गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक – नादिर गोदरेज
२०२३ ला निरोप देताना आणि नवीन वर्षाचे स्वागत करत असताना जागतिक आर्थिक स्थिती अंदाज वर्तवता येणार नाही अशी कायम राहिली आहे. जग मंदी आणि अनिश्चिततेचा सामना करत असताना भारतीय अर्थव्यवस्था मात्र गतीशीलतेने उभी आहे. डिकार्बोनायझेशनचे प्रबळ प्रयत्न आणि २०३० पर्यंत ५०० GW अक्षय ऊर्जेचे लक्ष्य ठेऊन शाश्वत भविष्याकडे वाटचाल करत आहे. भू-राजकीय गोंधळाची परिस्थिती आणि आर्थिक बाजारपेठेतील अस्थिरतेच्या दरम्यान भारत स्थैर्याचे प्रतीक म्हणून उदयास येत आहे. आपण या अनिश्चिततेमध्ये मार्गक्रमण करत असताना हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की संभाव्य अनिश्चित परिस्थितींमध्ये समाविष्ट आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक कृतीची गणना केली पाहिजे. आव्हाने असूनही, भारत विशेषत: शाश्वतता, पर्यावरण आणि स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीसाठी आकर्षक संधी उपलब्ध करून देत आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणावरही भर दिला पाहिजे. भारतात विविध सेवांमध्ये महिलांची संख्या वाढवण्याची गरज आहे. तसे केल्यास मोठा आर्थिक फायदा होईल. त्यासाठी वेळ लागेल; पण त्याचा फायदा होईल, हे निश्चित. २०२४ च्या उंबरठ्यावर उभे असताना मला ठाम विश्वास आहे की जगातील ५ वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले अभिवचन आणि क्षमता सादर करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक भारताकडे आहेत.