बिहारला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याचे प्रयत्न !* – राकेश मिश्रा, राष्ट्रीय महासचिव, भारतीय जनक्रांती दल

.

 

*‘बिहारची धर्मनिरपेक्षता शरियाकडे ?’ या विषयावर विशेष संवाद !*

*बिहारला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याचे प्रयत्न !* – राकेश मिश्रा, राष्ट्रीय महासचिव, भारतीय जनक्रांती दल

भारतात संविधानामध्ये समानता सांगितलेली असतांनाही बिहारमधील शाळांमध्ये हिंदूंच्या सणांच्या सुट्ट्या कमी करून मुसलमानांच्या सुट्ट्या वाढवण्यात आल्या आहेत. असे पहिल्यांदा झालेले नसून अशी अनेक प्रकरणे आहेत. जे राजकीय पक्ष संविधान धोक्यात असल्याचे सांगत आरडाओरड करत असतात तेच संविधानाचे पालन करत नाही, हे भारताचे दुर्भाग्य आहे. हे लोक सत्तेसाठी देश आणि समाज यांचा कोणताही विचार करायला तयार नाहीत. बिहारमधील किशनगंज, पूर्णिया आदी ठिकाणी गेल्यावर आपण एखाद्या ‘इस्लामिक स्टेट’ वा पाकिस्तानमध्ये गेलो आहोत, असे वाटते. पाटणामधील कोतवाली येथे कब्रस्तानाजवळ एक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर कब्रस्तान होण्याच्या फार पूर्वीपासून असतांना ते मंदिर पाडण्याची नोटीस बिहार सरकारने पाठवली आहे. एकूणच इस्लामने ग्रसित झालेले राज्यकर्ते केवळ इस्लामचा अजेंडा चालवत आहेत. येनकेन प्रकारेन बिहारला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत, *असे प्रतिपादन ‘भारतीय जनक्रांती दला’चे राष्ट्रीय महासचिव श्री. राकेश दत्त मिश्रा यांनी केले.* ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित *‘बिहारची धर्मनिरपेक्षता शरियाकडे ?’* या विषयावरील ऑनलाईन ‘विशेष संवादा’त बोलत होते.

*या वेळी श्री. राकेश मिश्रा पुढे म्हणाले की,* बिहारचे लोक शिक्षित झाले, तर ते सरकारला प्रश्न विचारतील म्हणून शिक्षणाचा दर्जा सुधारण्याऐवजी लोक शिक्षणापासून कसे वंचित रहातील, हे पाहिले जात आहे. बिहारमध्ये शिक्षणाचा दर्जा घसरला असून गेली 10-15 वर्षे शिक्षणाचे कोणतेही मूल्यमापन झालेले नाही. गेल्या 30 वर्षांत विकासाच्या नावाखाली बिहारमधील लोकांना केवळ ‘कामगार’ म्हणून अन्य राज्यांना पुरवठा करण्याचे षड्यंत्र चालू आहे.

*या वेळी ‘हिंदु पुत्र संघटने’चे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. अविनाश कुमार बादल म्हणाले की,* हिंदू विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या 9 तर, मुसलमान विद्यार्थ्यांना 10 सुट्ट्या देऊन ‘सेक्युलिरीजम’ आणि ‘समाजवाद’ यांच्या नावाखाली ‘नमाजवाद’ लोकांवर लादला जात आहे. हे लोक मुसलमानांच्या लांगुलचालनात इतके बुडाले आहेत की त्यांना देशातील बहुसंख्यांक हिंदूंची कोणतीही पर्वा नाही. मध्यंतरी बिहार सरकारने मुसलमानांच्या कब्रस्तानसाठी ‘घेराबंदी’ (क्षेत्रफळ निश्चित) करण्याच्या नावाखाली अनेक खाजगी आणि सरकारी जमीन बळकावल्या. बिहारचे शिक्षणमंत्री हे हिंदूंच्या श्रीरामचरितमानसवर सातत्याने आक्षेपार्ह टीका करतात, तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही; मात्र ‘हेट स्पीच’चे सर्वांत जास्त गुन्हे बिहारमध्ये हिंदूंवरच नोंदवले जात आहेत. एकूणच बिहारमध्ये हिंदूंचे दमन करण्याचे काम चालू आहे; पण हे खूप दिवस चालणार नाही. त्याला तीव्र विरोध केला जाईल.

आपला नम्र,
*श्री. रमेश शिंदे,*
राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
(संपर्क : 99879 66666)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar