क्रॉम्प्टनला ११ व्या ग्लोबल सेफ्टी समिटमध्ये प्रतिष्ठेचा नॅशनल सेफ्टी अवॉर्ड २०२३ प्रदान
पणजी: क्रॉम्प्टन ग्रीव्ह्ज कन्झ्युमर इलेक्ट्रिकल्स लि. (सीजीसीईएल) या भारतातील आघाडीच्या ग्राहक इलेक्ट्रिकल कंपनीला अलीकडेच फायर अँड सेफ्टी फोरम (मुख्यालय- वर्ल्ड सेफ्टी फोरम लंडन, युनायटेड किंग्डम) आणि युनायटेड नेशन्स ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया यांनी आयोजित केलेल्या ११ व्या ग्लोबल सेफ्टी समिटमध्ये प्रतिष्ठेचा नॅशनल सेफ्टी अवॉर्ड २०२३ देऊन गौरवण्यात आले. या कंपनीला बेथोरा, गोवा येथील कारखान्यातील पंख्याच्या विभागात सुरक्षेबाबत अद्वितीय कामगिरी केल्याबाबत लार्ज एंटरप्रायझेस- इलेक्ट्रिकल कन्झ्युमर ड्युरेबल्स सेक्टर विभागात पुरस्कार देण्यात आला.हा पुरस्कार क्रॉम्प्टनला यूएन ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडियाचे कार्यकारी संचालक श्री. रत्नेश आणि जीडी गोयंका युनिव्हर्सिटीचे सीओई, ऑक्युपेशनल हेल्थ, सेफ्टी फायर अँड एन्व्हायर्नमेंटचे प्राध्यापक आणि संचालक श्री. निहाल अन्वर सिद्धिकी यांच्या हातून देण्यात आला.
भारताच्या फायर अँड सेफ्टी फोरम या २००९ पासून प्रतिष्ठित एनजीओकडून आयोजित ग्लोबल सेफ्टी समिट (जीएसएस) हा एक वार्षिक उपक्रम आहे. तिने अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट, यूएसएशी सुसंगत आंतरराष्ट्रीय प्रमाणन विकसित केले आहे. जीएसएस पुरस्कार हे सर्वाधिक प्रतिष्ठित पुरस्कार असून त्यातून पर्यावरण, आरोग्य, सुरक्षा आणि सीएसआरच्या क्षेत्रात उद्योगांच्या कामगिरीचा गौरव केला जातो. या महत्त्वाच्या कार्यक्रमात जागतिक तज्ञ आणि व्यावसायिकांना एकत्र आणले जाते तसेच सुरक्षा, शाश्वतता आणि ईसीजीमधील अद्ययावत ट्रेंड्स आणि सर्वोत्तम कार्यपद्धतींबाबत चर्चा घडवून आणली जाते. ईएसजीच्या क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींनी भारतातील विविध क्षेत्रांमधील सर्वोच्च कंपन्यांसोबत या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. या समिटमध्ये सेफ्टी अवॉर्ड, ईएसजी आणि सीएसआर एवॉर्ड्ससोबत पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार देण्यात आले आणि सुरक्षा व शाश्वततेमध्ये त्यांच्या अविस्मरणीय योगदानाचा गौरव करण्यात आला.
या निमित्ताने बोलताना क्रॉम्प्टन ग्रीव्हज कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या मॅन्युफॅक्चरींग व क्वालिटीचे उपाध्यक्ष प्रवीण सराफ म्हणाले की, “आमच्या मते एक सुरक्षित वातावरण कामाच्या ठिकाणी नावीन्यपूर्णता आणि सर्वोत्तमतेला चालना देते. त्यामुळे आम्हाला ११ व्या ग्लोबल सेफ्टी समिटमध्ये नॅशनल सेफ्टी अवॉर्ड स्वीकारताना खूप आनंद होत आहे. उत्पादन उद्योगात जिथे अचूकतेला सर्वाधिक महत्व असते तिथे आमची अत्यंत कठोर सुरक्षा प्रोटोकॉल्सचे पालन करण्याची वचनबद्धता प्रत्येक प्रक्रियेत दिसून येते. हा गौरव आम्हाला असे एक कार्यस्थळ निर्माण करण्याच्या प्रयत्नांसाठी प्रेरणा देतो, जिथे सुरक्षा फक्त आवश्यकता नाही तर एक समन्वयित वचनबद्धता आहे, जी आमच्या कर्मचाऱ्यांचे एकूण यश आणि कल्याण यांच्यामध्ये योगदान देते. पुढे जात असताना आम्ही आम्हाला हा महत्त्वाचा पुरस्कार ज्या कारणासाठी मिळाला आहे ते सर्वोच्च दर्जाचे सुरक्षा मानक कायम राखण्यासाठी आणि वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहू.”क्रॉम्प्टनचा बेथोरा गोवा येथील कारखाना तांत्रिक नावीन्यपूर्णतेचे केंद्रस्थान आहे, जिथे सुरक्षा मानकांवर फक्त पूर्तता नाही तर त्याहीपेक्षा जास्त भर दिला जातो. नॅशनल सेफ्टी अवॉर्ड २०२३ हे क्रॉम्प्टनच्या सुरक्षा आणि जबाबदारीची संस्कृती विकसित करण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे तसेच त्यांच्या कर्मचाऱ्यांना आपल्या ग्राहकांना उत्तम दर्जाची उत्पादने देताना त्यांचे कल्याण पाहण्याच्या विचारसरणीचे प्रतीक आहे.
क्रॉम्प्टनला ११ व्या ग्लोबल सेफ्टी समिटमध्ये प्रतिष्ठेचा नॅशनल सेफ्टी अवॉर्ड २०२३ प्रदान

.
[ays_slider id=1]