मराठी प्रेमी व निवृत्त शिक्षक महाबळेश्वर परब खोर्जूवेकर यांचे निधन
म्हापसा दि २६(प्रतिनिधी ):-म्हापशातील सरकारी निवृत्त शिक्षक तथा कट्टर मराठी प्रेमी, साहित्यिक व समाजसेवक महाबळेश्वर विनायक परब खोर्जूवेकर (वय ९५ आल्त धुळेर म्हापसा )यांचे आज सोमवार दि २५ डिसेंबर रोजी पहाटे राहत्या घरी अल्पआजाराने निधन झाले.
महाबळेश्वर परब खोर्जूवेकर हे जाज्वल्य मराठी प्रेमी होते. गोव्याची भाषा मराठी होण्यासाठी त्यांनी स्व. शशिकांत नार्वेकर, स्व. प्रा. गोपाळराव मयेकर, अँड. रमाकांत खलप व इतर नेत्याबरोबर भाग घेतला. ते सरकारी मराठी प्राथमिक विद्यालयाचे शिक्षक म्हणून अनेक वर्षे अल्प पगारावर नोकरी केली. आणि त्यावेळी विध्यार्थ्यांना वह्या पुस्तके घेण्यासाठी पैसे नव्हते त्यावेळी ते अशा गरीब विधार्थाना आर्थिक मदत करीत असत. त्यांना गोमंतक मराठी अकादमीचा उत्कृष्ट मराठी शिक्षक म्हणून पुरस्कार देण्यात आला होता.
गेल्या आठ दिवसापासून ते किरकोळ आजारी होते. आज त्यांचे पहाटे निधन झाले. आजच दुपारी १ वाजता दत्तवाडी म्हापसा येथील बैकूठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाची वार्ता समजताच शिक्षक, मराठीप्रेमी व इतर नागरिकांनी अंत्यदर्शन घेतले. त्याच्यामागे पत्नी, दोन मुलगे, सून, पाच विवाहित मुली, जावई, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे.