*यु. एस. पोलो असोसिएशनतर्फे एम. जी. मार्ग, पणजी येथे नवीन ब्रँड दालनाचे उद्घाटन*
*गोवा, ८ जानेवारी २०२४* – यु. एस. पोलो असोसिएशन या भारतातील आघाडीच्या व जगप्रसिद्ध युनायटेड स्टेट्स पोलो असोसिएशनच्या (युएसपीए) कॅज्युअलवेयर ब्रँडने पणजी, गोवा येथे नवे दालन सुरू केले आहे. एम. जी. रस्त्यावरील हे नवीन दालन २२३७ चौरस फुटांच्या प्रशस्त जागेत वसलेले असून तिथे ब्रँडचे अद्ययावत ऑटम- विंटर कलेक्शन सादर करण्यात आले आहे. या भव्य दालनाच्या लाँचप्रसंगी यु. एस. पोलो असोसिएशन परिवारातील १०० पेक्षा जास्त कर्मचारी खास बेंगळुरूवरून गोव्यात हा महत्त्वाचा क्षण साजरा करण्यासाठी आले होते.
पोलो या खेळाशी असलेले अस्सल नाते दर्शवणाऱ्या या आधुनिक दालनात, या खेळाशी संबंधित अॅक्सेसरीज ठेवण्यात आल्या आहेत. दालनाची सजावट ग्राहकांना खरेदीचा खास अनुभव मिळेल आणि ब्रँडचा प्रवास उलगडेल अशा पद्धतीने करण्यात आली आहे.
एम. जी. मार्गावर दोन मजल्यांमध्ये वसलेले हे नवे ब्रँड दालन ‘रिब्रँडेड आयडेंटिटी’सह (नवीन प्रतिमेसह) सजवण्यात आले असून शुभ्र सजावटीला ब्रँडचे रंग, लाकूड, धातू आणि काँक्रीटच्या तपशीलांतून उठाव देण्यात आला आहे. या दालनामध्ये एक खास भिंत देण्यात आली आहे, जी पोलोचे स्पिरीट – अभिजात आणि ठेहराव दर्शवणारी आहे.
यु. एस. पोलो असो. – अरविंद फॅशन्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ सुरी म्हणाले, ‘गोव्याच्या निसर्गाने भरलेल्या सुंदर भूमीत यु. एस. पोलो असोसिएशन दालनाचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. हा क्षण ब्रँडसाठी लक्षणीय आहे. आमच्या ब्रँडचा कालातीत सुसंस्कृतपणा आणि अभिजातता या किनारी प्रदेशात उपलब्ध करून देताना आम्ही भारावून गेलो आहोत. आमच्या यु. एस. पोलो असो. परिवारातील १०० ध्यासपूर्ण कर्मचाऱ्यांनी या उद्घाटनप्रसंगी लावलेली हजेरी दालनाचा आनंद द्विगुणित करणारी आहे. एम. जी. मार्गावरील यु. एस. पोलो असोसिएशन दालनात युएसपीए मेनलाइन, युएसपीए स्पोर्ट, डेनिम अँड कं., फुटवेअर, अॅक्सेसरीज व इनरवेयर उत्पादन श्रेणी पाहायला मिळणार आहे.’