जगात सर्वात आधी भारतात सादर झाली नवी किया सॉनेट : नवीन शानदार डिझाइन, एडीएएस आणि स्टँडर्ड म्हणून 6 एअरबॅग्जसह या सर्वात प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्हीने टाकले पाऊल

.

जगात सर्वात आधी भारतात सादर झाली नवी किया सॉनेट : नवीन शानदार डिझाइन, एडीएएस आणि स्टँडर्ड म्हणून 6 एअरबॅग्जसह या सर्वात प्रीमियम कॉम्पॅक्ट एसयूव्हीने टाकले पाऊल

नवीन स्पोर्टीअर, भारदस्त सॉनेट आता 25 पेक्षा सुरक्षा वैशिष्ट्यांसह येते. या श्रेणीतील सर्वोत्तम 10 स्वायत्त वैशिष्ट्यांसह एडीएएस  आणि 15 मजबूत उच्च सुरक्षा देणारे फीचर्सही यात समाविष्ट आहेत.
तंत्रज्ञानाच्या दृष्टीने सर्वात प्रगत कॉम्पॅक्ट एसयूव्ही, ज्यात 70 पेक्षा अधिक कनेक्टेड कार फीचर्स आहेत.
डिझेल पॉवरट्रेनसोबत आता सॉनेटच्या सर्व आवृत्त्यांत पुन्हा मॅन्युअल ट्रान्समिशनची सुविधा देण्यात आली आहे.
पल्या सर्व कारमध्ये (कॅरेन्स, सेल्टोस, सॉनेट आणि ईव्ही 6) मानक म्हणून 6 किंवा त्यापेक्षा जास्त एअरबॅग्ज देणारी किया हा भारतातील सर्वात युवा मोबिलिटी ब्रँड ठरला आहे.

पणजी: भारतातील सर्वात अग्रगण्य अन् लोकप्रिय प्रीमियम कार निर्माता कंपनी कियाने आता दुसऱ्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या आपल्या आविष्काराचा नवा अवतार ‘द न्यू सॉनेट’ सादर केला आहे. ही कार सर्वात आधी भारतीय बाजारपेठेत उतरवली जात आहे. तंत्रज्ञानस्नेही अन् एकाच ठिकाणी सर्व वैशिष्ट्यांचा अंतर्भाव असलेल्या वाहनांच्या शोधात असलेली आधुनिक जोडपी तसेच व्यावसायिकांना लक्षात घेऊन ही सर्वात भारदस्त आणि स्पोर्टीअर नवी सॉनेट डिझाइन करण्यात आली आहे. या कारमध्ये 10 स्वायत्त फीचर्ससह एडीएएस, पुढील भागात धडक होऊ नये म्हणून मदत करणारी यंत्रणा – फ्रंट कोल्यूजन अव्हॉयडन्स असिस्ट, लीडिंग व्हेइकल डिपार्चर अलर्ट आणि एकाच लेनमध्ये राहण्यासाठी सहाय्यकारी – लेन फॉलोइंग असिस्ट या वैशिष्ट्यांचा कारमध्ये समावेश करण्यात आला आहे. मजबूत 15 हायसेफ्टी फीचर्सच्या अंतर्भावासोबतच सॉनेट आता 25 पेक्षा सुरक्षात्मक वैशिष्ट्यांसोबत येते. या श्रेणीत 15 स्टँडर्ड सुरक्षात्मक वैशिष्ट्यांसह येणारी नवी सॉनेट ही एकमेव कॉम्पॅक्ट एसयूव्ही ठरली आहे. इतकेच नव्हे तर, नव्या सॉनेटमध्ये या श्रेणीतील 10 सर्वोत्तम फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यात ड्युअल स्क्रीन कनेक्टेड पॅनल डिझाइन, मागील दारावरील सनशेड कर्टन सर्वच दरवाजांत पॉवर विंडो आहेत, त्याही सुरक्षेसह वन टच ऑटो अप-डाऊनसह. आणि आणखी काही वैशिष्ट्यांचे नाव घ्यायचे म्हटले तर नव्या सॉनेटमध्ये विषाणू आणि जीवाणूंपासून सुरक्षेसाठी स्मार्टप्युअर एअर प्युरिफायरही देण्यात आले आहे.
कॅरेन्स आणि श्रेणीत प्रथम सेल्टोसमध्ये या उद्योगातील पहिल्याच 6 स्टँडर्ड एअरबॅग्ज सादर करण्याचा बहुमान पटकावल्यानंतर किया सुरक्षात्मक मापदंडांना पुन्हा नव्याने पारिभाषित करत आहे. एक मानक वैशिष्ट्य म्हणून 6 एअरबॅग्ज देत नव्या सॉनेटने कियाचे स्थान आणखीच भरभक्कम केले आहे, जो आपल्या सर्व वाहनांमध्ये 6 ते 8 एअरबॅग्ज देणारा सर्वात युवा ब्रँड ठरल आहे.

नव्या सॉनेटच्या भारतातील द्वितीय वर्ल्ड प्रीमियरबाबत बोलताना किया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ ताई-जिन पार्क म्हणाले की, “भारतातील आमच्या यशस्वी प्रवासामागे सेल्टोस पाठोपाठ सॉनेटचेही एक विशेष स्थान आहे. अभूतपूर्व वैशिष्ट्ये आणि डिझाइनसोबत भारतात सादर झाल्यानंतर सॉनेटने आता देशांच्या सरहद्दी पार केल्या आहेत. ही कार आता 100 पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात केली जात आहे. सॉनेट चालवण्याचा आनंद घेणाऱ्या 3.68 लाख ग्राहकांची मांदियाळी आम्ही जमवली असून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. नव्या सॉनेटच्या माध्यमातून मूल्याआधारित मालकी अनुभवासोबत तिच्या उच्च दर्जाच्या सुविधांचे सहजपणे एकत्रीकरण करणे हा आमचा उद्देश आहे. यातून मेंटेनन्सवरील कमीत कमी खर्च अन् जास्तीत जास्त पुर्नविक्री मूल्य ग्राहकाला मिळावे, हा हेतू आहे. हे अनोखे कॉम्बिनेशन आधुनिक ग्राहकांच्या व्यापक वर्गाशी मेळ जुळवून घेणारे ठरणार आहे. नवी सॉनेट बाजारात उतरवून कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत अग्रगण्य स्थान मिळवण्याचा उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar