उगवे महिला मंडळाची फुगडी गोवा दुरदर्शनवर

.

उगवे महिला मंडळाची फुगडी गोवा दुरदर्शनवर
आज ५ डिसेंबर संध्याकाळी ४:३० वाजता महादेव महिला फुगडी संघ उगवे. पारंपरिक फुगडी बरोबरच नाविन्यपूर्ण व समाज जागृतीचा संदेश देण्याची नेहमीच धडपड करणारा संघ म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. दरवर्षी नवा संदेश नवीफुगडीगीते ही खासियत आहे. पर्यावरण, सामाजिक समस्या, समानता मुलगा-मुलगी समानता, पाणी वाचवा, वन्यजीव रक्षण असे विषयावर प्रकाशझोत टाकून जनजागृती करणारा संदेश देतात. दरवर्षी श्री माऊली मंदीरात खास होणाऱ्या कार्यक्रम आजुबाजूच्या गावातील रसिक मंडळी कार्यक्रमाला गर्दी करतात.
संयोजक ईशांक महाले. सागर महाले, ऋतू , मनोहर उगवेकर, नारायण मोपकर, प्रदिप नाईक योगानंद बांदोडकर , धनंजय सावळ व एकनाथ यांनी या साठी खुप मेहनत व सहकार्य केले.
गोवा दुरदर्शनची निर्मिती असून निसर्गरम्य मोपा गावात चित्रिकरण झाले आहे. द्रोण संचालन सिध्दांत पावसकर तर संकलन क्षितिज उगवेकर , वाहतूक सत्यवान महाले व निर्मिती श्री. उदय श्रीधर कामत यांचीआहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें