मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी म्हार्दाेळ येथे गोवा राज्यस्तरीय मंदिर-धार्मिक संस्था परिषद

.

 

दिनांक : ०८/१२/२०२३

*मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी म्हार्दाेळ येथे गोवा राज्यस्तरीय मंदिर-धार्मिक संस्था परिषद*
फोंडा, ८ डिसेंबर – मंदिरांपासून धर्म वेगळा करता येत नाही, तसेच तीर्थक्षेत्र आणि मंदिरे यांच्या प्राचीन परंपरा आहेत. हिंदूंना आध्यात्मिक बळ देणारी ही ‘भारतीय मंदिर संस्कृती’ आज धर्मविहीन देशभरातील ‘सेक्युलर’ शासनतंत्रामुळे धोक्यात आली आहे. आपल्याला मिळालेला हा दैवी वारसा जपणे, त्याचे संवर्धन आणि संरक्षण करणे, मंदिरातील परंपरागत पूजाविधी पुन्हा चालू होणे आवश्यक आहे. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी संघटित प्रयत्नांची आज आवश्यकता आहे. मंदिरांचे जतन, संवर्धन आणि मंदिर विश्वस्तांचे संघटन होण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि गोमंतक मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने १० डिसेंबर २०२३ यादिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सिंहपुरुष सभागृह, श्री महालसा देवस्थान, म्हार्दाेळ, फोंडा येथे ‘गोवा राज्यस्तरीय मंदिर-धार्मिक संस्था परिषदे’चे आयोजन केले आहे. या परिषदेचे संपूर्ण गोव्यात ६०० हून अधिक मंदिराचे विश्वस्त, प्रतिनिधी, पुरोहित, मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते, अभ्यासक आदींना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी फोंडा येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेत गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी आणि हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांची उपस्थिती होती.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘परिषदचे सकाळी १० वाजता उद्घाटन सत्र होणार आहे. या वेळी ‘मंदिरांचे संघटन करण्याचे महत्त्व’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि गोमंतक मंदिर संस्कृतीचे रक्षण आणि उपाय’ या विषयावर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, विचारक आणि प्रसिद्ध लेखिका सौ. शेफाली वैद्य यांचे मार्गदर्शन होणार आहे. यानंतर ‘डिजिटल टेम्पल हेरिटेज टुरिझम’ या विषयावर श्री. अजित पद्मनाभ, ‘प्राचीन मंदिर परंपरेतील तथ्ये आणि आधुनिक काळातील अंगीकार’ या विषयावर गोव्याचे इतिहासकार श्री. रोहित फळगावकर आणि ‘मंदिरांचे स्थापत्य : नूतन वास्तू बांधतांना घ्यावयाची सिद्धता’ या विषयावर श्री. अभिजीत साधले यांचे मागदर्शन होणार आहे. दुपारच्या सत्रात ‘पुरातत्व विभाग आणि मंदिर: शंकानिरसन’ या विषयावर श्री. बालाजी शेणवी यांचे मार्गदर्शन होणार आहे. यानंतर ‘मंदिर सुव्यवस्थापन’ या विषयावर परिसंवाद होणार असून यामध्ये सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, केरी येथील श्री विजयादुर्गा देवस्थानचे श्री. राजेंद्र देसाई, विश्व हिंदु परिषदेच्या मंदिर, अर्चक, पुरोहित विभागाचे गोवाप्रमुख श्री. मच्छिंद्र च्यारी, ह.भ.प. सुहास वझे आणि गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी सहभागी होणार आहेत. यानंतर ‘मंदिर-विधी समस्या आणि उपाय’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. यामध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे, अधिवक्ता श्री. संतोष रिवणकर आणि अधिवक्ता सुरेश राव यांचा सहभाग असणार आहे. यानंतर ‘मंदिरांना धर्मशिक्षणाचे केंद्र बनवा!’ या विषयावर सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, ‘मंदिरांमध्ये भाविकांसाठी वस्त्रसंहिता’ या विषयावर सौ. शुभा सावंत,
‘अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने करावयाच्या कृती’ याविषयावर विश्व हिंदु परिषदेचे
श्री. शाम नाईक आणि ‘गोमंतक मंदिर महासंघ : रचना आणि दिशा’ या विषयावर गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी यांचे मार्गदर्शन होणार आहे. शेवटी ठराव घेण्यात येणार आहे.’’ ही परिषद केवळ निमंत्रितांसाठी आहे. यामध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी ९३२६१०३२७८/ ९५२७७६००६१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गोमंतक मंदिर महासंघाने केले आहे.

आपले विश्वासू,
*डॉ. मनोज सोलंकी,*
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती,
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

आपले विश्वासू,
*श्री. जयेश थळी*
सचिव, गोमंतक मंदिर महासंघ
(संपर्क क्रमांक : ९५२७७ ६००६१)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें