लोकोत्सवातून आदर्श भावना लोकांपर्यंत निर्माण होणारे एक विचारसरणीचे प्रदर्शन :सभापती रमेश तळवडकर

.

लोकोत्सवातून आदर्श भावना लोकांपर्यंत निर्माण होणारे एक विचारसरणीचे प्रदर्शन :सभापती रमेश तळवडकर


म्हापसा (न. प्र.):- लोकोत्सव ही सांस्कृतिक आणि सामाजिक विचारसरणीचे प्रदर्शन आहे. कार्यकर्त्यांच्या विश्वासावरत लोकोसो आणि श्रमदान संकल्पना यशस्वी होत आहे गोव्यातील नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांचे सत्कार करण्याचे कारण म्हणजे आदर्श युक्त सदभावना निर्माण व्हावी एवढेच आहेत.असे प्रतिपादन गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांनी बस्तोडा हळदोणा येथे आयोजित करण्यात आलेल्या आदर्श ग्राम युवा मंच या कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना काढले.
यावेळी त्यांच्या समवेत उपसभापती ज्योशूआ डिसोझा,निळकंठ हळर्णकर,उत्तर गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष दिक्षा कांदोळकर, सदस्य मनीषा नाईक, सरपंच सुभाष मोरजकर व पक्षाचे गटाध्यक्ष फ्रँकी कार्व्हालो उपस्थित होते. पुढे बोलताना हा सभापती तळवडकर म्हणाले की, आदर्श युवा संघ हा संघर्षातून निर्माण झालेली संघटना आहे याची जाणीव सर्वांना असावी त्याकरिता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावे आदर्श युवा एक स्वप्न होते ते म्हणजे संघटनेचे स्वतःची एक शाळा असावी आणि ते आज सत्यात उतरले आहे शाळेतील शिक्षक अनुशिक्षकांत कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात त्यामुळे विद्यालये विविध माध्यमातून यशोदा शिखरवर पोचली आहे. आम्ही सेनापती होऊन इच्छितो असेल तर त्यांच्यासारखे अनेक सैनिक असायला हवेत.
या कार्यक्रमा वेळी आम्हा सभापती हा रमेश तळवडकर,उपसभापती ज्योशुआ डिसोझा, मंत्री निळकंठ हळर्णकर, माजी आमदार ग्लेन टिकलो यांच्या हस्ते हा हळदोणा,म्हापसा, थिवी, पर्वरी या चार मतदारसंघांमध्ये सामाजिक,नाट्य,पत्रकारिता, संगीत इतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या आणि काम केलेल्या सुमारे शंभर मान्यवरांचे सत्कार शाल, व स्मृतिचिन्ह देऊन करण्यात आले.
सदरचा कार्यक्रम हळद होना मतदार संघातील बसतोडा येथील श्री सदपुरुष बांदेश्वर मंडप येथे करण्यात आला यावेळी लोकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समृद्धी गणपुले यांनी केले व त्यांनी शेवटी सर्वांचे आभार मानले.
फोटो :- गोवा राज्य विधानसभेचे सभापती रमेश तळवडकर सोबत उपसभापती ज्योशुआ डिसोझा,निळकंठ हळर्णकर, माजी आमदार ग्लेन टिकलो, उत्तर गोवा जिल्हा पंचायत उपाध्यक्ष दीक्षा कांदोळकर व सत्कारमूर्ती.(छाया :-प्रणव फोटो

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar