हणजूण पंचायत क्षेत्रात वाहतुकीस अडथळा ठरणारे फूड कार्ट

.

हणजूण पंचायत क्षेत्रात वाहतुकीस अडथळा ठरणारे फूड कार्ट अर्थात खाद्यपदार्थाची फिरती वाहने 15 डिसेंबर पर्यंत रस्त्यावरून हटवावी असा निर्णय हणजूण कायसुव रस्ता सुरक्षा समिती, हणजूण वाहतूक पोलीस व हणजूण कायसुव पंचायतीने एकत्रित रित्या केलेल्या सर्वेक्षणावेळी या व्यावसायिकांना दिला.
हणजूण कायसुव पंचायत क्षेत्रात विशेषता हणजूण येथील स्टारको जंक्शन जवळ रस्त्याच्या बाजूला रात्रंदिवस पार करून ठेवण्यात आलेल्या फिरत्या खाद्यपदार्थांच्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे हणजूण कायसुव रस्ता सुरक्षा समितीने निदर्शनास आणून दिल्यानंतर वाहतूक पोलिसांनी पंचायत व समिती सोबत बैठक बोलावून चर्चा केली. यावेळी सदर जागेवर जाऊन पाहणी करण्याचे व त्या व्यवसायिकांना तेथून चित्र तर जाण्याकरिता सुचित करण्याचे ठरवण्यात आले.
पाहणी वेळी त्या व्यवसायिकांनी आपण रात्रीच्या वेळी तेथे व्यवसाय करतो व सकाळच्या वेळी आपली वाहने तेथून घेऊन जातो असे सांगितले, या समितीने व वाहतूक पोलिसांनी आक्षेप घेऊन वाहने इतरत्र हलवण्याचे त्यांना सुचवले. याकरिता त्यांना 15 डिसेंबर पर्यंत ची मुदत देण्यात आलेली असून त्यानंतर रस्त्यावर व्यवसाय करणारी खाद्यपदार्थाची वाहने हटवण्याचा निर्णय घेण्यात आला, या निर्णयास सर्व संबंधितांनी मान्यता दिली आहे.

फोटो…हणजूण येथे स्टारको जंक्शन जवळ वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फिरत्या वाहनावरील खाद्यपदार्थांच्या विक्रेत्यांसोबत चर्चा करताना हणजूण वाहतूक पोलीस, रस्ता सुरक्षा समितीचे पदाधिकारी व पंचायत मंडळ.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar