कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचारांसाठी सादर केले क्रांतिकारी HIFU तंत्रज्ञान

.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचारांसाठी सादर केले क्रांतिकारी HIFU तंत्रज्ञान

मुंबई, 12 डिसेंबर 2023: कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईने प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांसाठी अत्याधुनिक उपचार पर्याय म्हणून हाय-इन्टेन्सिटी फोकस्ड अल्ट्रासाउंड (HIFU) हे क्रांतिकारी तंत्रज्ञान सादर केल्याची घोषणा केली आहे. HIFU या अत्याधुनिक उपचारामध्ये प्रोस्टेट कॅन्सर पेशींना टार्गेट करून त्या नष्ट करण्यासाठी हाय-फ्रिक्वेन्सी साउंड वेव्ज वापरल्या जातात. शरीरावर कमीत कमी चिरा देऊन केल्या जाणाऱ्या या तंत्रामध्ये फोकल अबलेशनचा वापर केला जातो, कॅन्सर रुग्णांच्या देखभालीमध्ये ही खूप मोठी भरारी आहे. जराही चूक न होता, संपूर्ण देखभाल करत प्रोस्टेट कॅन्सर नेमका जिथे झाला आहे त्या जागी उपचार करण्याचा टार्गेटेड दृष्टिकोन यामध्ये अवलंबिला जातो.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईचे रोबोटिक सर्जरीचे हेड आणि सर्जिकल ऑन्कोलॉजीचे कन्सल्टन्ट डॉ युवराज टी बी यांनी सांगितले, “कॅन्सरवरील पारंपरिक उपचारांना नॉन-इन्व्हेसिव्ह पर्याय असलेले HIFU हे लोकलाईज्ड प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांसाठी आदर्श आहे. फोकल अबलेशनमध्ये जिथे कॅन्सरची जखम किंवा ट्युमर आहे फक्त त्याच जागी लक्ष केंद्रित आणि टार्गेट करून, अति तापमानाचा वापर करून कॅन्सर पेशी नष्ट केल्या जातात. प्रोस्टेट ग्रंथींच्या इतर भागांमध्ये सर्वसामान्य पेशींना कोणतेही नुकसान होणे टाळले जाते. रेडिएशनसारख्या आधीच्या उपचारांनंतर बचाव उपचार करू पाहणाऱ्या रुग्णांसाठी देखील HIFU लाभदायक ठरू शकते.”

प्रोस्टेट कॅन्सर हा भारतामध्ये पुरुषांना होणाऱ्या, सर्वात जास्त प्रमाण असलेल्या पहिल्या दहा कॅन्सरपैकी एक आहे. त्यामुळे प्रोस्टेट कॅन्सरवरील उपचारांमध्ये प्रगती घडवून आणण्यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने HIFU आणणे हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे. आरोग्य देखभाल क्षेत्रातील दिग्गजांच्या दूरदर्शी मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलने प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये अत्याधुनिक प्रगती घडवून आणण्यासाठी सातत्याने गुंतवणूक केली आहे. नावीन्यपूर्णतेप्रती या वचनबद्धतेमुळे प्रोस्टेट कॅन्सरचे निदान करण्यात आलेल्या रुग्णांना सर्वात जास्त प्रभावी आणि शरीरावर कमीत कमी चिरा, जखमा करून करता येतील असे उपचार मिळतील.

HIFU मुळे रुग्णांना अनेक वेगवेगळे लाभ मिळतात. हे उपचार शरीरावर कमीत कमी चिरा देऊन करता येत असल्याने पारंपरिक सर्जिकल प्रक्रियांमध्ये संभवणारी गुंतागुंत होण्याचा धोका लक्षणीय प्रमाणात कमी होतो. HIFU सर्वसाधारण ऍनेस्थेशिया देऊन करता येते, त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेदरम्यान रुग्ण आरामात राहू शकतो. हे तंत्रज्ञान अतिशय अचूक असल्यामुळे आजूबाजूच्या टिश्यूना काहीही नुकसान होत नाही, दीर्घकाळपर्यंत टिकून राहतील असे साईड इफेक्ट्स होण्याचे प्रमाण कमी होते आणि रुग्णाची जीवन गुणवत्ता टिकवून ठेवली जाते.

कमीत कमी वेदना आणि असुविधा सहन करून रुग्णांना हे उपचार करून घेता येतात, तसेच उपचारांनंतर आपली दैनंदिन कामे करू लागणे हे कमीत कमी दिवसात सुरु करता येते. प्रोस्टेट कॅन्सरवरील इतर उपचारांमध्ये होणारे, असंयम आणि नपुंसकत्व असे साईड इफेक्ट्स होण्याचा धोका HIFU मध्ये कमी असतो.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबईचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, “शरीराचे नुकसान कमीत कमी होईल आणि उपचारांचा प्रभाव जास्तीत जास्त होईल अशा प्रकारे अतिशय अचूक उपचारांच्या साहाय्याने आमच्या रुग्णांना कॅन्सरच्या विरोधात लढण्यात मदत करावी हे आमचे लक्ष्य आहे. या संदर्भात HIFU अतिशय उपयुक्त आहे. यामुळे आम्ही कॅन्सरवरील उपचारांचा आणखी एक पर्याय उपलब्ध करवून दिला आहे, इतकेच नव्हे तर, आमच्या रुग्णांना उपचारांमधून मिळणारा चांगला आणि सहज अनुभव देखील वाढला आहे. आमच्या रुग्णांना सर्वात जास्त प्रगत व प्रभावी उपचार पुरवण्यात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आघाडीवर आहे ही आमच्यासाठी अतिशय अभिमानास्पद बाब आहे.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar