रामराज्यासाठी प्रार्थनेसह देशभर मंदिरांच्या स्वच्छतेचे उपक्रम राबवणार !
पणजी, १६ जानेवारी – 22 जानेवारीला भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भूवैकुंठात अवतरण्याचा परम दिव्य क्षण जवळ आला आहे. त्यामुळे देशभर अतिशय आनंदाचे आणि राममय वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर हिंदु जनजागृती समितीने देशभर रामराज्यासाठी प्रार्थना करण्यासह स्थानिक मंदिरांची स्वच्छता करण्याचे उपक्रम राबवणार आहोत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राज्य समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी दिली आहे.
शेडको वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आणि लाखो हिंदूंच्या बलीदानानंतर अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभे रहात आहेत. हा ऐतिहासिक क्षण आहे. या श्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी प्रयत्न करणारे आणि प्राणांची आहुती देणाऱ्या सर्वांचे समिती कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून विविध प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात मंदिर स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या वेळी स्वतः भारताचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोजी यांनीही मंदिरांच्या स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन केले आहे. यंदाही हिंदु जनजागृती समिती 15 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत देशभरातील स्थानिक मंदिरांची स्वच्छते उपक्रम राबवत आहे. या मंदिराची स्वच्छता केल्यानंतर सर्व हिंदू एकत्र येतील आणि एकत्रितपणे रामराज्य आणि हिंदू राष्ट्राचा शपथ घेतली जाईल. शेवटी श्रीरामाच्या चरणी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली जाईल.
प्रत्येक घरात दिवा आणि भगवा ध्वज !
22 जानेवारी या दिवशी सर्व समितीचे कार्यकर्ते, तसेच समविचारी हिंदुत्वनिष्ठ आणि रामभक्त त्यांच्या निवासस्थानी प्रभू श्रीरामासाठी दिवाळीप्रमाणे दीपप्रज्वलन करतील. तसेच घराच्या अंगणात श्रीराम तत्वाची सात्विक रांगोळी काढणे, घरावर भगवा ध्वज फडकणे, श्रीरामाची भक्तिभावाने पूजा करणे आणि रामराज्यासाठी सामुहिक प्रार्थना आदी कृती करणार आहेत. त्यासोबतच अन्य धार्मिक संस्था आणि हिंदू संघटनांमार्फत चालवले जाणाऱ्या कलश यात्रा, अक्षता वितरण आदी उपक्रमांमध्ये यथाशक्ती सहभाग घेतला जाईल, अशी माहिती डॉ. मनोज सोलंकी यांनी दिली.
आपला नम्र,
श्री. डॉ. मनोज सोलंकी ,
हिंदु जनजागृती समिती, गोवा,
(संपर्क: 9326103278)