्यातील सुप्त शक्ती जागृत करण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरांचे ठिकठिकाणी आयोजन केले जाते.
आपला नम्र,
डॉ. मनोज सोलंकी,
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक :