चला, रामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया !

.

चलारामराज्याच्या दिशेने वाटचाल करूया !

    श्रीरामजन्मभूमीवर 490 वर्षांच्या वनवासानंतर भव्य श्रीराममंदिर उभे रहात आहेसंपूर्ण देशातच नव्हेतर जगभरातील हिंदूंमध्ये उत्साहाचा संचार झाला आहेअमेरिकेमध्ये हिंदूंकडून श्रीराममंदिरानिमित्त फेर्‍या काढण्यात येत आहेतसंपूर्ण भारत राममय झाला आहे22 जानेवारी जशी जवळ येत आहेतशी भारतियांमध्ये रामभक्तीची ज्योत अधिक तेजस्वीपणे तेवू लागत आहेप्रसारमाध्यमांतून प्रतिदिन अनेक घंटे श्रीराममंदिरश्रीरामजन्मभूमी आंदोलनरामायण आदींविषयी कार्यक्रम प्रसारित केले जात आहेतश्रीरामाविषयीची नवनवीन भक्तीगीते प्रकाशित होत आहेत आणि त्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी पोस्ट करून प्रोत्साहन देत आहेतसंपूर्ण देशात राम लहर निर्माण झाली आहेश्रीरामाच्या मंदिरामध्येत्याच्या नामामध्ये किती शक्ती आहेयाची अनुभूती पुन्हा एकदा हिंदू घेत आहेतश्रीरामजन्मभूमीच्या मुक्तीसाठी ५ शतकांमध्ये लक्षावधी रामभक्तांनी प्राणत्याग केलागेली अनेक दशके न्यायालयात याविषयीचा खटला चालवला गेला आणि अखेर हिंदूंना तेथे विजय मिळवल्यावर आता श्रीराममंदिर उभे रहात आहेइतिहासामध्ये श्रीरामजन्मभूमीचा लढा अजरामर झाला आहेआता हिंदूंनी यावर थांबू नयेतर मथुरा आणि काशी येथील मंदिरांची भूमी मुक्त करण्यासाठी लढा चालूच ठेवून तेथेही ईश्वराच्या कृपेने विजय मिळवला पाहिजेकेवळ मथुरा आणि काशीच नव्हेतर देशातील साडेतीन लाख मंदिरांना पाडून तेथे मशिदी बनवल्या गेल्या आहेतमध्यप्रदेशातील धार येथील भोजशाळेतील सरस्वतीदेवीचे मंदिर असेच गिळंकृत करण्यात आले आहेतत्यासाठीही लढा दिला पाहिजेगोव्यासारख्या राज्यात पोर्तुगीज काळात मंदिरे पाडून चर्च बनवले गेले आहेततेही मुक्त करण्याची आवश्यकता आहेया सर्व ठिकाणांची देवतांची स्थाने पुन्हा जागृत करायला हवीतयासाठी कायदा हातात घेण्याची आवश्यकता नाहीतर न्यायालयीन मार्गाने प्रयत्न करता येऊ शकतोयासाठी स्थानिक राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनीही हिंदूंना साहाय्य करणे अपेक्षित आहेभाजप शासित राज्यांमध्ये एकवेळ हे शक्य होईलमात्र अन्य राज्यांमध्ये असे होणे सध्यातरी अवघड आहेश्रीराममंदिरामुळे या लढ्याला बळ मिळालेले आहेउद्या मथुरा आणि काशी येथेही हिंदूंना विजय मिळालातर उर्वरित मंदिरे परत मिळवण्यासाठी प्रयत्नांना अधिक धार येऊ शकते.

मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत !

    हिंदूंची मंदिरे ही चैतन्याची स्रोत आहेतआध्यात्मिकदृष्टीने त्यांना असणारे महत्त्व भक्तसाधकसंत हेच समजू शकतातयांमुळेच अशा चैतन्य स्रोतांचा विरोध करणार्‍या आसुरी लोकांनी ही मंदिरे नष्ट करणे आश्चर्यजनक म्हणता येणार नाहीहिंदूंच्या मंदिरांच्या माध्यमांतून समाजामध्ये भावभक्तीधर्माचरणसाधनात्यागमनःशांती आदी गोष्टी साध्य केले जातातमंदिरांचे हे महत्त्व हिंदूंना ठाऊक आहेदेशात प्रत्येक गावागावांमध्ये एक नव्हेतर अनेक मंदिरे असतातअशी मंदिरे आता हिंदूंच्या धर्मशिक्षणाची केंद्रे होणे आवश्यक झाले आहेश्रीराममंदिराच्या निमित्ताने हिंदूंमध्ये आध्यात्मिकदृष्ट्या एक प्रकारची जागृती निर्माण झालेली आहेही जागृती पुढे वाढवण्याची आवश्यकता आहेत्यासाठी प्रत्येक मंदिरांमध्ये हिंदूंना धर्मशिक्षण देऊन प्रत्यक्ष साधनेलाधर्माचरणाला प्रोत्साहित करण्याची आवश्यकता आहेयातूनच मंदिरांचा अधिक लाभ हिंदूंनासमाजाला आणि देशाला मिळणार आहेहेही त्यांना सांगितले गेले पाहिजेश्रीराममंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी देशातील अनुमाने 5 लाख मंदिरांमध्ये पूजाआरती आदी कार्यक्रम करण्याचे आवाहन विश्व हिंदु परिषदेने केले आहेत्यापूर्वी म्हणजे 14 जानेवारी ते 22 जानेवारी या काळात मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलेच आहेम्हणजेच कायतर या मंदिरांतून हिंदूंना संघटित करता येत आहेत्यासाठी वेगळी जागृतीप्रबोधन करण्याची आवश्यकता भासत नाहीअद्यापतरी हिंदूंमध्ये मंदिरांविषयी श्रद्धा आणि भाव टिकून आहेयालाच पुढे नेण्यासाठी हिंदूंना मंदिरांशी प्रतिदिन जोडून ठेवले पाहिजेभारत निधर्मी देश असल्याने पंतप्रधान मोदी किंवा कोणतेही सरकार हिंदूंना थेट धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था निर्माण करू शकत नाहीमात्र हिंदूंच्या संघटनांनी त्यासाठी आता प्रयत्न करणे आवश्यक झाले आहेधर्मशिक्षणामुळे हिंदूंच्या देवतांचा जन्महिंदूंकडून होणारा अवमान थांबला जाईलहिंदूंचा अन्य धर्मियांकडून होणारा बुद्धीभेद थांबून धर्मांतरालाही मोठ्या प्रमाणात चाप बसेललव्ह जिहादला बळी पडणार्‍या हिंदूंच्या मुलींचे रक्षण होईलहिंदूंमध्ये धर्माविषयी अधिक प्रेम आणि जागृती येईल आणि स्वतःला हिंदु मानण्याचा त्यांना खर्‍या अर्थाने अभिमान वाटेल !

मंदिरे पर्यटनाची केंद्रे होऊ नयेत !

     सध्या मंदिरांचा विकास केला जात आहेम्हणजे कायतर तेथे अधिकाधिक सुविधा निर्माण केल्या जात आहेततेथे पोचण्यासाठी विविध माध्यमे निर्माण केली जात आहेतया गोष्टी आवश्यकच आहेतमात्र याचा उपयोग एक भक्तभाविकसाधक या दृष्टीने करवून घेण्याची आवश्यकता आहेप्रत्यक्षात असे किती प्रमाणात होतेयाचे चिंतन केले पाहिजेमंदिरांना आज एक पर्यटन केंद्र म्हणून पाहिले जात आहेकाही मोजकी मंदिरे आहेत जी त्यांचे मूळ स्वरूप टिकवून आहेत किंवा भाविक त्यांना त्याच दृष्टीने पहात आहेमंदिरे पर्यटनाची केंद्र कदापी होऊ शकत नाहीतती चैतन्याची केंद्र आहेतहे चैतन्य टिकवून ठेवणे भाविकांचे कर्तव्य नाहीतर साधना आहेजर हे चैतन्य नष्ट झालेतर त्या मंदिरांना काहीच महत्त्व उरणार नाहीकारण त्यात देव नसेलअनेक संतउन्नत यांना हे लक्षात येत आहे कीमंदिरांतील चैतन्य नष्ट होऊन तेथील देवत्व निघून गेले आहेहे हिंदूंसाठी मोठे समष्टी पाप आहेकाही संत अशा मंदिरांच्या ठिकाणी जाऊन त्यांची शुद्धी करत असतातमात्र जर चैतन्य नष्ट करणार्‍या गोष्टीच थांबवल्यातर ते अधिक महत्त्वाचे आहेसरकारने या दृष्टीने विकास करतांना पाहिले पाहिजे.

मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करा !

     श्रीराममंदिर हे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडून बांधण्यात येत आहेन्यायालयाच्या आदेशानंतर या ट्रस्टची निर्मिती झाली आहेयात सरकारचा कोणताही हस्तक्षेप नाहीमात्र आज देशातील लक्षावधी मंदिरे सरकारांच्या कह्यात आहेतया मंदिरांमध्ये येणारे अब्जावधी रुपयांचे अर्पण सरकारच्या तिजोरीत जात आहेयातील थोडासाच पैसा प्रत्यक्ष मंदिरांच्या कार्यासाठी वापरला जात आहेतर अन्य सर्व पैसा सरकारी योजनांसाठी वापरण्यात येत आहेतसेच मंदिर समित्याही या पैशांतून हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी किंवा धर्मकार्यासाठी वापरत नसल्याचेही दिसून येतेघरातील कर्ता मोठा भाऊ लहान भावांचा सांभाळ करतोतसे अधिक उत्पन्न असणार्‍या मंदिरांनी देशातील लहान मंदिरे ज्यांचे उत्पन्न नगण्य आहे किंवा ज्यांची पडझड झाली आहेत्यांचे पालकत्व घेऊन तेथील व्यवस्था पहाण्याची आवश्यकता आहेतसे होतांना दिसत नाहीम्हणजेच हिंदूंचा अर्पण केलेल्या पैशांचा धर्मासाठी उपयोग होत नाहीहा पैसा रुग्णालये बांधण्यासाठीपूरग्रस्तांसाठीशाळांसाठीरुग्णांच्या साहाय्यासाठी वापरला जात आहेही सर्व सामाजिक कार्ये आहेतसामाजिक कार्यासाठी धर्माचा पैसा खर्च होणे अपेक्षित नाहीसामाजिक कार्यासाठी अन्य स्रोत आहेतमात्र धर्मकार्यासाठी असे कायमस्वरूप स्रोत नाहीतत्यामुळे मंदिरांचा पैसा धर्मकार्यासाठी वापरला पाहिजेकाही मंदिरांचा पैसा अन्य धर्मियांसाठीही खर्च करण्यात आल्याची उदाहरण समोर आली होतीहे हिंदूंना लज्जास्पद होतेत्यामुळे मंदिरे सरकारांच्या कह्यातून मुक्त करून ती खर्‍या भक्तांच्यासाधना करणार्‍या भाविकांच्या कह्यात दिली पाहिजेतसरकारी अधिकार्‍यांऐवजी असे भाविकच खर्‍या अर्थाने मंदिरे भावभक्तीने नियंत्रित करू शकतीलयासाठी हिंदूंना प्रयत्न करणे आता आवश्यक आहेज्या मंदिरांचा भावभक्तीने सांभाळ होत नाहीज्या मंदिरांच्या पैशांवरदागिण्यांवर डल्ला मारला जातोज्या मंदिरांचा पैसा धर्मकार्यासाठी खर्च होत नाहीतेथे देवतरी राहील का यासाठी आता हिंदूंनी लढा देणे आवश्यक आहेयासाठी आता देशभरात जागृती करून मोठी चळवळ निर्माण केली पाहिजेमंदिरांचा पैशातून धर्मशिक्षणासाठी प्रयत्न केले जाऊ शकतातमोठ्या मंदिरांकडून म्हणजे ज्यांचे उत्पन्न कोट्यवधी रुपयांचे आहे त्यांच्याकडून गुरुकुलांची ठिकठिकाणी निर्मिती करणे आवश्यक आहेया पैशांतून वातावरणाच्या शुद्धीसाठी सातत्याने यज्ञयाग करणे आवश्यक आहेकोरोनाच्या काळात निर्जंतुकीकरण करण्यात येत होतेत्याचप्रमाणे यज्ञयागाही आध्यात्मिक स्तरावर कार्य करतात.

रामराज्यासम आदर्श असे हिंदु राष्ट्र हवे !

     श्रीराममंदिराची निर्मिती झाली असलीतरी ते अंतिम साध्य ठरू नयेश्रीरामांची प्राणप्रतिष्ठापना 500 वर्षांनंतर या देशात होत असेलतर आता देशात रामराज्याचीही स्थापना होणे आवश्यक आहेम्हणजे काय तर देशात श्रीरामांनी चालवल्या प्रमाणे राज्य म्हणजे देश चालवण्याची आवश्यकता आहेसध्या असे आहे का तर नाहीभारत एक धर्मनिरपेक्ष देश आहेजेथे धर्मच नाहीतेथे धर्माचरण कसे केले जाऊ शकते यासाठी प्रथम भारताला धर्माधिष्ठीत हिंदु राष्ट्र घोषित केले पाहिजेहा देश हिंदूंचा आहेया देशावर मुसलमान आणि ख्रिस्ती यांनी जवळपास 1 हजार वर्षे राज्य केले आहेत्यांच्या गुलामगिरीमुळे भारत आपली मूळ संस्कृती विसरला आहेम्हणजे काय तर साधना करण्याची संस्कृतीभारत जगाचा विश्वगुरु होता तो आध्यात्मिक स्तरावर होताआज देशात अशी स्थिती आहे का कीभारत जगाचा विश्वगुरु होऊ शकतोतर याचे उत्तर ‘नाही’म्हणून प्रथम देशात हिंदु राष्ट्र स्थापन करून हिंदु धर्मानुसार राज्य चालवले गेले पाहिजेयातून प्रत्येक व्यक्ती हिंदु धर्माचे पालन करू लागेलहिंदु धर्मानुसार निर्णय घेतले जातीलकार्य केले जातीलविकास त्या दृष्टीने केला जाईलही स्थिती देशात आली कीरामराज्य आले असे म्हणता येईलअसे शासनकर्ते पितृशाही प्रमाणे कारभार पहातीलअशा देशातील प्रजा राजाप्रमाणे असेलया राज्यात कुणीही दुःखी असणार नाही आणि कुणालाही समस्या असतीलतर त्या तत्परतेने सोडवल्या जातीलअन्य देशांमध्ये भारताविषयी शत्रुत्व नाहीतर मान असेलते भारताचा आदर्श घेऊन राज्य कारभार करतील.


– 
श्रीचेतन राजहंसराष्ट्रीय प्रवक्तासनातन संस्था 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें