टीसीएस रूरल आयटी क्विझची राष्ट्रीय अंतिम फेरी बीएसपी सिनियर सेकेंडरी स्कूल, भिलाई छत्तीसगढ या शाळेने जिंकली छोट्या शहरांमधील विद्यार्थ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञानाप्रती जागरूकता वाढवण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आयोजित केलेल्या अग्रणी क्विझला मिळाला प्रचंड प्रतिसाद, ५.५ लाख विद्यार्थ्यांनी घेतला भाग

.

टीसीएस रूरल आयटी क्विझची राष्ट्रीय अंतिम फेरी बीएसपी सिनियर सेकेंडरी स्कूल, भिलाई छत्तीसगढ या शाळेने जिंकली
छोट्या शहरांमधील विद्यार्थ्यांमध्ये माहिती तंत्रज्ञानाप्रती जागरूकता वाढवण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने आयोजित केलेल्या अग्रणी क्विझला मिळाला प्रचंड प्रतिसाद, ५.५ लाख विद्यार्थ्यांनी घेतला भाग
बंगलोर, २ डिसेंबर, २०२३: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) (बीएसई: 532540, एनएसई: टीसीएस) आणि कर्नाटक सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बीटी आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने २४ व्या टीसीएस रूरल आयटी क्विझच्या राष्ट्रीय अंतिम फेरीच्या विजेत्यांची घोषणा केली आहे. बंगलोर टेक समिटचा एक भाग म्हणून ३० नोव्हेंबर २०२३ रोजी ही राष्ट्रीय अंतिम फेरी आयोजित करण्यात आली होती.
बीएसपी सिनियर सेकेंडरी स्कूल, भिलाई छत्तीसगढचा विद्यार्थी उदित प्रताप सिंह याने विजेतेपद व गोव्यातील बिचोलिममधील डॉ के बी हेडगेवार विद्यामंदिरचा विद्यार्थी विघ्नेश नौसो शेट्ये याने उपविजेतेपद जिंकले.
विजेता आणि उपविजेता यांना टीसीएसकडून अनुक्रमे १,००,००० आणि ५०,००० रुपयांच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले. अंतिम फेरीतील सर्व विद्यार्थ्यांना टीसीएसने शिष्यवृत्ती दिली आहे.
यावर्षी ही क्विझ संपूर्ण भारतातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खुली होती. यामध्ये ऑनलाईन परीक्षण, व्हर्च्युअल आणि फिजिकल क्विझ यांचा समावेश होता. आठ क्षेत्रीय फायनल्सच्या या विजेत्यांना राष्ट्रीय अंतिम फेरीत सहभागी करवून घेण्यात आले होते.
हर्षित रायकवार: सीएम राइज स्कूल, विदिशा, मध्य प्रदेश
गर्वित स्वामी : स्वामी विवेकानन्द गवर्नमेंट
मॉडल स्कूल, गंगानगर, राजस्थान
दिव्या मिश्रा : मालती देवी मेमोरियल पब्लिक स्कूल, कन्नौज, उत्तर प्रदेश
शिवम एम ठाकरे: सेंट जॉन्स हायस्कूल, वर्धा, महाराष्ट्र
अमृत उप्पर: फोर्ब्स अकादमी, गोकक, कर्नाटक
उदित प्रताप सिंह : बीएसपी सीनियर सेकेंडरी स्कूल, भिलाई, छत्तीसगढ
पंथ मालव भाई पटेल : आनंदालय स्कूल, आणंद, गुजरात
विग्नेश नौसो शेट्ये: डॉ. के.बी. हेडगेवार विद्यामंदिर, बिचोलिम, गोवा

अंतिम फेरीतील सर्व स्पर्धकांना टीसीएसकडून शिष्यवृत्ती देखील देण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या आयटी आणि बीटी, ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाचे माननीय मंत्री श्री. प्रियांक खरगे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांनी पुरस्कारांचे वितरण केले. त्यांच्यासह टीसीएस बंगलोरचे रिजनल हेड श्री. सुनील देशपांडे, कर्नाटक सरकारचे आयटी, बीटी आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ एकरूप कौर आणि कर्नाटक सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बीटी आणि एमडी किट्स विभागाचे संचालक श्री. दर्शन एच व्ही यांनी देखील विजेत्यांचे अभिनंदन केले.
२००० सालापासून टीसीएस कर्नाटक सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स, आयटी, बीटी आणि विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या सहयोगाने रूरल आयटी क्विझचे आयोजन करत आहे. भारतभरातील छोट्या शहरांमधील आणि जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना आयटीबद्दल जागरूक करणे, तंत्रज्ञान विश्वातील नवीन घडामोडींबाबत माहिती करवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. आजवर हा उपक्रम २१० लाखांहून जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला आहे. भारतात ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी पहिली आयटी क्विझ म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये देखील याची नोंद करण्यात आली आहे.

About Tata Consultancy Services (TCS)
Tata Consultancy Services is an IT services, consulting and business solutions organization that has been partnering with many of the world’s largest businesses in their transformation journeys for over 55 years. Its consulting-led, cognitive powered, portfolio of business, technology and engineering services and solutions is delivered through its unique Location Independent Agile™ delivery model, recognized as a benchmark of excellence in software development.
A part of the Tata group, India’s largest multinational business group, TCS has over 614,000 of the world’s best-trained consultants in 55 countries. The company generated consolidated revenues of US $27.9 billion in the fiscal year ended March 31, 2023, and is listed on the BSE and the NSE in India. TCS’ proactive stance on climate change and award-winning work with communities across the world have earned it a place in leading sustainability indices such as the MSCI Global Sustainability Index and the FTSE4Good Emerging Index. For more information, visit www.tcs.com.
TCS media contacts:
Asia Pacific
Email: wenjian.lin@tcs.com | Phone: +65 9695 9948

Australia and New Zealand
Email: kelly.ryan@tcs.com | Phone: +61 422 989 682

Canada
Email: tiffany.fisher@tcs.com | Phone: +1 416 456 7650

Europe
Email: joost.galema@tcs.com | Phone: +31 615 903387

India
Email: saxena.kritika@tcs.com| Phone: +91 22 6778 9999
Email: vanshika.sood@tcs.com | Phone: +91 22 67789098

Middle East & Africa
Email: pragya.priyadarshini@tcs.com | Phone: +971 528656700

Japan
Email: douglas.foote@tcs.com | Phone: +81 80-2115-0989

Latin America
Email: alma.leal@tcs.com | Phone: +521 55 2095 6098

UK
Email: peter.devery@tcs.com | Phone: +44 20 3155 2421

USA
Email: james.sciales@tcs.com | Phone: +1 917 981 7651

###

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें