प.पू.धर्मभूषण , पद्मश्री विभुषित सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य‌‌‌ स्वामी महाराजांच्या कृपा आशिर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित हळदोणा झोन संत समाज हळदोणा,मयडे

.

प.पू.धर्मभूषण , पद्मश्री विभुषित सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य‌‌‌ स्वामी महाराजांच्या कृपा आशिर्वादाने श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित हळदोणा झोन संत समाज हळदोणा,मयडे,बस्तोडा पालये तर्फे “चलो अयोध्या ” भगवान श्रीरामांचे भव्य मंदिर उभारण्यात येत असुन तेथे २२ जानेवारी २०२४ तारखेला प्राण प्रतिष्ठापना होत आहे.या संदर्भात जन जागृतीसाठी भव्य मिरवणूक काढण्यात आली.या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर हळदोणा मतदार संघाचे समाज सेवक श्री.महेश विठु साटेलकर यांनी सांगितले की येत्या २२ तारखेला प्रभु श्रीराम जन्मभूमी अयोध्येला मुर्ती प्राण प्रतिष्ठापनेचा मोठा सोहळा संपन्न होणार आहे त्यानिमित्त आज जन जागृतीसाठी मिरवणुकीचे आयोजन केले आहे.येत्या रविवारी १७ डिसेंबर २०२३ तारखेला श्री दत्त पद्मनाभ पीठ परमपूज्य सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य‌‌‌ स्वामी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली टॅक्सी स्टॅण्ड मापसा येथे भव्य कार्यक्रम होणार आहे व सर्वांना अमौलिक असे मार्गदर्शन लाभणार आहे त्यासाठी सर्व हिंदुंनी एकत्रित यावे व कार्यक्रमाला उपस्थित रहावे.

पाचशे वर्षांनंतर जर भगवान श्रीरामांची प्राण प्रतिष्ठापना होत आहे तर आपण सर्वांनी आपल्या घरात दिवाळी सारखा प्राण प्रतिष्ठापनेचा उत्सव साजरा केला पाहिजे व सर्वांनी एकदा तरी अयोध्येला जाऊन श्री राम ललाचे दर्शन घेतले पाहिजे असे उद्गार शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री गोविंद गोवेकर यांनी काढले..
विनय चोपडेकर म्हणाले की सर्व हिंदु धर्मियांनी जात पात विसरून धर्म कार्यासाठी पुढे यावे.. मिरवणुकीची सुरुवात श्री राम मंदिर पोंबुर्फा येथुन श्रीराम मंदिराचे अध्यक्ष विनोद हळणकर यांच्यातर्फे गुढी उभारुन व पुजा करुन करण्यात आली. त्यानंतर मिरवणूक बस्तोडा मार्गे मयडे पूल, बांबुर्डे ,पोवासाव, कालिझर, कातुर्ली,तांबडी माती,नास्नोडा,कीटला, हळदोणा,कारोणा वळावली, साईनगर, जयदेव वाडा हा मार्ग क्रमण करत रवळघाडी देवस्थान मध्ये मिरवणूकीची सांगता झाली,या मिरवणुकीला लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.या कार्यक्रमाला संत समाजाचे गुरूबंधु भगिनी तसेच सामाजिक विभागाचे श्री सिद्धार्थ रेवडकर,सौ.वर्षा नार्वेकर,संत समाजाचे अध्यक्ष श्री सविदास नाईक – हळदोणा, श्री किशोर साटेलकर – मयडे, श्री ॠषिकेश मडगावकर – बस्तोडा पालये, श्री रामा साटेलकर, श्री रामा गोवेकर उपस्थित होते.संत समाज मयडेचे अध्यक्ष श्री किशोर रामा साटेलकर यांनी अल्प आहाराची व्यवस्था केली. वर्षा नार्वेकर हिने सर्वांचे स्वागत केले व सिद्धार्थ रेवडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar