
पर्यावरण रक्षण कायद्याचे उल्लंघन केल्या प्रकरणी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने हणजूण, सेबीस्टन वाडो येथील वायनार कन्स्ट्रक्शन प्रा. ली. यांचे ला ओलालीन हॉटेलला तसेच साल्टामोंटेस गार्डन कॅफे अँड बार ला सील ठोकले.
अधिक माहितीनुसार संबंधि हॉटेलातून सांडपाणी बाजूच्या शेतात सोडण्यात येत असून त्यामुळे प्रदूषण करून शेतजमिनीचा नाश केला जात असल्याची तक्रार येथील रिटा रॉड्रिक्स यांनी दिनांक पाच जुलै 2022 रोजी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिनांक 12 जुलै 2023 रोजी प्रत्यक्ष पाहणी करून अहवाल सादर केला व 20 नोव्हेंबर 2023 रोजी या हॉटेलला कारणे दाखवा नोटीस बजावली व या बांधकाम कंपनीकडून कोणतेही उत्तर न आल्यामुळे दि. 28 डिसेंबर 2023 रोजी या बांधकाम कंपनीला हॉटेल सील करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले त्यानुसार आज दिनांक दहा रोजी बार्देश चे मामलेदार प्रवीण गावस यांच्या आदेशानुसार हणजूण चे तलाठी गौरीश नाईक यांनी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या समक्ष व हणजूण पोलिसांच्या उपस्थितीत या हॉटेलच्या दोन्ही प्रवेशद्वारांना सील ठोकले.
फोटो… हणजूण येथील वायनार कन्स्ट्रक्शन प्रा. लि. च्या संपूर्ण प्रकल्पाच्या प्रवेशद्वारांना टाळे ठोकताना हणजूण चे तलाठी तसेच गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व हणजूण पोलीस.