पुनर्संचयित पर्यटन अर्थात रिजनरेटिव्ह टुरिझम सुरू करणारे गोवा ठरले भारतातील पहिले राज्य

.

पुनर्संचयित पर्यटन अर्थात रिजनरेटिव्ह टुरिझम सुरू करणारे गोवा ठरले भारतातील पहिले राज्य

10 जानेवारी 2024, पणजी, गोवा: गोवा मुक्तीच्या बासष्टव्या वर्धापनदिनानिमित्त, एकादश तीर्थ, पुनर्संचयित पर्यटनासाठी अर्थात रिजनरेटिव्ह टुरिझमसाठी एक आदर्श म्हणून तयार करण्याची घोषणा करताना गोवा पर्यटनाला आनंद होत आहे. अध्यात्म, स्वदेशीता, सभ्यता आणि सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि जागरूक पर्यटन या चार मार्गांद्वारे पर्यावरण पुनर्संचयन, सांस्कृतिक जतन आणि समुदाय सशक्तीकरण यांना प्रोत्साहन देऊन भारतातील पर्यटन उद्योगाला नवे रूप देणे हा या अभिनव दृष्टिकोनाचा उद्देश आहे.
1980 च्या जागतिक पर्यटनाचे प्रसिद्ध मनिला घोषणापत्र आणि अलीकडच्या जी 20 पर्यटन मंत्र्यांच्या कार्यगटाची गोव्यातील बैठक आणि शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गोवा राजमार्ग म्हणून पर्यटनाचा मार्ग तयार करण्यात आला आहे. गोव्यातील पर्यटन भारतातील पुनर्संचयित पर्यटनाच्या प्रारूपामध्ये राज्याचे रूपांतर करण्याचे आश्वासन देते.
“एकादश तीर्थाच्या शुभारंभासह, आम्ही अध्यात्म, स्वदेशीता, सांस्कृतिक आणि सभ्य राष्ट्रवाद आणि जागरूक पर्यटनावर भर देऊन भारतीय पर्यटनाला एक नवीन स्वरूप देत आहोत. प्रवास आणि तीर्थयात्रांद्वारे, भारतीय लोकांनी त्यांचे भौगोलिक ज्ञान हजारो वर्षांमध्ये विस्तारले आहे, स्वतःला प्रादेशिकता आणि संकोचवादाच्या बंधनांपासून मुक्त केले आहे. आम्ही ज्या पर्यावरण, संस्कृती आणि समुदायांशी संवाद साधतो त्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि हे गोव्यातील पुनर्संचयित पर्यटनाला आमच्या समर्थनातून दिसून येते. पर्यावरण आणि मानवी लोकसंख्येला लाभदायक अशा शाश्वत पद्धतींचा प्रवास आणि पर्यटन क्षेत्राला अवलंब करण्यास प्रोत्साहित करणे, हे प्रारूप सादर करण्यामागचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे गोव्याचे पर्यटनमंत्री श्री. रोहन अ. खंवटे म्हणाले.
संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक पर्यटन संघटनेने पुनर्संचयित पर्यटनाची परिभाषित केलेली व्याख्या “पर्यटन जे त्याच्या वर्तमान आणि भविष्यातील आर्थिक, सामाजिक आणि पर्यावरणीय प्रभावांचा संपूर्ण लेखाजोखा घेते, अभ्यागत, उद्योग, पर्यावरण आणि यजमान समुदायांच्या गरजा पूर्ण करते” अशी आहे. एकादश तीर्थ म्हणजेच अध्यात्मिक स्थळांच्या आजूबाजूच्या समुदायांशी सल्लामसलत करून पर्यटन विभागाकडून आध्यात्मिक स्थळे निश्चित केली जातील.
“अभ्यागत आणि यजमान यांच्यात परस्पर आदर आणि सन्मान विकसित करणे ही मुख्य गोष्ट आहे. आपण सर्वजण या प्रकल्पात सामील आहोत आणि हा प्रकल्प आपला आहे ही स्व‍त्वाची भावना असणे महत्त्वाचे आहे. आमचे लक्ष समुदाय तयार करणे आहे. एकादश तीर्थ उपक्रमामध्ये स्थानिक महिला आणि तरुणांना व्यावसायिक भागीदार बनण्याचा अनुभव घेण्यास मदत करण्यासाठी आम्ही पर्यटन क्षेत्रातील उद्योजक आणि नवोन्मेषक यांच्यासोबत चर्चा करत आहोत,” असे गोवा पर्यटन विभागाचे संचालक श्री. सुनील अंचिपाका म्हणाले.
मुक्तीनंतरच्या दशकांमध्ये, गोव्याने आपल्या ऐतिहासिक जागतिक संबंधांचा आणि आर्थिक वाढीसाठी निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांचा लाभ घेत पर्यटनाला धोरणात्मकरित्या स्वीकारले. यामुळे गोव्याला भारतातून आणि जगासाठी प्रवेशद्वार म्हणून विशिष्ट गुणधर्म प्राप्त झाले.
“थायलंड आणि इंडोनेशिया सारख्या देशांमधील स्पर्धा, क्वालालंपूर आणि बँकॉक सारखी आधुनिक शहरे आणि मोठ्या भारतीय राज्यांसह अनोख्या आव्हानांना तोंड देत, गोव्याने कोविड नंतरच्या नाविन्यपूर्ण उपायांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. तंत्रज्ञानाचा अवलंब आणि सहयोग यावर भर देऊन, पर्यटन क्षेत्रातील लोक आणि समुदायांना निर्णय घेणारे बनविण्यावर भर देण्यात आला आहे,” असे सांगत श्री. खंवटे म्हणाले की गोवा समुद्र-किनारा केंद्रित पर्यटन प्रारुपामधून अधिक समावेशक, जन-केंद्रित दृष्टीकोनातून बदलत आहे. हवामान बदल आणि लोकशाहीकरणाच्या प्रभावामुळे पुनर्संचयित पर्यटनाकडे शाश्वततेच्या पलीकडे आमूलाग्र बदलाची आवश्यकता आहे.
श्री. अंचिपाका यांच्या मते, “२०२० मध्ये नवीन पर्यटन धोरणाचा परिचय सांस्कृतिक विसर्जनाची बांधिलकी दर्शवितो. समुदायांमध्ये स्थानिक कुटुंबांद्वारे चालवल्या जाणार्‍या निवासी योजनेवर (होमस्टे) भर, अभ्यागतांना त्या ठिकाणची अस्सल संस्कृती, जीवनशैली आणि मूल्ये यांच्याशी संलग्न होऊ देतो.”
आम्ही अशा भविष्याची कल्पना करतो जिथे पर्यटक आणि यजमान समान पातळीवर असतील, जे केवळ गोवा आणि भारताचेच नाही तर पृथ्वीचेच भविष्य ठरवतील. या बदलामुळेमुळे स्थानिक समुदायांना सामर्थ्य मिळते आणि यजमान आणि पर्यटक यांच्यात सामायिक अनुभव वाढतो, असे श्री. खंवटे यांनी प्रतिपादन केले.
पुनर्संचयित पर्यटनाचे गोवा प्रारूप चार मार्गांद्वारे पर्यावरण पुनर्संचयित करणे, सांस्कृतिक संरक्षण आणि सामुदायिक सक्षमीकरणास प्रोत्साहन देईल: अध्यात्म, स्वदेशीता, सभ्यता व सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि जागरूक पर्यटन हे ते चार मार्ग आहेत.
पर्यटन आणि अध्यात्म यांच्यातील दुवा ओळखून, अध्यात्माचा मार्ग मानवाची संपूर्ण पूर्तता, शिक्षणातील योगदान, राष्ट्रांच्या नियतीची समानता, मानव मुक्ती आणि संस्कृतींच्या मौलिकतेची पुष्टी यावर भर देतो.
पर्यटन आणि स्थानिक समुदायांमधील गुंतागुंतीचे नाते ओळखून, हा मार्ग सांस्कृतिक अखंडता, सामाजिक संरचना आणि नैसर्गिक वातावरणातील आव्हानांना तोंड देताना आर्थिक संधी आणि सांस्कृतिक आदान प्रदान आणण्याचा प्रयत्न करतो.
जागतिक कल लक्षात घेऊन त्यासोबत जुळवून घेत हा मार्ग पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पर्यटनाला आर्थिक आणि व्यावसायिक मुत्सद्देगिरीचे साधन म्हणून स्थान देतो. ऐतिहासिक महत्त्वाच्या खुणा, सांस्कृतिक उत्सव आणि पारंपारिक पद्धती अधोरेखित केल्याने राष्ट्रीय अभिमान आणि अस्मितेची भावना मजबूत होते.
पर्यावरणीय समस्या, अधिवासाचा नाश आणि कचरा निर्मिती याविषयीच्या समस्यांना संबोधित करताना, हा मार्ग समुदाय-केंद्रित, पर्यावरणास अनुकूल उपक्रम, विश्वासार्ह पर्यटन पद्धती आणि शाश्वत पायाभूत सुविधांवर भर देतो.
एकादश तीर्थ मोहीम गोव्यातील अकरा प्रार्थनास्थळांच्या क्षेत्रांमध्ये उलगडते. स्थानिक समुदायांना, विशेषत: महिला आणि तरुणांना, त्यांची संस्कृती, पाककृती आणि जीवनशैली शोधण्यात, समजून घेण्यामध्ये आणि प्रक्षेपित करण्यासाठी, गोवा पर्यटनाचा त्यांच्या स्वत:च्या इतिहासाच्या आणि वारशाच्या व्यावसायिक आणि आर्थिक क्षमतेचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट आहे.
“या परिवर्तनाच्या प्रवासाला सर्वांचा पाठिंबा आणि सहभाग आवश्यक आहे. आम्ही नागरी समाजाच्या सदस्यांना लोकांचा, समुदायाचा आणि नाविन्यपूर्ण महिला आणि तरुणांचा आवाज बनण्याचे आवाहन करतो. जागरूकता पसरवण्यात आणि सकारात्मक बदलाला प्रोत्साहन देण्यासाठी तुमची भूमिका महत्त्वाची आहे. यासारख्या प्रवासासाठी मूल्यमापन, टीका आणि आदर्श आवश्यक असतात. आम्ही सर्व गोवा आणि गोवेकरांना त्यांच्या सततच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपण एकत्रितपणे पर्यावरण, संस्कृती आणि समुदायांवर सकारात्मक प्रभाव टाकून पुनर्संचयित पर्यटनाचे भविष्य घडवूया,”असे आवाहन पर्यंटनमंत्री श्री. खंवटे यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें