गोदरेज कॅपिटल निर्माणने वाढवल्या सेवा; एमएसएमईच्या विकासाला मदत करण्यासाठी डीबीएस बँक इंडिया, व्हिसा आणि अॅमेझॉनसोबत भागीदारी

.

गोदरेज कॅपिटल निर्माणने वाढवल्या सेवा; एमएसएमईच्या विकासाला मदत करण्यासाठी डीबीएस बँक इंडिया, व्हिसा आणि अॅमेझॉनसोबत भागीदारी

गोदरेज कॅपिटलने त्यांच्या बिझनेस सोल्युशन प्लॅटफॉर्मचे ‘निर्माण’ असे व्यापक स्वरूप दिले असून, अनेकांशी भागीदारीर केली आहे.
भारतातील एमएसएमईंना अतिरिक्त लाभ देण्यासाठी १३ प्रतिष्ठित भागीदारांशी भागीदारी करून त्यांना ऑनबोर्ड केले गेले आहे.
निर्माणच्या वापरकर्त्यांना त्यांची उत्पादने भारत आणि जगभरातील ग्राहकांना दाखवण्याची आणि विकण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी, वेबसाइट निर्मिती, ओम्नी-चॅनल ऑर्डर मॅनेजमेंट आणि याशिवाय अनेक सेवा अॅमेझॉन देणार आहे.
डीबीएस बँक इंडिया निर्माणच्या वापरकर्त्यांसाठी विशेष वैशिष्ट्यांसह चालू खात्यांची सेवा देणार आहे.
डीबीएस-निर्माण-नेतृत्वातील बँकिंग उपक्रम सुलभ करण्यासाठी व्हिसा सेवा देणार आहे.
मुंबई, 30 नोव्हेंबर २०२३: भारतीय व्यवसायात १२५ वर्षांहून अधिक वर्षांचा समृद्ध इतिहास असलेला गोदरेज समूह एमएसएमईंना भेडसावणाऱ्या आव्हानांवर उत्तर शोधण्यास सज्ज आहे. कंपनीमध्ये ‘राष्ट्र-निर्माण’ची नीती रुजलेली आहे. गोदरेज ब्रँड भारतीय ग्राहकांच्या विश्वासाने मजबूत आहे. गोदरेज कॅपिटल आपल्या सहयोगी नेटवर्कचा लक्षणीय विस्तार करून त्याच्या निर्माण प्लॅटफॉर्मचा मोठा विस्तार करत आहे. डीबीएस बँक इंडिया, व्हिसा, अॅमेझॉन आणि यासारख्या इतर उद्योगातील दिग्गजांसह भागीदारी करून एमएसएमईंना विकासाच्या संधी प्रदान करण्यासाठी गोदरेज कॅपिटलची वचनबद्ध आहे. ही भागीदारी एमएसएमईंना सक्षम करण्यासाठी करण्यात आलेली आहे. विविध मूल्यवर्धित सेवा आणि त्यांच्या संपूर्ण व्यवसाय प्रवासात सर्वसमावेशक मदत करण्यासाठई ही भागीदारी आहे. कंपनी एमएसएमईंच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठीच निर्माणने १३+ भागीदारांचा समावेश करण्यासाठी आपले सहयोगी मॉडेल विस्तृत केले आहे.
एमएसएमईसाठी तीन महत्त्वाच्या क्षेत्रांभोवती फिरणाऱ्या विकासाला चालना देण्याचे उद्दिष्ट:
ग्राहक वर्गाचा विस्तार
ऑपरेशन्स सुरळीत करणे
कर्मचारी उत्पादकता वाढवणे
भागीदारीबद्दल बोलताना गोदरेज कॅपिटलचे एमडी आणि सीईओ डॉ, मनीष शाह म्हणाले, “निर्माणच्या माध्यमातून एमएसएमईंना वाढण्यास मदत करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला बळकटी देत, आमच्या भागीदार इकोसिस्टमचा विस्तार करताना आम्हाला आनंद होत आहे. एमएसएमईंना त्यांच्या व्यवसाय वाढीच्या प्रवासाचा एक भाग बनून कर्ज देण्यापलीकडे मदत करण्याचे आमचे ध्येय आहे. गोदरेज समुहाचे राष्ट्र-निर्माणचे ध्येय आहे. आमचा ठाम विश्वास आहे की, आमच्या भागीदारांद्वारे प्रदान केलेल्या सामूहिक वचनबद्धतेमुळे आणि सेवांमुळे, आम्ही भारताला ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी योगदान देऊ शकतो..”
या भागीदारीमुळे डीबीएस बँक इंडियाला चालू खात्यासह मूल्यवर्धित सेवां एमएसएमईंना देता येतील. निर्माणसोबत नोंदणीकृत व्यवसायांना अनेक लाभ मिळू शकतात. किमान सरासरी तिमाही शिल्लक नॉन-मेंटेनन्स फीवर १ वर्षाची सूट मिळे, कनेक्टेड बँकिंगसाठी टॅली ईआरपीसह अखंड एकत्रिकरण सेवा मिळेल, अत्यंत स्पर्धात्मक व्यापार आणि FX किंमत मिळेल, व्हिसाद्वारे समर्थित बिझनेस डेबिट कार्डची सुविधा मिळेल आणि एमएसएमईंसाठी सर्वांगीण आर्थिक सहाय्य प्रदान करणाऱ्या अनन्य भागीदार ऑफरही मिळेल.

भागीदारीवर टिप्पणी करताना डीबीएस बँक इंडियाच्या इन्स्टिट्यूशनल बँकिंग ग्रुपचे एमडी आणि हेड रजत वर्मा म्हणाले की, “आमच्या स्थानिक बाजाराच्या माहितीचा आणि व्यवसायातील सखोल जाणिवेचा उपयोग करून डीबीएस बँक इंडियाने गोदरेज कॅपिटल निर्माणसोबत एक नाविन्यपूर्ण सेवा तयार केली आहे. आम्ही निर्माणवर एमएसएमईसाठी फायद्यांचा एक विशेष ऑफर तयार केली आहे जो व्यवसाय वाढवण्यासाठी भागीदारांना चालू खात्याच्या प्रकारावर विशेष शुल्क-माफीद्वारे रोख प्रवाह मुक्त करण्यात मदत करेल. ही भागीदारी भारतातील एमएसएमईंना त्यांच्या वाढीच्या आकांक्षांना अनलॉक करण्यासाठी सक्षम बनवण्याची आमची वचनबद्धता अधोरेखित करते.”
व्हिसा ही कंपनी डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक आघाडीवर आहे. निर्मिती प्लॅटफॉर्मद्वारे एमएसएमईसाठी सर्वसमावेशक पेमेंट सोल्यूशन्स व्हिसा देणार आहे. त्याचे विस्तृत नेटवर्क आणि जागतिक पातळीवर विस्तार यामुळे डीबीएस बँक इंडियाच्या निर्माण वापरकर्त्यांसाठी खास तयार केलेल्या सेवांनाही व्हिसाचे सहकार्य असेल.

व्हिसाचे भारतातील व्यवसाय विकास प्रमुख आणि उपाध्यक्ष सुजय रैना म्हणाले, “भारतातील लहान व्यवसायांना सर्वसमावेशक पेमेंट सेवा देण्यासाठी गोदरेज कॅपिटल निर्माण आणि डीबीएस बँक इंडिया यांच्याशी सहकार्य करताना आम्हाला आनंद होत आहे. देशाच्या सामाजिक-आर्थिक आणि सर्वसमावेशक वाढीसाठी एमएसएमई महत्त्वाचे आहेत आणि व्हिसा त्यांना त्यांच्या समाधानांसह संधी आणि मूल्य अनलॉक करण्यात मदत करते. आम्ही DBS करंट अकाउंटला बिझनेस डेबिट कार्डसह सुविधा देत आहोत जे निर्माण वापरकर्त्यांसाठी खास तयार केलेले आहे, जे एमएसएमईंना अखंडपणे पेमेंटची सेवा देते, अशा प्रकारे त्यांना व्यवसाय प्राधान्ये आणि वाढीच्या अत्यावश्यकता पुढे नेण्यास सक्षम करते.”

अॅमेझॉनची निर्माणसोबतची भागीदारी एमएसएमईंना त्यांची उत्पादने Amazon.in वर देशभरातील ग्राहकांना प्रदर्शित करण्यास आणि त्यांची विक्री करण्यास मदत करेल. अॅमेझॉन ग्लोबल सेलिंग नावाच्या अॅमेझॉनच्या ई-कॉमर्स एक्सपोर्ट प्रोग्रामच्या तीन महिन्यांच्या सबस्क्रिप्शनसह जागतिक बाजारपेठांचे दरवाजेही त्यांच्यासाठी उघडतील. निर्माण वापरकर्ते मार्च 2024 पर्यंत अॅमेझॉनच्या स्मार्ट कॉमर्सकडून वेबसाइट निर्मिती आणि ओम्नी-चॅनल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सोल्यूशन्समध्ये विनामूल्य प्रवेशही मिळवू शकतील.

भागीदारीबद्दल बोलतान अॅमेझॉन इंडिया येथे विक्रेच्या सेलर अॅक्वाझिशन विभागाचे प्रमुख गौरव भटनागर म्हणाले, “निवड, मूल्य आणि सुविधा ही आमची तीन मूलभूत स्तंभ आहेत. त्यावर लक्ष केंद्रित करून सतत विकसित होत असलेल्या ग्राहकांसाठी MSMEs सोबत भागीदारी करण्यास अॅमेझॉन कटिबद्ध आहे. गोदरेज कॅपिटल निर्माण सोबतच्या आमच्या सहकार्याद्वारे, डिजिटलायझेशन आणि ई-कॉमर्सचे फायदे एमएसएमईना मिळवून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. त्यांची उत्पादने देशभरातील ग्राहकांना दाखविण्यासाठी आणि विकण्यासाठी आणि निर्यात संधींचा फायदा घेण्यासाठी ते अॅमेझॉनचा फायदा घेऊ शकतील. ते ओम्नी-चॅनल इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सोल्यूशन्सद्वारे त्यांचे दैनंदिन कामकाज डिजिटायझेशन करण्यास सक्षम होतील. आम्हाला विश्वास आहे की, अशा सहकार्यांमुळे एमएसएमईंना त्यांच्या ग्राहकांना सेवा देण्यात आणि त्यांच्या व्यवसायातील वृद्धी करण्यात मदत होईल.”
ऑनसेक्युरिटी, झॉल्विट आणि एमएसएमईएक्स या आधीच्या भागीदारांसह जेम टेक पारस, एस्क्रोपे, ग्रेएचआर आणि सेरापिस नॉलेज सोलुशन्स या नव्या भागीदारामुळे एमएसएमईंना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत होईल.

इकोसिस्टमचा विकास आणि भागीदारीद्वारे एकूण मूल्य निर्मितीवर लक्ष केंद्रित करून, भारतातील एमएसएमई क्षेत्राच्या उद्योजकीय आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी योगदान देणे हे गोदरेज कॅपिटल निर्माणचे उद्दिष्ट आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीस आणि राष्ट्र उभारणीत योगदान देणे हे अंतिम लक्ष्य आहे. हा प्लॅटफॉर्म केवळ कर्जाची सेवा देत नाही तर व्यवसाय वाढीच्या संधी, व्यवसाय सुलभता आणि ज्ञान आणि नेटवर्क मार्गांचा समावेश असलेल्या मूल्यवर्धित सेवाही प्रदान करतो.

About Godrej Capital:
Godrej Capital is the financial services arm of the Godrej Group. It is a subsidiary of Godrej Industries and is the holding company for Godrej Housing Finance & Godrej Finance. With a digital-first approach and a keen focus on customer-centric product innovation, Godrej Capital offers home loans, Loans Against Property, and business loans. It is positioned to diversify into other customer segments and products. The company is focused on building a long-term, sustainable retail financial services business in India, anchored on the Godrej Group’s 126-year legacy of trust and excellence. Godrej Capital focuses on learning and development across its employee base and is committed to diversity, equity, and inclusion as a guiding principle. Its entity, GHF, is Great Place to Work® Certified and was recognized by the Economic Times as the Best Organization for Women in 2022.
Godrej Capital currently has its footprint across Mumbai, Bangalore, Delhi, Pune, Ahmedabad, Surat, Indore, Chennai, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Alwar, Aurangabad, Baroda, Coimbatore, Jalandhar, Jodhpur, Kanchipuram, Mangalore, Salem, Ludhiana, Mysore, Nagpur, Nashik, Rajkot, Udaipur, Vapi, Vijayawada, Rangareddy, Vishakhapatnam, and Thane.

About Godrej Capital Nirmaan:
Godrej Capital Nirmaan, a first of its kind in the BFSI industry, is a digital platform that is set to empower Micro, Small, and Medium Enterprises (MSMEs) for sustainable growth. With its innovative approach, comprehensive partner offerings, and its esteemed partners, Nirmaan aims to transform the landscape of MSMEs, providing them with the tools and resources needed to thrive in today’s competitive business environment. Nirmaan has collaborated with Amazon, DBS Bank India, MSMEx, GreytHR, Serapiz, Escrowpay, Gem Tech Paras, Zolvit, and Onsurity among others. Through expert advising, efficient facilitation, and innovative financing solutions, Nirmaan aims to elevate MSMEs to new heights of growth and success. Carefully curated, Nirmaan with its partners provides services critical to the growth of MSMEs. The partners facilitated on Nirmaan platform engage with users through their own bespoke terms. For more details visit www.godrejcapitalnirmaan.com
To partner with Godrej Capital Nirmaan, write a mail to nirmaan.pconnect@godrejcapital.com

Godrej Capital PR
Mr. Anurag David
Corporate Communications
anurag.david@godrejinds.com
+91- 9322501136
Adfactors PR
Name
Official Email Id
Number

For more details, please feel free to reach out to:

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar