म्हार्दाेळ येथे १० डिसेंबर या दिवशी होणार्‍या राज्यस्तरीय मंदिर परिषदेच्या प्रचाराला जोर*

.

 

दिनांक : ३०.११.२०२३

*म्हार्दाेळ येथे १० डिसेंबर या दिवशी होणार्‍या राज्यस्तरीय मंदिर परिषदेच्या प्रचाराला जोर*
फोंडा, ३० नोव्हेंबर – म्हार्दाेळ येथील श्री महालसा देवस्थान, गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी रविवार, १० डिसेंबर २०२३ या दिवशी म्हार्दाेळ येथील श्री महालसा मंदिर परिसरातील सिंहपुरुष सभागृहात गोवा राज्यस्तरीय मंदिर परिषदेचे आयोजन केले आहे. मंदिरांचे सुव्यवस्थापन करणे आणि मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे या हेतूने या मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला गोव्यातील समस्त मंदिरांचे विश्वस्त आणि पुरोहित सहभागी होणार आहेत. या परिषदेच्या प्रचाराला राज्यभरातून चांगला प्रतिसाद लाभत आहे.
हिंदु जनजागृती समिती व गोमंतक मंदिर महासंघ यांच्या शिष्टमंडळाने नुकतेच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना गोवा राज्यस्तरीय मंदिर परिषदेला उपस्थित रहाण्याविषयी निमंत्रण दिले. मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी मंदिर परिषदेला उपस्थिती लावण्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीचे उत्तर गोवा समन्वयक श्री. गोविंद चोडणकर, आदींचा प्रमुख सहभाग होता. गोवा राज्यस्तरीय मंदिर परिषदेच्या निमंत्रणाच्या अनुषंगाने हिंदु जनजागृती *समितीचे* शिष्टमंडळ वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर, कला आणि संस्कृती मंत्री श्री. गोविंद गावडे, आदी मंत्रीगण तथा लोकप्रतिनिधी, तसेच राज्यभरातील मंदिरांचे विश्वस्त यांच्या गाठीभेटी घेत आहेत. परिषदेच्या प्रचाराच्या अनुषंगाने राज्यात ठिकठिकाणी मंदिरांचे विश्वस्त, भक्तगण आदींच्या बैठका घेतल्या जात आहेत.

आपले विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक – ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar