*स्कोडा ऑटो इंडियाकडून कुशक व स्लाव्हियासाठी ऑल-न्यू डीप ब्लॅक रंगामध्ये एलीगन्स एडिशन्स लाँच*
मुंबई, नोव्हेंबर २७, २०२३ – कुशक व स्लाव्हियामध्ये अनेक नवीन आणि सेगमेंट-फर्स्ट वैशिष्ट्ये सादर केल्यानंतर स्कोडा ऑटो इंडियाने या दोन्ही कार्सच्या नवीन, खास व्हर्जनची घोषणा केली आहे. एलीगन्स एडिशन नावाच्या या दोन्ही कार्स मर्यादित प्रमाणात उत्पादित करण्यात येतील आणि विशेषत: १.५ टीएसआय इंजिनसह उपलब्ध असतील.
नवीन प्रॉडक्ट अॅक्शनबाबत मत व्यक्त करत स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रॅण्ड संचालक पीटर सोलक म्हणाले, ”कुशक व स्लाव्हियाचे एलीगन्स एडिशन लिमिटेड ऑफरिंग म्हणून लाँच करण्यात येईल. क्लासिक ब्लॅक रंगामधील कुशक व स्लाव्हियासाठी प्रबळ मागणी आहे. आमच्या सर्व उत्पादन कृती सर्वसमावेशक ग्राहक ट्रेण्ड्सवर आधारित आहेत, तसेच आमच्या ग्राहक-केंद्रित दृष्टिकोनाशी संलग्न आहेत. नवीन एलीगन्स एडिशन्सची आकर्षकता, बॉडी कलर व कॉस्मेटिक पैलू डिझाइनला प्राधान्य देणाऱ्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेतील, तसेच व्यापक मूल्य व अभिमानास्पद मालकीहक्काचा अनुभव देत राहतील.”