यज्ञातून प्रक्षेपित होणारी सकारात्मकता ग्रहण करण्यासाठी सात्त्विक जीवनशैली अवलंबणे आणि साधना करणे आवश्यक ! – शॉन क्लार्क

.
यज्ञातून प्रक्षेपित होणारी सकारात्मकता ग्रहण करण्यासाठी सात्त्विक जीवनशैली अवलंबणे आणि साधना करणे आवश्यक ! – शॉन क्लार्क

      ‘सध्या जगभरातील वायुमंडलात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण न भूतो न भविष्यति एवढे वाढले आहेहे अत्यंत चिंतेचे कारण आहेअसे हवामान शास्त्रज्ञ सांगत आहेतमात्र त्याही पेक्षा अधिक काळजीचे कारण ‘सूक्ष्म स्तरावरील आध्यात्मिक प्रदूषणातम्हणजे रजतम या त्रिगुणांत झालेली वाढ’हे आहेयज्ञामुळे वायुमंडलातील रजतमाचे प्रदूषण कमी होतेहे विविध वैज्ञानिक प्रयोगांतून स्पष्ट झाले आहेयज्ञातून प्रक्षेपित होणारी सकारात्मकता ग्रहण करणेतसेच ती टिकवून ठेवणे यासाठी सात्त्विक जीवनशैली अवलंबणे आणि साधना करणे आवश्यक आहे ’असे प्रतिपादन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’चे श्रीशॉन क्लार्क यांनी केले. नुकतेच नवी दिल्ली येथे झालेल्या ‘ट्वेंटिसेवेंथ इंडिया कॉन्फरन्स ऑफ वेव्ह्स ऑन मॅन अँड नेचर इन वेदिक ट्रेडिशन मॉडर्न पर्स्पेक्टिव्ह’ या राष्ट्रीय परिषदेत श्रीक्लार्क बोलत होतेत्यांनी ‘यज्ञामधील वायुमंडलाची आध्यात्मिक शुद्धी करण्याची क्षमता’हा शोधनिबंध सादर केलाज्याचे लेखक परात्पर गुरु डॉआठवले हे असूनसहलेखक श्रीशॉन क्लार्क हे आहेत.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत 18 राष्ट्रीय आणि 92 आंतरराष्ट्रीयअशा एकूण 110 वैज्ञानिक परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेतयांपैकी 14 आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये ‘सर्वाेत्कृष्ट सादरीकरण’ पुरस्कार मिळाले आहेत.

श्रीक्लार्क यांनी आपल्या शोधनिबंधात जानेवारी 2022 मध्ये महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात केल्या गेलेल्या यज्ञांचा आध्यात्मिक स्तरावर होणार्‍या लाभांचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या मातीपाणी आणि वायु यांच्या वैज्ञानिक चाचण्यांचे निष्कर्ष मांडलेया चाचण्यांसाठी यज्ञापूर्वी आणि यज्ञानंतर मातीपाणी आणि वायु यांचे नमुने गोळा करतांना ते साधना करणार्‍या साधकांच्या घरातीलतसेच त्यांच्या शेजारी साधना न करणार्‍या घरातीलअसे जोडीने घेण्यात आलेया तिन्ही प्रकारच्या नमुन्यांमधील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचे मापन करण्यासाठी युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू..एस्.) या भूतपूर्व अणु वैज्ञानिक डॉ मन्नम मूर्ती यांनी विकसित केलेल्या उपकरणाचा वापर करण्यात आलायज्ञामुळे नकारात्मक ऊर्जा कमी होणेतर सकारात्मक ऊर्जा वाढणेअसा परिणाम दोन्ही घरांतील तिन्ही प्रकारच्या नमुन्यांच्या बाबतीत दिसून आलासाधकांच्या घरांतील नमुन्यांमध्ये हा परिणाम अधिक प्रमाणात आढळलाकारण साधना केल्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होतेतसेच सकारात्मकता वाढते आणि बाह्य सकारात्मकता ग्रहण करण्याची क्षमताही वाढते.

श्रीक्लार्क पुढे म्हणाले कीयज्ञाचा परिणाम यज्ञस्थळापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या भागांवरही होतोहे यज्ञस्थळापासून विविध अंतरांवर असलेल्या ठिकाणांहून घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीत आढळलेएवढेच नाहीतर यज्ञाचा सकारात्मक परिणाम यज्ञ संपन्न झाल्यानंतर पुढेही काही काळ टिकून रहातो.


आपला नम्र,
 
श्री. आशिष सावंत,
संशोधन विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय.
(संपर्क : 9561574972)

—————–
Photo Caption !

Sean_clerk.jpg श्री. शॉन क्लार्क, सहलेखक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें