काशी-मथुरा मुक्त व्हावी’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

.
काशी-मथुरा मुक्त व्हावी’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय

       ओझर (जिल्हा पुणे) – मूर्ती तोडल्यामुळे देवतेचे अस्तित्व नष्ट होत नाही. देवता सूक्ष्मरूपाने त्याच ठिकाणी वास करतात. त्यामुळे ‘एकदा जे मंदिर बनते, ते सदैव मंदिरच रहाते’. काशी विश्वेश्वराचे मंदिर तोडून मंदिराच्या भग्नावशेषावर घुमट बांधून नमाजपठण केले जात आहे. या ठिकाणी असलेल्या श्री श्रृगांरदेवीच्या मंदिराचा दरवाजा बंद करण्यात आली आहे. सद्यस्थितीत केवळ वर्षातून एकदा या ठिकाणी हिंदूंना पूजेसाठी प्रवेश दिला जातो. हिंदूंची मंदिरे नियंत्रणात घेण्याचे हे षड्यंत्र आहे. या विरोधात आपला न्यायालयीन लढा चालू आहे. 16 मे 2022 या दिवशी या ठिकाणी ‘वजू अदा’ करण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे. या ठिकाणी केंद्रीय पुरातत्व विभागाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल 11 डिसेंबर 2023 या दिवशी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. काशी विश्वेश्वर मंदिराच्या अष्टमंडपात सर्व हिंदूंना पुन्हा पूजापाठ करण्याची वेळ लवकरच येईल. ‘काशी-मथुरा मुक्त व्हावी’, अशी छत्रपती शिवाजी महाराज यांची इच्छा होती. त्यामुळे काशी-मथुरा मुक्त करून पुन्हा सनातन धर्माला सोपवण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन काशी येथील ज्ञानवापीचा खटला लढवणारे सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले. ते ‘ज्ञानवापी, काशी, मथुरा येथील न्यायलयीन लढा आणि यश’, यावर श्री विघ्नहर सभागृहात आयोजित द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त बोलत होते.

या प्रसंगी अधिवक्ता संदीप जायगुडे म्हणाले, ‘‘अत्यंत प्राचीन असलेल्या नेवासा, नगर येथील श्री नारदमुनींच्या मंदिराच्या परिसरात ‘कबरी’ उभारून अतिक्रमण करून ते मंदिर ताब्यात घेण्याचा मुसलमानांचा प्रयत्न आहे. आता तेथील मंदिराच्या संपूर्ण भूमीवर ‘वक्फ’ने दावा केला आहे. आमच्याकडे असलेल्या पुराव्यांच्या आधारे या निर्णयाच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालयात स्थगिती मिळवली आहे.’’ सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले, ‘‘सनातन धर्म नष्ट व्हायला पाहिजे, सनातन धर्म एक रोगासारखा आहे’ अशी वक्तव्ये जाणीवपूर्वक केली जात आहेत. आज सनातन धर्माला संपवण्याची भाषा होत असेल, तर उद्या मंदिरांनाही संपवण्याची भाषा केली जाईल. त्यामुळे अशांचा संवैधानिक विरोध करण्यासाठी त्यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार करून सनातन धर्मरक्षणाचे पाऊल टाकूया !’’

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे म्हणाले, ‘‘उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी ‘हलाल जिहाद’च्या माध्यमातून चालू असणारे देशविरोधी षड्यंत्र रोखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. योगीजींनी घेतलेला हा निर्णय स्तुत्य आहे. कोट्यवधी रुपये देऊन ‘हलाल’ सर्टिफिकेट विकत घेणार्‍या इस्रायलने हमास आक्रमणाला प्रत्युत्तर दिले म्हणून इस्लामी संघटनांनी इस्रायलच्या उत्पादनांवर बहिष्कार करण्यास चालू केले. अमेरिकेतील मंदिरांनी हलाल जिहाद विरोधात जागृती करण्याचे कार्य चालू केले आहे, आपणही आपल्या मंदिरांतून जागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा.’’

याप्रसंगी ओझर येथील श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थानच्या वतीने अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा शाल आणि विघ्नहर श्री गणेशाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री. गणेश कवडे, विश्वस्त श्री. आनंदराव मांडे, भीमाशंकर देवस्थाचे अध्यक्ष श्री. सुरेश कौदरे उपस्थित होते. या प्रसंगी लेण्याद्री देवस्थाचे अध्यक्ष श्री. जितेंद्र बिडबई यांनीही अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचा सत्कार केला.

श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थानच्या संकेतस्थळाचे अनावरण !

या प्रसंगी श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थानच्या https://shreevighnaharganpatiozar.com या संकेतस्थळाचे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. सत्यशील शेरकर, अधिवक्ता श्री. विष्णु शंकर जैन, लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष श्री. जितेंद्र बिडवई, श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थानचे अध्यक्ष श्री. गणेश कवडे, सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव, तसेच अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले. 

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar