श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान

.

श्रीराम मंदिरातील प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियान’!

आपल्या घरी साक्षात् प्रभु श्रीराम येणार आहेत’या भावाने प्रत्येकाने पूजनप्रार्थना आणि श्रीरामनाम संकीर्तन करा – सनातन संस्थेचे आवाहन

16 ते 22 जानेवारी या कालावधीत अयोध्येतील श्रीराम मंदिरात श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासह विविध विधी संपन्न होणार आहेतत्यामुळे संपूर्ण देशात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहेया निमित्ताने सनातन संस्थेतर्फे देशभरात ‘श्रीरामनाम संकीर्तन अभियाना’द्वारे ठिकठिकाणी श्रीरामनाम जपश्रीरामाकडे रामराज्यासाठी प्रार्थनाश्रीरामांचा गुणगौरव करण्यात येणार आहेयासह ‘आपल्या घरी साक्षात् प्रभु श्रीराम येणार आहेत’ या भावाने प्रत्येक कृती करावीअसे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहेअशी माहिती श्री. यांनी दिली.

500 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भगवान श्रीराम पुन्हा अयोध्येच्या भूवैकुंठामध्ये अवतरणार आहेततो परमदिव्य क्षण जवळ आला आहेया क्षणाचे साक्षीदार होणार भाग्य आपल्याला लाभणार आहेयाबद्दल आपण श्रीरामांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करायला हवीतसेच ज्या कारसेवकांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन श्रीरामजन्मभूमी मुक्त केलीत्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करायला हवी.

श्रीरामनाम संकीर्तन अभियान ! :

1. 15 ते 21 जानेवारी 2024 या कालावधीत आपल्या नजिकच्या कोणत्याही मंदिरात एकत्र जमून सामूहिकरित्या ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप किमान 30 मिनिटे करावा.

2. यासोबतच जमलेल्या रामभक्तांना ‘प्रभू श्रीरामाचे गुण आत्मसात करा’ याविषयी प्रतिदिन 5-10 विषय मांडावा.

3. शेवटी सर्वांनी सामुहिकरित्या रामराज्यासाठी प्रार्थना करून रामाच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करावी.

4. ज्यांना शक्य आहेत्यांनी सप्ताहभर अन्यथा किमान 22 जानेवारी 2024 यादिवशी ‘आपल्या घरी साक्षात प्रभू श्रीरामच येणार आहेत’असा भाव ठेवून देवघरातील श्रीरामाची मूर्ती किंवा छायाचित्र यांचे पूजन करावेदीपावलीप्रमाणे दाराबाहेर पणत्या लावाव्यादारामध्ये किंवा अंगणात सात्त्विक रांगोळी काढावीघरावर भगवा ध्वज फडकावावा.

असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रभू श्रीरामतत्त्वाचा आध्यात्मिक स्तरावर अधिकाधिक लाभ व्हावायासाठी श्रीरामाची माहिती देणारे लघुग्रंथसनातननिर्मित श्रीरामाचे चित्र आणि ‘श्रीराम जय राम जय जय राम’ ही नामपट्टीही उपलब्ध करण्यात आली आहेत्याचा लाभ सर्व रामभक्तांनी घ्यावायासह अयोद्ध्येतील सोहळ्याचे निमंत्रण घेऊन राबवण्यात येत असलेल्या कलश यात्रेतअक्षता वाटप कार्यक्रम आदी रामकार्यात यथाशक्ती सहभाग घ्यावाअसे आवाहनही सनातन संस्थेने केले आहे.

 

आपला नम्र,

श्री. तुळशीदास गांजेकर, सनातन संस्था,

(संपर्क – ९३७०९५८१३२)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें