*वेशभूषा स्पर्धेत उगवलेला माऊसवाडा पेडण्याचा तारा कु. दक्ष गौरेश मळीक..
.!*
सण, उत्सव सुरू झाले की गावागावात सिने-नृत्य व वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले जाते. अंगभूत कलागुणांना संधी देण्याची ती प्रथम पायरी असते. त्या संधीचे सोने करायचे काम प्रत्येक मुलाच्या पालकांनी करायचे असते.
गायनाचे कोणतेही शास्त्रोक्त
शिक्षण नसताना सारेगमप लिटल चाम्पस मध्ये गौरी पगारे अव्वल आली आणि सगळ्याच्याच नजरा तिच्याकडे वळल्या. वास्तविक हि-याला पैलू पाडले तरच तो चमकतो. कोंदणात घातला की त्याची किंमत वाढते. काही मुलांच्या अंगी कलेचे ऊपजतच गुण असतात, कुणीतरी त्यांच्या गुणाना हेरून त्याला पैलू पाडावे लागतात.
स्पर्धा म्हटली की तिच तिच मुले स्पर्धेला वर्णी लावतात, परंतु असा एखादाच नवोदीत कलाकार रंगमंचावर वेगळं काहीतरी घेऊन येतो आणि सगळ्याच्याच नजर स्वतःवर खिळवून ठेवण्यात यशस्वी होतो. पदार्पणातच कधीकधी बाजी मारून जातो. काहीतरी हटके करतो म्हणूनच त्याच्या अभिनयावर नजर खिळून राहते.
अखिल गोवा राज्य वेशभूषा स्पर्धेच्या निमित्ताने मी हजर होतो. त्याच त्याच वेशभूषा आणि तिच तिच मुलं पाहून आपल्याही त्या अंगवळणी पडतात. आणि अचानक दक्ष मळीक हे नाव उच्चारण्यात आले. संपुर्ण काळेकुट्ट अंग, पांढरेशुभ्र धोतर, त्यावरकाळे जॅंकेट आणि खांद्यावर घोंगडी. डोक्यावर पांढरी पगडी हातात बांबूचा दंडुका आणि एका हातात पेटती मशाल….दक्ष मळीकची आगळी वेगळी वेशभूषा, मी पहात होतो. तो स्टेजवर आला तोच मुळी करारी नजर फिरवित सगळ्यांकडे पाहू लागला. त्याने संपुर्ण रंगमंच काबिज केला होता. आपल्या करारी वाणीने तो संवाद म्हणू लागला. पुर्वीचा कोणताही अनुभव नाही, परंतु तो आला आणि पदार्पणातच तृतिय क्रमांक जिंकून गेला.
नंतर त्याची भेट घेवून अभिनंदन केलं. तेव्हा तो भारावून गेला होता. माझ्या शेजारची मुले ठिकठिकाणी स्पर्धेसाठी जातात. आई-वडीलांच्या तोंडात त्यांची नावे मी सतत ऐकत होतो. मलाही वाटायचे की मी सुध्दा अशाच स्पर्धेत ऊतरावे. माझी आई दर्शना आणि बाबा गौरेश यांनी माझी आवड लक्षात घेऊन श्रीकृष्णाची भूमिका करावी असे त्याना वाटे. मला माझा शेजारी नाट्यकलाकार उदय गुरव यांचे मार्गदर्शन घ्यावे म्हणून मी त्याचे घर गाठले. श्रीकृष्णाची भूमिका माझ्या साठी पदार्पणातच का नको हे माझ्या आई-बाबाना पटवून दिले. इतर स्पर्धक करतात त्याच वेशभूषा करण्यात काय वेगळेपण आहे ? तू “राखणदार” ची वेशभूषा कर असे सुचवीले व त्यानी “राखणदार” चे संवाद मला लिहून दिले व मार्गदर्शन केले. ३१ डिसेंबरला मी सर्व तयारीनिशी स्टेजवर चढलो. पदार्पणातच मी तिसरा आलो. हुरूप आला. मी तिसरा आलो. माझे काका तेजस मळीक यांनी माझी वेशभूषा केली होती. संपूर्ण रंगमंचावर फेरी मारली पाहिजे, हे प्रत्येकजण सांगत होता. आता नवीन नवीन भूमिका करायच्या आहेत. संपुर्ण गोव्यात मला खूप बक्षिसे मिळाली आहेत. नवीन हुरूप आला. रंगमंचाची प्रथम वाटणारी भीती आता कुठल्याकुठे पळून गेली.
*अखिल गोवा राज्य स्पर्धा…. दक्ष मळीक याला मिळालेले पुरस्कार.*
[१] लक्ष्मी कला व क्रीडा, संघ, पेडणे….वेषभूषा स्पर्धेत “राखणदार” या वेशभूषेसाठी तृतीय क्रमांक.
[२] सोमनाथ कला व क्रीडा संघ, कोंडलवाडा पेडणे… चतुर्थ क्रमांक
तालुका पातळीवरील स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर मी अखिल गोवा पातळीवर विविध स्पर्धेत भाग घेतला आणि भरपूर बक्षिसे पटकावली.
[२] साई संस्थान, साईमंदिर ….गोमुख तिर्थक्षेत्र पणजी. प्रथम क्रमांक.
[३] पेडणे शिगमोत्सव समिती. ज्युनियर विभागात द्वितीय क्रमांक.
[४] मांद्रे शिगमोत्सव समिती, प्रथम क्रमांक.
[५] गोवा पर्यटन खात्यातर्षे आयोजित केलेल्या स्पर्धेत …..प्रथम क्रमांक.
[६] युनिटी आॕफ अंजूनातर्षे आयोजित अंजुना मैदानात आयोजित केलेल्या वेषभूषा स्पर्धेत..द्वितीय क्रमांक.
[७] वक्रतुंड कला क्रीडा मित्रमंडळ, बाजारपेठ, दोडामार्ग..द्वितीय क्रमांक.
आता नवीन भूमिका, नवे संवाद यांच्या प्रयत्नात आहे. नवीन वर्षात नव्या जोमाने मी स्पर्धेत भाग घेणार आहे.
वेशभूषा स्पर्धेत उगवलेला माऊसवाडा पेडण्याचा तारा कु. दक्ष गौरेश मळीक..

.
[ays_slider id=1]