पीपल्स परिवारातर्फे डॉ. सुर्लकर जयंती साजरी
मळा – पणजी येथील पीपल्स एज्यूकेशनल ट्रस्ट संचलित पीपल्स परिवाराच्या विविध विभागांतर्फे पीपल्स उच्च माध्यमिक विद्यालय तसेच पीपल्स एसएफएएल विभागाचे संस्थापक कै . डॉ. जगदीश सुर्लकर यांची 88 वी जयंती शनिवार दिनांक 09 डिसेंबर रोजी ऊत्साहात संपन्न झाली . पीपल्स उच्च माध्यमिकच्या प्राचार्य सिद्धार्थी नेत्रावळकर , माध्यमिक विभाग प्रमुख स्वाती कंटक , प्राथमिक विभाग प्रमुख आनंदी सुर्लकर तसेच एसएफएएल विभाग प्रमुख क्लेअर गुदिन्हो यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.
याप्रसंगी सिद्धार्थी नेत्रावळकर ,स्वाती कंटक तसेच त्रिवेणी सरदेसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर पीपल्स परिवारातर्फे कै. जगदीश सुर्लकर यांना आदरांजली वाहण्यात आली .रत्ना सरदेसाई या शिक्षिकेने कार्यक्रमाचे सूत्रनिवेदन केले