टाटा मोटर्सकडून नवीन इन्‍ट्रा व्‍ही७० पिकअप, इन्‍ट्रा व्‍ही२० गोल्‍ड पिकअप आणि एस एचटी प्लस लाँच

.

टाटा मोटर्सकडून नवीन इन्‍ट्रा व्‍ही७० पिकअप, इन्‍ट्रा व्‍ही२० गोल्‍ड पिकअप आणि एस एचटी प्लस लाँच

मालकीहक्‍काच्‍या कमी खर्चांसह लहान व्‍यावायिक वाहने व पिकअप्‍सना केले अधिक कार्यक्षम, कुशल व उत्‍पादनक्षम

Panaji: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने सुरूवातीपासून शेवटच्‍या अंतरापर्यंतचे परिवहन अधिक कार्यक्षम करण्‍याप्रती आपल्‍या कटिबद्धतेशी बांधील राहत नवीन इन्‍ट्रा व्‍ही७०, इन्‍ट्रा व्‍ही२० गोल्‍ड आणि एस एचटी प्लस च्‍या लाँचची घोषणा केली. ही नवीन वाहने उत्तम उत्‍पन्‍नासह लांबच्‍या अंतरापर्यंत जास्‍त पेलोड वाहून नेण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. दर्जात्‍मक वैशिष्‍ट्यांनी युक्‍त ही वाहने विविध उपयोजनांसाठी वापरता येऊ शकतात, ज्‍यामधून भारतातील शहरी व ग्रामीण भागांमधून उच्‍च फायदे व उत्‍पादकता मिळेल. टाटा मोटर्सने त्‍यांची लोकप्रिय वाहने इन्‍ट्रा व्‍ही५० आणि एस डिझेलचे सुधारित व्‍हर्जन्‍स देखील लाँच केले, जे मालकीहक्‍काचा खर्च कमी करण्‍यासह इंधनाचा वापर कमी करण्‍यासाठी नव्‍याने डिझाइन करण्‍यात आले आहेत. या नवीन लाँचसह टाटा मोटर्स लहान व्‍यावसायिक वाहने व पिकअप्‍सची व्‍यापक श्रेणी देते, ज्‍यामुळे ग्राहक त्‍यांच्‍या आवश्‍यकतांनुसार सर्वात सानुकूल वाहनाची निवड करू शकतात. या वाहनांसाठी बुकिंग्‍ज देशभरातील सर्व टाटा मोटर्स सीव्‍ही डिलरशिप्‍समध्‍ये सुरू आहेत.

या वाहनांना लाँच करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक श्री. गिरीश वाघ म्‍हणाले, ”विविध उपयोजनांसाठी सानुकूल सोल्‍यूशन्‍स देण्‍याव्‍यतिरिक्‍त आमची लहान व्‍यावसायिक वाहने व पिकअप्‍स उदरनिर्वाह देण्‍यासाठी आणि ग्राहकांचा जीवनाचा दर्जा सुधारण्‍यासाठी ओळखली जातात. आज आम्‍ही लाँच करत असलेली वाहने विशिष्‍ट इनपुट्स आणि वापरकर्त्‍यांच्‍या मोठ्या समुदायाकडून करण्‍यात आलेल्‍या मागणीनुसार विकसित करण्‍यात आली आहेत. ही वाहने इंधन कार्यक्षमता सानुकूल करण्‍यासाठी आणि लांबच्‍या अंतरापर्यंत जास्‍त पेलोड वाहून नेण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. जलदपणे होत असलेले शहरीकरण, ई-कॉमर्सला मिळालेली चालना, वापरामध्‍ये वाढ आणि हब-अॅण्‍ड-स्‍पोक मॉडेलमध्‍ये वाढ यांसह लॉजिस्टिक्‍स व्‍यवस्‍थापनामधील कार्यक्षम व प्रभावी लास्‍ट व फर्स्‍ट माइल परिवहनाचे महत्त्व सांगता येऊ शकत नाही. म्‍हणून, प्रत्‍येक वाहन प्रबळ व विश्‍वसनीय कार्गो परिवहन सोल्‍यूशन देण्‍यासाठी, तसेच भारताच्‍या वाढत्‍या अर्थव्यवस्‍थेमध्‍ये मोठ्या प्रमाणात योगदान देणाऱ्या वैयक्तिक ग्राहकांना व ताफा मालकांना व्‍यापक व्‍यावसायिक फायदे मिळण्‍याच्‍या खात्रीसाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.”

प्रबळ व विश्‍वसनीय वाहनांव्‍यतिरिक्‍त टाटा मोटर्स ग्राहक मूल्‍यवर्धित सेवांच्‍या व्‍यापक श्रेणीसह अनेक फायदे व परिपूर्ण मन:शांतीचा आनंद घेऊ शकतात. भारतातील सर्वात मोठे सर्विस नेटवर्क, कार्यक्षम ताफा व्‍यवस्‍थापनासाठी आधुनिक टेलिमॅटिक्‍स सिस्‍टम फ्लीट एजचे फायदे, वार्षिक देखरेख करारांची सोयीसुविधा, उच्‍च अपटाइमसाठी स्‍पेअर्सची सुलभपणे उपलब्‍धता आणि सर्वसमावेशक संपूर्ण सेवा २.० उपक्रम सर्वांगीण व त्रासमुक्‍त वाहन मालकीहक्‍क अनुभवाची खात्री देतात, ज्‍यामधून टाटा मोटर्सची ग्राहक समाधानाप्रती प्रबळ कटिबद्धता अधिक दृढ होते. सर्वसमावेशक संपूर्ण सेवा २.० उपक्रम सर्वांगीण व त्रासमुक्‍त वाहन मालकीहक्‍क अनुभवाची खात्री देतात, ग्राहक पोहोच विस्‍तारण्‍यासाठी, टॉप-ऑफ-द-माइण्‍ड जागरूकता व ब्रॅण्‍ड आवाहन वाढवण्‍यासाठी या नवीन वाहनांच्‍या लाँचचा उद्देशपूर्ण विपणन मोहिमेसह प्रसार करण्‍यात येत आहे. ही प्रभावी मोहिम डिजिटल तंत्रज्ञान, सोशल मीडिया व प्रभावक सहभागासह समकालीन विपणन व जाहिरात माध्‍यमांमधील व्‍यापक उपस्थितीचा फायदा घेते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar