म्हापसा. वार्ताहर
पनवेल येथील वासुदेव बळवंत फडके नाट्य गृहात दर्पण कार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कार
(आंतरराष्ट्रीय एक्सलनस अवाॅड )पनवेल येथे संपन्न झाला .

हा कार्यक्रम पनवेल नवी मुंबई येथील वासुदेव बळवंत फडके सभागृहात संपन्न झाल्या.
गोव्यातील समाजसेवक संजय उर्फ बाबू विनौडकर तसेच पत्रलेखक तुकाराम शेटगावकर यांचा यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी बाळशाची जांभेकर पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी प्रस्तावना सादर केली. यावेळी खासदार रामशेठ ठाकूर, भारतीय पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील सोनवणे, मिसेस इंडिया डॉ. शुभदा जगदाळे, अभिनेते निलेश गोपनारायण, झी २४ तास चे संपादक निलेश खरे, डॉ. दिपक दळवी, यांची शुभेच्छा पर भाषणे झाली.
पत्रकारासह विविध क्षेत्रात आपला कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्वात महिला व पुरुषांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
फोटो
तुकाराम शेटगावकर व संजय ( बाबू) विनौडकर