अमोल नावेलकर यांचे बहारदार गायन

.

अमोल नावेलकर यांचे बहारदार गायन

‘एक श्याम हेमंतकुमार और तलक मेहमूद के नाम‘ कार्यक्रमाचे सादरीकरण

पणजी, दि. ४ (प्रतिनिधी) :

पिळर्ण-बार्देश येथील उद्योजक, पर्रा येथील रहिवासी तथा संगीत क्षेत्रात अवलिया व्यक्तिमत्त्व असलेले रसिकाग्रणी गायक कलाकार अमोल नावेलकर यांचे बहारदार गायन ‘एक श्याम हेमंतकुमार और तलक मेहमूद के नाम‘ या कार्यक्रमाच्या अंतर्गत पणजी येथे झाले. हा कार्यक्रम त्यांनी इन्स्टिट्युट मिनेझीस ब्रागांझाच्या सहकार्याने आयएमबी सभागृहात सादर केला.

या कार्यक्रमात नावेलकर यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गाजलेली पुढीलप्रमाणे एकवीस गीते सादर केली. तुम पुकार लो (खामोशी), बेकरार करके हमे (बीस साल बाद), फीर वही श्याम (जहा आरा), छुपा लो यू दील में प्यार (ममता), ये रात ये चांदनी फीर कहा (जाल), जाये तो जाये कहा (टॅक्सी ड्राइव्हर), इतना ना मुझसे प्यार करो (छाया), ये नयन डरे डरे (कोहरा), अंधे जहान के अंधे रास्ते (पतिता), निंद ना मुझको आये (पोस्ट बॉक्स नंबर ९९९), जलते है जिसके लिये (सुजाता), आहा रिमझीम के ये प्यारे गीत (उसने कहा था), ना तूम हमे जानो (बात एक रात की), अै मेरे दील कही और चल (दाग), अै दील अब कही ले जा (ब्लफ मास्टर), लेहरों पे लेहर (छबिली), है अपना दील तो आवारा (सोलवा साल), तुम्हे याद होगा कभी हम मिले थे (सट्टा बाजार), न ये चांद होगा (शर्त), याद किया दील ने कहाँ हो तूम (युगुलगीत), जुलियाना मोगा मज्या जुलयाना (कोकणी कांतार).

युगुलगीतांच्या गायनासाठी नावेलकर यांना अनुष्का साळगावकर यांची साथसंगत लाभली. या संपूर्ण कार्यक्रमाचे संगीत संयोजन तथा दिग्दर्शन गोव्यातील नामवंत संगीतकार जीवन केरकर यांनी केले. ढोल व कोंगोवर शरद वाडकर, गितारवर विनोद पाटील (मुंबई), हँडसॉनिक व बोंगोवर सनम कोचकर, तर ऑक्टोपॅडवर प्रकाश पेडणेकर यांची संगीतसाथ त्यांना लाभली. या एकंदर कार्यक्रमाचे सुरेल सूत्रनिवेदन सिद्धी उपाद्धे यांनी केले.

अमोल नावेलकर यांनी सुमारे पस्तीस वर्षांनंतर जाहीररीत्या अशा स्वरूपाचा हा संगीत कार्यक्रम सादर केलेला आहे. सुमारे चाळीस वर्षांपूर्वी ते म्हापशातील हिंदी ऑर्केस्ट्राच्या स्वरूपातील एका वाद्यवृंदात गायन करायचे. त्या वाद्यवृंदाचे ते आघाडीचे गायक कलाकार होते. तसेच कोंगो, बोंगो व ढोलकीवादनही त्या वाद्यवृंदासाठी ते करायचे. शालेय तसेच महाविद्यालयीन स्तरावर गायनाची बक्षिसेही त्यांनी मिळवली आहेत. महाविद्यालयीन जीवनात असताना विद्यार्थी नेता म्हणूनही त्यांचा नावलौकिक होता. व्यावसायिक धर्तीवर त्यांनी ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून गायनाचे कार्यक्रम गोवाभर सादर केले होते. परंतु, स्वत:च्या व्यवसायामुळे त्या बाबतीत ते सातत्य राखू शकले नाहीत व त्यामुळे ते गेल्या सुमारे पस्तीस वर्षांपासून संगीत कार्यक्रमांच्या सादरीकरणाच्या पासून पूर्णत: अलिप्तच होते.

या कार्यक्रमाच्या एकंदर फलश्रुतीसंदर्भात बोलताना संगीत संयोजक जीवन केरकर म्हणाले, वास्तविक अमोल नावेलकर हे तसे व्यवसायिक गायक नाहीत. परंतु, त्यांना संगीताबद्दल खूप आवड व आत्मीयता आहे. त्यांना मी सर्वप्रथम वर्ष १९७४च्या आसपास गाताना पाहिले होते व त्यांना त्या गायनावेळी स्पर्धेतील पहिले बक्षीस मिळाले होते. त्यामुळे ते माझ्या आयुष्यातील ‘हीरो’ व त्यानंतर आवडते मित्र व स्नेही बनले. त्यानंतरच्या काळात ते म्हापशातील एका मोठ्या नामांकित वाद्यवृंदाचे घटक होते. परंतु, गेली सुमारे पस्तिसेक वर्षे ते स्वत:च्या व्यवसायामुळे ते संगीत क्षेत्रापासून दूर होते. त्यांची आवड मात्र कायम होती. गेल्या दोन महिन्यांपूर्वी ते माझ्या घरी आले व या कार्यक्रमाचे सादरीकरण करण्याचा प्रस्ताव माझ्यासमोर मांडला व कार्यक्रमाचे संगीत संयोजन करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली. नावेलकर हे दीर्घ काळापासून व्यासपीठीय संगीत गायनापासून अलिप्त असल्याने, तो नियोजित कार्यक्रम यशस्वी होईल की नाही, अशी साशंकता माझ्या मनात होतीच. अशा परिस्थितीत मित्रत्वाच्या भावनेने मी ते आव्हान स्विकारून माझे नैतिक कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्न केला. परंतु, हा कार्यक्रम अपेक्षेपेक्षाही फारच अप्रतिम झाला. विशेष म्हणजे, मुंबई-पुण्यातीलही काही रसिकजन या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते व महाराष्ट्रातही हा कार्यक्रम सादर व्हावा, अशी सूचना त्यांनी कार्यक्रमाच्या संयोजकांना केली.

दीर्घ काळानंतर हेमंतकुमार आणि तलक मेहमूद यांच्या गाण्यांच्या बाबतीत दर्जेदार गायनाचा आस्वाद घेता आला असा रसिकजनांचा मनस्वी अभिप्राय होता. अमोल नावेलकर यांचा आवाज मूळ कलाकारांच्या गायनाशी जुळणारा होता, असे मतही काही जणांनी व्यक्त केले, असेही जीवन केरकर म्हणाले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने पर्यावरणजागृती करण्याच्या उद्देशाने अमोल नावेलकर यांच्या वतीने सुमारे आठशे उपस्थितांना कडूलिंबाची बियाणी (‘नीम सीडलिंग्स) वितरित करण्यात आली. दरम्यान, या कार्यक्रमाला उपस्थित काही रसिकजनांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, की अमोल नावेलकर यांनी या एकाच कार्यक्रमांवर न थांबता आगामी काळात गोवा व गोव्याबाहेर अशा स्वरूपाचे कार्यक्रम इतरही ठिकाणी सादर करावेत.

……………..

 

फोटो कॅप्शन :

पणजी येथे ‘एक श्याम हेमंतकुमार और तलक मेहमूद के नाम‘ कार्यक्रमाच्या अंतर्गत गायन करताना अमोल नावेलकर.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar