हणजूण, स्टारको जंक्शन येथील रस्त्याच्या बाजूला असलेले व वाहतुकीस अडथळा ठरणारे फूड कार्ट

.
हणजूण, स्टारको जंक्शन येथील रस्त्याच्या बाजूला असलेले व वाहतुकीस अडथळा ठरणारे फूड कार्ट
( खाद्यपदार्थ पुरवणारी वाहने ) दि. 24 डिसेंबर पूर्वी त्या ठिकाणाहून एक हटवण्याचा एक मुखी  निर्णय घेण्यात आला.
        नाताळ, सनबर्न व व वर्ष अखेरच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या वाहतूक कोंडीचा आढावा घेण्यासाठी हणजूण पोलीस स्थानकात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला शिओली मतदार संघाचे आमदार तथा गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्ष डिलायला लोबो, निरीक्षक प्रशाल देसाई, वाहतूक पोलीस निरीक्षक गौरीश परब, सरपंच लक्ष्मीदास चिमुलकर, उपसरपंच अग्नीस कार्वालो, पंच सदस्य दिनेश पाटील, समाजसेवक गजानन तळवे, हणजूण कायसुव रस्ता सुरक्षा व वाहतूक व्यवस्थापन समितीचे सदस्य रमेश नाईक, मारियानो फर्नांडिस, मायकल डिसोजा, माजी उपसरपंच हनुमंत गोवेकर उपस्थित होते.
        यावेळी आमदार डिलायला लोबो यांनी नाताळ, सनबर्न व नववर्षाच्या वेळी हणजूण येथील वाहतूक व्यवस्था कशी असेल याची माहिती वाहतूक पोलीस  निरीक्षकांकडून जाणून घेतली तसेच वाहतुकीस अडथळे ठरणारे फोर्ट कार्ट काढण्याचे निर्देश दिले.
    फोटो… हणजूण येथील वाहतूक समस्येवर मार्गदर्शन करताना आमदार डिलायला लोबो.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें