जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या आतंकवाद्यांना कारागृहातून न सोडण्याचा कडक कायदा करावा

.
जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या आतंकवाद्यांना कारागृहातून न सोडण्याचा कडक कायदा करावा ! – प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक

      ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली गावात जाऊन राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने कारवाई केली. यामध्ये पकडलेल्या साकीब नाचन आणि त्याच्या सहकार्‍यांना पाकिस्तान, इराक आणि सीरिया आदी देशांतून त्यांना अर्थपुरवठा आणि इशारे दिले जात होते, असे अनुमान होते. पडघा-बोरीवली या मुसलमानबहुल गावात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे 15 पोलीस अधिकारी आणि 400 स्थानिक पोलीस जेव्हा गेले तेव्हा त्यांना धाडी घालून कारवाई करता आली. यासंदर्भात पक्के पुरावे मिळाले तेव्हाच पुढील कारवाई केली गेली. त्यामुळे भविष्यातील संभाव्य हल्ले किंवा वाईट घटना टाळण्यात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला यश आले, असे मानावे लागेल. वर्ष 2002 च्या मुंबई बॉम्बस्फोटात शिक्षा भोगलेल्या आतंकवादी साकीब नाचनला शिक्षा पूर्ण होण्यापूर्वी सोडण्यात आले. जन्मठेपेची शिक्षा दिलेल्या आतंकवाद्यांना कारागृहातून सोडण्याची परवानगी न्यायाधीश आणि सुरक्षा यंत्रणा यांना देऊ नये असा कडक कायदा भारत सरकारने करावा, अशी मागणी निवृत्त पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित यांनी केली. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘मुंबईजवळ गाझापट्टी ?’ या विषयावर आयोजित विशेष संवादात बोलत होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली येथील प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

या वेळी श्री. दीक्षित पुढे म्हणाले, ‘‘अमेरिकेसारख्या देशात जन्मठेप किंवा 50 ते 100 वर्ष कारागृहात शिक्षा सुनावलेल्या दोषींची शिक्षा कमी करत नाहीत. जामीन, पेरोल किंवा अन्य कारणाने आतंकवाद्यांची शिक्षा कमी करू नये; कारण ते कारागृहातून बाहेर आल्यावर चुकीचीच कृत्ये करणार ! आतंकवाद्यांना उच्च सुरक्षा असलेल्या कारागृहात ठेऊन त्यांना पूर्ण शिक्षा भोगायला लावली पाहिजे. अनेक मुसलमान तरुणांचा ‘ब्रेनवॉश’ केल्याने ते सुशिक्षित जरी असले तरी ते आतंकवादी कारवायांत गुंतलेले आढळतात. भिवंडीसह भारतात कुठेही आतंकवादी किंवा चुकीच्या कृती दिसल्यास नागरिकांनी पोलीस-प्रशासनाला पुढील कारवाईसाठी माहिती द्यावी, असे आवाहनही श्री. दीक्षित केले.

     ‘विश्व हिंदु परिषदे’चे कल्याण विभागाचे मंत्री श्री. मनोज रायचा म्हणाले की, वर्ष 2012 मध्ये साकीब नाचन गटाने माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. त्या काळात साकीब नाचन गटाने हिंदुत्वाचे काम करणार्‍या 3 प्रमुख लोकांची हत्या केली. भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली गावात भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्वातंत्र्यसैनिकांविषयी पाटी लावण्यालाही येथील कट्टर मुसलमानांनी विरोध केला. या गावाला त्यांनी ‘अल् शाम’ असे इस्लामी नाव दिले आहे. येथे ‘हमास’, ‘इसिस’चे झेंडे फिरवले जाते. भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली आणि जवळच्या गावात ‘इस्लमिक स्टेट’ करण्यासाठी शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. पूर्वी भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरीवली आणि नजीकच्या गावांत पूर्वी पोलीस सुद्धा यायला घाबरायचे. आता स्थिती थोडी बदलली आहे.

आपला नम्र,
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
(संपर्क : 99879 66666)

———————
Photo Caption !

Praveen Dixit: प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar