म्हार्दाेळ येथे गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषद

.
म्हार्दाेळ येथे गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषद
मंदिरांच्या आधारे गोव्यात आध्यात्मिक पर्यटनाला चालना देणे काळाची गरज ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
 म्हार्दाेळ, १० डिसेंबर – गोव्याची प्रतिमा देशभरात भोगभूमी म्हणून प्रचलित झाली आहे. गोवा म्हणजे कॅसिनो, अर्धनग्न महिला असलेल्या समुद्रकिनारे, ‘सनबर्न’ असा प्रचार केला जातो; मात्र खरोखर गोव्याची ही संस्कृती आहे का? गोव्यातील मंदिर संस्कृतीचा प्रचार का केला जात नाही?; हल्ली गोवा सरकारने मंदिर संस्कृतीचा प्रचार करायला प्रारंभ केला आहे, ही एक चांगली बाब आहे. उत्तर प्रदेशमध्ये ‘काशी विश्वेश्वर कॉरिडोर’चे बांधकाम झाल्यावर तेथे एका वर्षात ८ कोटी पर्यटकांनी भेट दिली, तर गोव्यात कॅसिनो, समुद्रकिनारे, ‘सनबर्न’सारखे महोत्सव यांचा प्रचार करून मागील वर्षी गोव्यात केवळ ७३ लक्ष पर्यटकांनी भेट दिली. त्यामुळे गोव्यात मंदिर पर्यटनाला चालना का दिली जाऊ नये?; मात्र यात केवळ पर्यटन नको, तर मंदिरांची पावित्रता टिकवणार्‍या धार्मिक पर्यटनाला चालना दिली पाहिजे, *असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.* म्हार्दाेळ येथील श्री महालसा मंदिर परिसरातील सिंहपुरुष सभागृहात गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याद्वारे आयोजित गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी, ‘सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर’ तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ सौ. शेफाली वैद्य आणि हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रसारक संत सद्गुरु निलेश सिंगबाळ यांची उपस्थिती होती.
 परिषदेला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. यानंतर तपोभूमी, कुंडई येथील पिठाधिश्वर पद्मश्री विभूषित सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांच्या संदेशाचे वाचन श्रीक्षेत्र तपोभूमी येथील वेदमूर्ती केदार यांनी वाचन केले. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे श्री. युवराज गावकर यांनी केले. फोंडा येथील श्री गौडपादाचार्य मठाचे पिठाधीश स्वामी प.पू. श्रीमद् शिवानंद सरस्वती यांच्या संदेशाचेही या वेळी वाचन करण्यात आले.
*गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी प्रास्ताविक करतांना म्हणाले,*‘‘देवालय म्हणजे भगवंत वास असलेले स्थान आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मंदिरे ही मनःशांतीची उर्जास्त्रोत आहे आणि हे विनामूल्य आहे. आपल्या पूर्वजांनी अनेक अत्याचार सहन करून मंदिरांचा वारसा आपल्या पिढीकडे पोहोचवला आहे. यामुळे मंदिरांचे संवर्धन आणि जतन करणे अत्यावश्यक आहे. मंदिर विश्वस्तांनी एकमेकांमध्ये जवळीक निर्माण करून संघटन मजबूत करण्यासाठी हातभार लावला पाहिजे.’’
 *श्री. रमेश शिंदे मार्गदर्शनात पुढे म्हणाले,*‘‘गोव्यात काही ठिकाणी विश्वस्त, महाजन, पुरोहित, आदींमध्ये वाद असल्याचे पहायला िमळते. यामुळे न्यायासाठी प्रकरणे न्यायप्रविष्ट झालेली आहेत. आज न्यायालयात ५ कोटी प्रकरणे प्रलंबित आहेत आणि न्याय मिळण्यासाठी पिढ्यानपिढ्या प्रतिक्षा करावी लागत आहे. त्यामुळे मंदिरांचे अंतर्गत वाद आपापसांमध्येच धार्मिक शास्त्रे आणि धर्माचार्य यांच्याद्वारे सोडवले गेले पाहिजेत. न्याय मिळवण्यासाठी आपण सेक्युलर शासनावर अवलंबून राहिल्यास, सरकारला मंदिरांत हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळतो आणि त्याचा गंभीर परिणाम पुढे भोगावा लागतो.’’
*‘सोशल मिडिया इन्फ्लूएन्सर’ तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ सौ. शेफाली वैद्य या वेळी म्हणाल्या,* ‘‘गोव्यात पूर्वी एक भव्यदिव्य अशी मंदिर संस्कृती होती. ही मंदिरे मराठी शिक्षण, संस्कृती, यांची केंद्रे होती. या मंदिरांच्या माध्यमातून गोवा हा भारतीय संस्कृतीशी जोडला गेला. पोर्तुगिजांनी हे हेरून हिंदूंची ही संस्कृती नष्ट करण्याच्या उद्देशाने अगोदर मराठी भाषेतील शिक्षण बंद केले आणि मग मंदिरे नष्ट केली. मंदिरे ही शैक्षणिक, सामाजिक आणि आध्यात्मिक केंद्रे आहेत. मंदिरात पूर्वी शाळा भरायच्या, कीर्तन, भजन, पूजा-अर्जा व्हायची, त्यामुळे हिंदु मुले लहानपणापासूनच मंदिरांशी जोडलेली रहायची. मंदिरे ही एक प्राचीन संस्था असून त्यामध्ये भारतीय इतिहास आणि संस्कृती यांचे दर्शन होते. मंदिराची मुखमंडप, सभामंडप, गर्भगृह आणि शिखर अशी रचना आहे आणि या रचनेचे मनुष्याच्या शरीराच्या रचनेशी साम्य आहे. मंदिरातील मूर्ती म्हणजे साक्षात परमात्मा आणि मनुष्याचा आत्मा यांचा संबंध आहे.’’ उद्घाटन सत्रानंतर विविध विषयांवर उद्बोधन सत्र आणि परिसंवाद झाले. परिषदेला सुमारे २५० मंदिरांचे विश्वस्त, समितीचे सदस्य, भक्त आदींची उपस्थिती होती. परिषदेत सूत्रसंचालन सौ. सुमेधा नाईक आणि श्री. राहुल वझे यांनी केले.
आपला विश्वासू,
डॉ. मनोज सोलंकी,
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)
Photo caption – गोमंतक मंदिर-धार्मिक संस्था परिषदेचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करतांना डावीकडून सौ. शेफाली वैद्य, सद्गुरु निलेश सिंगबाळ, श्री. जयेश थळी आणि श्री. रमेश शिंदे

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar