शिवोली गट काँग्रेसतर्फे पक्षाचा स्थापनादिन साजरा

.

शिवोली गट काँग्रेसतर्फे पक्षाचा स्थापनादिन साजरा

३ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार

म्हापसा, दि. ३० (प्रतिनिधी) :

शिवोली गट काँग्रेस समितीतर्फे काँग्रेस पक्षाचा स्थापनादिन बादें-कायसूव येथे साजरा करण्यात आला. या वेळी उद्योजक तथा काँग्रेसचे राज्यस्तरीय नेते बाबी बागकर गोकुळदास नाईक, जॉन डिसोझा व दिगंबर सावंत अशा तिघा ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास शिवोली गटाध्यक्ष पार्वती नागवेकर, प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य राजेश कोचरेकर, शिवोली गट सेवादलाचे अध्यक्ष अनिल भोसले, शिवोली गट महिला अध्यक्ष हर्षा साळगावकर व पक्षाचे कार्यकर्ते राजन घाटे यांची उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे बाबी बागकर यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकावण्यात आला. येत्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहन बागकर यांनी या वेळी केले.

शिवोली गट समितीच्या अध्यक्ष पार्वती नागवेकर यांनी स्वागत केले, तर सूत्रसंचालन राजन घाटे यांनी केले. येत्या लोकसभा निवडणुकीवेळी शिवोली मतदारसंघातून मागील वेळापेक्षा जास्त आघाडी काँग्रेसला मिळवून देण्याचा निर्धार या वेळी करण्यात आला. त्या निवडणुकीत पंधरा हजारांहून अधिक मतदान काँग्रेसला मिळवून देण्याच्या दृष्टीने काँग्रेस कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत, अशी माहिती पार्वती नागवेकर यासंदर्भात बोलताना दिली.

 

फोटो कॅप्शन :

शिवोली गट काँग्रेस समितीतर्फे आयोजित कार्यक्रमात सत्कारमूर्तींसमवेत गटाध्यक्ष पार्वती नागवेकर, बाबी बागकर, राजेश कोचरेकर, अनिल भोसले, राजन घाटे, हर्षा साळगावकर व काँग्रेसचे अन्य कार्यकर्ते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें