भारताचा लोकप्रिय अगरबत्ती ब्रँड सायकल ब्रँड ने राम मंदिर उद्घाटन निमित्त बनविली १११ फुटी अगरबत्ती
मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सांखळी येथील श्री राधाकृष्ण मंदिरात केले अगरबत्तीचे प्रज्वलन
गोवा : अयोध्या येथील राम मंदिराच्या उद्घाटनाचे औचित्य साधून भारतातील आघाडीची अगरबत्ती निर्मिती कंपनी सायकल ब्रँड ने १११ फूट उंच अगरबत्ती ची निर्मिती केली असून त्या माध्यमातून देशभर चाललेल्या उत्सवात आपले योगदान दिले आहे. ही प्रभू रामचंद्राला दिलेली एक मानवंदना आहे.या अगरबत्तीच्या प्रज्वलनाचा समारंभ देशभरात एकाच वेळी उच्च सांस्कृतिक वारसा असलेल्या तीन ठिकाणी पार पडला. मैसुरू, महाराष्ट्र आणि गोवा येथे सोमवारी २२ जानेवारी रोजी मोठया दिमाखात हा सोहळा पार पडला. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे आणि श्री प्रमोद सावंत यांनी हे प्रज्वलन स्थानिक देवळांमध्ये केले. या दोघांनी स्थानिक कारागिरांना आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळेल असे म्हटलें
मैसूरू येथे झालेल्या समारंभाला स्थानिक खासदार श्री प्रताप सिम्हा, आमदार श्री टी एस श्रीवत्स तसेच सायकल ब्रँड चे मालक रंगा कुटुंबातील सदस्य हजर होते. देशाचा उंची वारसा आणि पारंपारिक कला प्रकार यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला गेला. सायकलची १११ फुटांची शुद्ध अगरबत्ती ही आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कलाकुसर यांचा एक अवीट मिलाफ होता. मैसूर येथील उंची सांस्कृतिक वारशाचा तो एक परिपाक आहे. या भव्य अगरबत्ती तब्बल २३ दिवसांमध्ये १८ कुशल कारागिरांनी बनविल्या होत्या. त्यासाठी मध, कोन्नेरी गेद्दे, तूप, चंदन पावडर, गुग्गुळ, लोबन, कोळसा आदी गोष्टींचा खास करून वापर केला गेला होता. या अगरबत्ती तब्बल सहा दिवस तेवत राहणार आहेत. त्यांच्या निर्मितीसाठी सायकलच्या विशेष संशोधन चमूने विशेष कष्ट घेतले होते.सांखळी येथील राधाकृष्ण मंदिरात या अगरबत्तीचे प्रज्वलन केल्यावर गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत म्हणाले, “मला आनंद आहे की आम्ही अयोध्या येथील राम मंदिर उद्घटनामध्ये खारीचा वाटा उचलत आहोत. १११ फुटांची ही अगरबत्ती एक पवित्र वातावरण निर्माण करण्याचे यशस्वी काम करेल. तिचा सुगंध सदैव दरवळत राहील.”
सायकल ब्रँड चालविणाऱ्या एन आर ग्रुपचे अध्यक्ष श्री गुरु यावेळी बोलताना म्हणाले, “आमचा ब्रँड भक्तिरसात आकंठ बुडालेला असून आम्ही नेहमीच कारागिरांच्या पाठीशी उभे राहिलो आहे. आम्ही लोकांच्या आयुष्यात अशेचा स्त्रोत पसरतो. १११ फुटांची ही अगरबत्ती हे त्याचेच प्रतीक आहे. ही अगरबत्ती जगात आपल्या सुगंधाने आनंद पसरवेल.”
श्री रंगा राव कुटुंबाने अनोख्या अशा या सुगंधाची निर्मिती केली असून त्याला परंपरा नावाने ओळखले जाते अखंड ज्योती असे या अगरबत्तीचा नाव आहे. परंपरा आणि आठवणी यांची जोड या उत्पादनाला आहे आणि त्यातून संस्कृतीचे प्रतिनिधित्व घडते. राव कुटुंब त्याप्रती कटिबध्द आहे.