कुचेली तीन माड सडये शिवोली येथील श्री समर्थ रामदास सेवा भक्ती मंडळ येथे समर्थ रामदास स्वामी यांची नूतन मुर्ती ची स्थापना मंगळवार दिनांक 2 जानेवारी ते गुरुवार 4 जानेवारी या कालावधीत वे.शा. विनायक भट यांच्या वैदिक मार्गदर्शनाखाली सुसंपन्न होणार आहे त्या अनुषंगाने विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे मंगळवार दिनांक २ रोजी सकाळी धार्मिक विधी .यजमान सौ सोनीया व श्री सदानंद गणेश गोवेकर.
बुधवार दिनांक 3 रोजी सकाळी धार्मिक विधी दिनांक 4 रोजी मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा सकाळी आठ वाजता धार्मिक विधी सकाळी 10:३४ या शुभमुहूर्तावर शिवशंकर मयेकर यांच्या उपस्थितीत आणि परमपूज्य योगेशबुवा व रामदासी यांच्या हस्ते श्रीची मूर्ती स्थापना त्यानंतर महापूजन दुपारी साडेबारा वाजता सज्जनगड सातारा येथून खास उपस्थित असलेले समर्थ भक्त व परमपूज्य मारुती बुवा यांचे शिष्य योगेशबुवा रामदासी यांचे मनोगत तद नंतर आरती संध्याकाळी सात वाजता जगन्नाथ मांद्रेकर याचा भजनाचा कार्यक्रम कार्यक्रमाचे मुख्य यजमान सोनिया व श्री सदानंद गणेश गोवेकर, सहाय्यक यजमान ऋतुजा व श्री मधुकर नाईक ,गौरी व चेतन ताम्हणकर शीतल व श्री शशिकांत कोचरेकर प्रतिमा व श्री हनुमंत दाभोलकर, विश्रांती व श्री विश्वास चोपडेकर तरी सर्व भक्ताने याचा लाभ घ्यावा असे समर्थ रामदास सेवा भक्ती मंडळ यांनी कळविण्यात आले आहे.