सोनीकडून ‘इन्झोन बड्स’चे (INZONE Buds) अनावरण उद्योग क्षेत्रातील आजवरचे सर्वात जास्त बॅटरी लाइफ असलेले, खऱ्या अर्थाने वायरलेस आणि आजूबाजूचा गोंगाट व आवाज काढून टाकणारे गेमिंग ईअर बड्स,

.

सोनीकडून ‘इन्झोन बड्स’चे (INZONE Buds) अनावरण
उद्योग क्षेत्रातील आजवरचे सर्वात जास्त बॅटरी लाइफ असलेले, खऱ्या अर्थाने वायरलेस आणि आजूबाजूचा गोंगाट व आवाज काढून टाकणारे गेमिंग ईअर बड्स,
रचना करताना फनॅटिककडून (जगातील एक अग्रगण्य ईस्पोर्ट्स संघटना) खास सूचना
नवी दिल्ली, 19 जानेवारी, २०२४: सोनीने आपल्या नवीन ‘इन्झोन बड्स’ (INZONE Buds) ची घोषणा केली आहे. वापरकर्त्याने गेम जिंकावा यासाठी सोनीने खास तयार केलेल्या प्रसिद्ध ध्वनी तंत्रज्ञानासह खऱ्या अर्थाने ज्यास वायरलेस म्हणता येईल असे हे नवीन गेमिंग ईयर बड्स आहेत. वैयक्तिक कम्प्युटर (पीसी), मोबाइल आणि कन्सोल गेमप्ले यांच्यावर गेम खेळताना ‘इन्झोन बड्स’ (INZONE Buds) व्यक्तिगत ध्वनी, १२ तासांची दीर्घ बॅटरी लाइफ आणि कमी विलंब यांच्यामुळे एक भान हरपून टाकणारा असा गेमिंग अनुभव देते. जगातील एक सुप्रसिद्ध आणि अग्रगण्य ईस्पोर्ट्स संघटना फनॅटिकच्या (Fnatic) सहभागीदारीतून ‘इन्झोन बड्स’ (INZONE Buds) चा जन्म झाला होता. फनॅटिक (Fnatic) यंदा साल २०२४ मध्ये आपल्या कारकि‍र्दीची २० वर्षे साजरी करणार आहे आणि त्यांनी यावर्षी वॅलोरंट चॅम्पियन्स टूरमध्ये (VALORANT Champions Tour) लागोपाठ आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवले. अधिक सुधारित ध्वनीसह ‘इन्झोन बड्स’ (INZONE Buds) तुमचा कम्प्युटरवरील किंवा प्लेस्टेशनवरील गेमिंग अनुभव नेहमीप्रमाणे समृद्ध करीत राहील.
आजूबाजूचा गोंगाट सक्रियपणे काढून टाकणारे तंत्रज्ञान आणि वैयक्तीकृत अवकाशीय ध्वनी तुम्हाला सर्वात पुढे राहायला मदत करते:
‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) ने गेमिंगमधील ध्वनीपद्धतीची जणू पुनर्व्याख्याच केली आहे. आजूबाजूचा गोंगाट सक्रियपणे काढून टाकणारे तंत्रज्ञान आणि वैयक्तीकृत अवकाशीय ध्वनी तुम्हाला तुमच्या गेममध्ये सर्वात पुढे ठेवते. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आजूबाजूचा अगदी कमीतकमी आवाज आणि अचूक असे दिशात्मक संकेत असलेल्या जगात स्वतःला अगदी हरवून घ्या. या क्षेत्रातील अग्रगण्य तंत्रज्ञान आणि उपयुक्त रचनेसह हे वायरलेस ईअर बड्स खेळाच्या क्षेत्रातील तुमची प्रतिस्पर्धात्मक शक्ती वृद्धिंगत करून तुम्हाला अतुलनीय व विलक्षण असे ध्वनी अनुभव देतात.
या उद्योग क्षेत्रातील आजवरचे सर्वात जास्त म्हणजे सलग १२ तासांची दीर्घ बॅटरी लाइफ असलेले व खऱ्या अर्थाने ज्यास वायरलेस म्हणता येतील असे गेमिंग ईयर बड्स:
‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) त्यांच्या वायरलेस हेडसेटसह गेमिंग क्षेत्रातील ध्वनी अनुभव जणू पुन्हा परिभाषित करतात आणि या उद्योग क्षेत्रातील आजवरचे सर्वात जास्त म्हणजे सलग १२ तासांची दीर्घ बॅटरी लाइफ असल्याचा मानही पटकावतात. कमी प्रमाणात बॅटरी लागणारे एल १ प्रोसेसरने (L1 processor) चालणारे हे ईअर बड्स कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्हाला तुमच्या खेळाचा आनंद जास्त वेळ घेऊ देते. शिवाय, अगदी कमी वेळात त्वरित चार्जिंगच्या सुविधेमुळे; केवळ पाच मिनिटे चार्ज करून जवळपास एक तास चार्जिंग, वापरकर्त्यांना अखंड खेळ खेळता येते. अशापद्धतीने ही अप्रतिम बॅटरी गेम खेळणाऱ्यांना खेळाडूंना अधिक कालावधीसाठी, अडथळ्यांशिवाय सलग व मुग्ध करणारा खेळ खेळण्यास देते.
गेम खेळताना जास्त आरामदायी अनुभवासाठी ईअर बड्सचा कानाशी कमीतकमी संपर्क:
‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) ची रचना अशी केलेली आहे की, या बड्सचा कानाशी कमीतकमी संपर्क येतो, जेणेकरून वापरकर्ते जास्त वेळ खेळत असले तरी त्यांच्या कानास त्रास होत नाही व अस्वस्थ न होता ते अधिक वेळ खेळू शकतात. वजनाने हलके आणि खऱ्या अर्थाने वायरलेस असलेले हे ईअर बड्स घातले आहेत हेच वापरकर्ते विसरून जातात आणि त्यास एकूणच आरामदायी अनुभव मिळतो. उत्साही खेळाडूंच्या गरजा पूर्ण करत ही विचारशील रचना जास्त वेळासाठी, आरामदायी व भान विसरवून टाकणारे गेमिंग अनुभव देते.
‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) केवळ युएसबी टाइप-सी डोंगल आणि ब्लुटूथ एलई ऑडिओ कनेक्शनद्वारे (USB Type-C dongle and Bluetooth LE Audio connection) २.४ गिगाहर्टस वायर लेस कनेक्शनला (2.4 GHz wireless connection) समर्थित आहे (codec:LC3):
केवळ युएसबी टाइप-सी डोंगल कनेक्शनद्वारे (USB Type-C dongle) २.४ गिगाहर्टस वायर लेस कनेक्शनला (2.4 GHz wireless connection) समर्थन देते आणि गेम खेळताना कनेक्टिव्हिटी मध्ये कमी विलंब (latency) लागण्याची हमी देते. शिवाय, ते कोडेक एल सी ३ (codec:LC3) वापरुन ब्लुटूथ एलई ऑडिओ (Bluetooth LE Audio) ला पूरक आहे. जे ऊर्जा कार्यक्षम वायरलेस प्रदर्शनाला अनुकूलित करते. विशेष म्हणजे एसबीसी (SBC), एएसी (AAC), एपीटीएक्स (aptX) आणि एलडीएसी (LDAC) हे आणि अन्य पारंपरिक ब्लुटूथ कोडेक ना हे सुसंगत नाही. हे ईअर बड्स खास समृद्ध अश्या ध्वनी अनुभवासाठी विशेष गेमिंग कनेक्टीव्हीटीवरच लक्ष केंद्रित करतात.
आरर्टीफिशिअल इंटेलिजन्स (AI) सहाय्यीत मायक्रोफोन ऐन कृतीमध्ये मग्न असतानादेखील स्पष्ट ऐकण्यास मदत करतात
‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) मधील आरर्टीफिशिअल इंटेलिजन्स (AI) सहाय्यीत मायक्रोफोन वापरकर्त्याला गेम खेळताना ऐन कृतीमध्ये मग्न असतानादेखील स्पष्ट ऐकू येण्याची हमी देतो. ५०० दशलक्ष पेक्षा जास्त आवाजांच्या नमुन्यांमधून तयार केलेल्या प्रगत एआय डीएनएन (AI DNN) अल्गोरिदमचे एकत्रीकरण करून हे वापरकर्त्याच्या आवाजाला ओळखते आणि त्यास वेगळे करून तो आवाज वाढवते. त्यामुळे आजूबाजूच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर वापरकर्त्याचा आवाज ठळकपणे समोर येतो. या तंत्रज्ञानामुळे खेळातील संवाद अधिक समृद्ध व स्पष्ट होत असल्याने खेळाडूंना गेम खेळताना आवश्यक आवाज अपवादा‍त्मक अश्या स्पष्टतेने ऐकू येतात. परिणामतः हे तंत्रज्ञान एक मग्न करणारे आकर्षक असे गेम खेळण्याचे अनुभव प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देते.
कमीतकमी विलंबासह (latency) हे अचूकता वाढवते:
‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) मधील प्रगत तंत्रज्ञानाने गेमच्या कनेक्टीव्हीटीमध्ये कमी विलंब लाऊन गेममध्ये अचूकता वाढवते. युएसबी टाइप-सी डोंगल (USB Type-C dongle) ३० मिलीसेकंदापेक्षा कमी विलंबासह (लेटेन्सी) अखंड आणि प्रत्यक्ष त्याच वेळेचा (रीयल टाइम) गेमिंग अनुभव सुनिश्चित करते. यामध्ये प्रत्येक मिलीसेकंद मोजला जातो आणि हे वैशिष्ठ्य गेम खेळणाऱ्यांना त्वरित प्रतिक्रिया देण्यास, स्पर्धेमध्ये पुढे राहण्यास आणि एक उत्तम, विना अडथळा, अखंड खेळाचा आनंद घेऊ देते. कमीतकमी विलंब (लेटेन्सी) देण्याची बांधिलकी ‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) ची एकूण गेमिंग कामगिरी आणि त्वरित प्रतिसाद देण्याची क्षमता वाढवते.
तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविण्यात मदत व्हावी म्हणून खास व्यवसायिक गेमर्सच्या सहकार्याने हे ईअर बड्स तयार केले आहेत:
‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) तुमच्या गेमिंग अनुभवाला जास्त खास बनविण्यासाठी व्यवसायिक खेळाडुंच्या, विशेषतः फनॅटिक प्रो-प्लेयर्सच्या, सहभागीदारीने व अतिशय काळजीपूर्वक बनविले आहे. ही भागीदारी सुनिश्चित करते की, या ईअर बड्समध्ये गेमिंग तज्ज्ञांनी सुचविलेली आणि मंजूर केलेली वैशिष्ठ्ये आणि रचना समाविष्ट केल्यामुळे गेम खेळणाऱ्यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवण्यासाठी खास जोर मिळतो. उत्तम खेळाच्या प्रदर्शनासाठी अवकाशीय ध्वनीच्या अचूकतेपासून ते एआय पूरक मायक्रोफोन्सपर्यंत आवश्यक असलेले सर्व पैलू यामध्ये आहेत. त्यामुळे गेमिंग क्षेत्रात ज्यांना पुढे यायचे आहे त्यांच्यासाठी ‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) हे एक उत्तम व विश्वासार्ह पर्याय आहे.
केवळ बोटांच्या स्पर्शाने महत्त्वाचे नियंत्रण वापरण्याची सुविधा:
‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) केवळ तुमच्या बोटांच्या स्पर्शाने त्वरित व सहजतेने नियंत्रण प्रदान करत असल्याने गेमिंग अनुभव सोपा, सहज व समृद्ध करतात. वापरकर्ते सानुकूल करण्यायोग्य टॅप फन्क्शन्ससह सहज व सोप्या स्पर्शाने महत्त्वपूर्ण नियंत्रणे वापरू शकतात. एआय सुसंगत अशी केवळ स्पर्श करून वापरता येणारी नियंत्रणे (टच कंट्रोल) वेगवेगळ्या सुविधा; जसे की गेममधील आवाज समायोजित (अॅडजस्ट) करणे असो वा पार्श्वभूमीमधील संगीत व्यवस्थापित करणे असो किंवा अगदी इन्झोन हब (INZONE Hub) च्या माध्यमातून वैयक्तीकृत, वापरकर्त्याला जसे हवे तसे सेटिंग करणे असो; हे सर्व सहजतेने पुरवतात. त्यामुळे हे ईअर बड्स गेम खेळणाऱ्याला आनंददायक आणि भारावून टाकणारे गेम खेळण्यासाठी एक प्रतिसादात्मक व अनुकूल गेमिंग इंटरफेसची हमी देतात.
इन्झोन हब (INZONE Hub) सॉफ्टवेअर च्या माध्यमातून वैयक्तिकृत अनुभव:
इन्झोन हब (INZONE Hub) सॉफ्टवेअर च्या माध्यमातून तुमचा अनुभव वैयक्तिकृत करून तुमचा गेमिंग प्रवास ‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) सह अधिक समृद्ध करा. हे अंतर्ज्ञानी (इन्टीट्यू) व्यासपीठ वापरकर्त्यांना ध्वनी आणि हॉर्डवेअर संबंधित सेंटिंग सानुकूलित करण्यास, उच्च स्पष्टतेसाठी गेममधील ध्वनी फ्रिक्वेन्सी ट्यून करण्यास आणि सोईस्करपणे नियंत्रण करता यावे यासाठी केवळ स्पर्शकरून वापरता येणारी वैशिष्ठ्ये (टच फंक्शन्स) ठरविण्यास अनुमति देते. तुमचा संपूर्ण गेमिंग अनुभव एका वेगळ्याच उंचीवर नेऊन, मुग्ध करणारे, भारावून टाकणारे असे स्वतःच्या सोयीचे गेमिंग वातावरण तयार करण्यासाठी इन्झोन हब (INZONE Hub) सॉफ्टवेअरच्याद्वारे तुमची ध्वनीविषयक प्राधान्ये तुम्हीच ठरवा.
पर्यावरणपूरक:
इन्झोन (INZONE) केवळ उत्तम गेम अनुभव देण्यासाठीच तयार केले आहे असे नाही तर याची रचना खास पर्यावरणपूरकही आहे. सोनी आपली उत्पादने तयार करताना आणि त्यासाठी लागणाऱ्या पॅकेजिंगमध्ये कमी प्लॅस्टिक वापरण्यासाठी कटिबद्ध आहे. ‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) च्या पॅकेजिंगमध्ये कोणतेही प्लॅस्टिक वापरले गेलेले नसून यामध्ये पुनर्नविनीकरण केलेले साहित्य (१) वापरले आहे. हेडसेटच्या काही भागांसाठी, केससाठी आणि यूएसबीट्रान्सीव्हर साठी (USB transceiver) पुनर्नविनीकरण केलेले प्लॅस्टिक रेसीन सामग्री (राळ) म्हणून वापरले गेले आहे.

 

किंमत आणि उपलब्धता:
. ‘सोनी इन्झोन बड्स’ (Sony INZONE Buds) भारतात सर्व प्रमुख सोनी रीटेल स्टोर्स (सोनी सेंटर आणि सोनी एक्सक्लूसिव्ह), प्रमुख इलेक्ट्रोनिक दुकाने, www.ShopatSC.com पोर्टलवर आणि ई कॉमर्स संकेत स्थळांवर १६ जानेवारी २०२४ पासून उपलब्ध असतील.
मॉडेल
किंमत (भारतीय रुपयांमध्ये)
उपलब्धता तारीख
उपलब्ध रंग

इन्झोन बड्स’ (INZONE Buds)
१७,९९०/-
22 जानेवारी २०२४ पासून उपलब्ध
काळा आणि पांढरा,

 

 

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें