मलायका वाझसह नॅशनल जिओग्राफिक ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम गोवा’ द्वारे उलगडणार गोव्याचे विविध अज्ञात पैलू*

.

*मलायका वाझसह नॅशनल जिओग्राफिक ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम गोवा’ द्वारे उलगडणार गोव्याचे विविध अज्ञात पैलू*

*चार भागांची ही माहितीपट मालिका राज्याचा समृद्ध वारसा, अतुलनीय जैवविविधता, ज्ञात- अज्ञात साहसी स्थळे दर्शवते, ज्यामुळे गोवा खर्‍या पर्यटकांचे नंदनवन बनते.*

*24 जानेवारी 2024:* समुद्रकिनारे आणि उत्साहपूर्ण उत्सवांसाठी प्रसिद्ध अशा गोव्यात स्वादिष्ट पाककृती आणि रोमांचकारी साहसी खेळांचा समावेश असलेली सांस्कृतिक समृद्धी आहे. कथाकथनाच्या अस्सल आणि तल्लीन शैलीसह, नॅशनल जिओग्राफिक इंडिया ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम गोवा’ नावाच्या आगामी माहितीपट मालिकामध्ये गोव्याच्या अज्ञात पैलूंचा शोध घेण्यासाठी सज्ज आहे. नॅट जिओ एक्सप्लोरर, साहसी क्रीडापटू आणि वन्यजीव चित्रपट निर्मात्या मलायका वाझ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेक्षकांना एक विस्मयकारक प्रवास अनुभवण्यास मिळणार आहे. 25 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 वाजता नॅशनल जिओग्राफिकवर सुरू होणारी, ही चार भागांची मालिका गोव्याचे साहस, वन्यजीव, खाद्यपदार्थ आणि वैविध्यपूर्ण वारसा उलगडणार आहे.

चित्तथरारक छायाचित्रणासह ही माहितीपट मालिका मलायकासह गोव्याच्या विभिन्न थरारक पैलूंचा मागोवा घेणार आहे. पश्चिम घाटाच्या विस्तीर्ण प्रदेशापासून ते चोराओ बेटाच्या जैवविविध खारफुटीपर्यंत या किनारपट्टीच्या नंदनवनातील अज्ञात प्रदेश उलगडले जाणार आहे. भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यातील प्राचीन जंगलांमधून मार्गक्रमण करून, गोव्यातील समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडणार आहे. या प्रवासात ऐतिहासिक अवशेष आणि सप्तकोटेश्वर मंदिर, बॅसिलिका ऑफ बॉम जीझस आणि नमाजगाह यांसारख्या पूजनीय स्थळांचाही शोध घेतला जाणार आहे.

“नॅशनल जिओग्राफिकमध्ये, आम्ही शोध घेण्यापलिकडे दर्शकांचे मनोरंजन आणि प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो. आमच्या पोस्टकार्ड मालिकेद्वारे, मनमोहक दृश्य आणि आकर्षक कथनांसह गोव्याचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण पैलू सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही मालिका, गोव्याचे अतुलनीय सौंदर्य टिपते. दर्शकांनी न पाहिलेल्या क्षेत्रांमध्ये एक तल्लीन करणाऱ्या प्रवासाची अनुभूती देते. मलायका वाझ हा कार्यक्रम सादर करत असल्याने आम्हाला आनंद होत आहे. ती गोव्याची असल्याने अस्सल गोव्याचे दर्शन घडणार आहे सोबतच ती समृद्ध दृष्टीकोन आणते, दर्शकांचा अनुभव उंचावते,” असे नॅशनल जिओग्राफिकच्या प्रवक्त्याने सांगितले.

*“’पोस्टकार्ड्स फ्रॉम गोवा’ ही मनापासून तयार केलेली मालिका आहे. हा गोव्याचा वैयक्तिक प्रवास आहे. आपले राज्य पुनर्संचयित पर्यटनाच्या दिशेने वाटचाल करत असताना या उपक्रमाशी जोडले गेल्याने मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. आम्ही गोव्याला भारतातील पुनर्संचयित पर्यटनासाठी एक प्रारूप बनवत आहोत. आम्हाला आनंद आहे की आमची आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षा नॅशनल जिओग्राफिकच्या व्यावसायिक दृष्टीकोनातून पाहिली आणि दर्शविली गेली आहे,” असे गोव्याचे पर्यटन, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स व दळणवळण, मुद्रण आणि स्टेशनरी मंत्री माननीय श्री. रोहन अ. खंवटे म्हणाले.*

*“गोव्याला अनेक अनपेक्षित पैलू आहेत. गोवा चैतन्यमय, तरूण आणि महत्त्वाकांक्षी आहे आणि त्याच वेळी तो निष्कलंक, ध्यानशील, आध्यात्मिक आहे. नॅशनल जिओग्राफिक सारख्या विश्वासार्ह ब्रँडशी निगडीत असल्याचा आम्हाला आनंद होत आहे, ज्याने गोव्याच्या समृद्ध संस्कृतीची विलक्षण विविधता, जैवविविधता, अज्ञात ठिकाणे त्यांच्या अद्वितीय दृष्टीकोनातून टिपले आहेत. आम्ही सर्व प्रवासी, साहसी आणि निसर्ग प्रेमी, संस्कृती प्रेमी आणि आध्यात्मिक साधकांना ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम गोवा’द्वारे उलगडलेल्या या सुंदर दृकश्राव्य प्रवासात आमच्यासोबत सामील होण्यासाठी आमंत्रित करतो,” अशा शब्दांत गोव्याला येण्याचे निमंत्रण गोवा पर्यटन विभागाचे संचालक आणि गोवा पर्यटन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री. सुनील अंचिपाका, आयएएस यांनी दिले.*

“मी जन्माने गोवेकर आहे. ‘पोस्टकार्ड्स फ्रॉम गोवा’ हा माझ्यासाठी पुनर्शोध आणि नातेसंबंधाचा प्रवास आहे. नॅशनल जिओग्राफिक लेन्सद्वारे, मी माझ्या घरच्या राज्यातील लपलेला वैविध्यपूर्ण समृद्ध खजिना प्राचीन, कथा आणि दोलायमान भूदृश्यांमधून दाखवणार आहे. गोव्याची अनुभूती सर्व प्रवाशांसाठी जिवंत करण्याचे माझे ध्येय आहे. हा अनुभव साहसाच्या पलीकडे जातो. हा समृद्ध वारसा, वैविध्यपूर्ण वन्यजीव आणि सांस्कृतिक पटलाचा एक प्रामाणिक उत्सव आहे ज्यामुळे गोवा खरोखरच विलक्षण बनतो,” अशा शब्दांत नॅशनल जिओग्राफिक एक्सप्लोरर मलाइका वाझ हिने आपल्या भावना मांडल्या.

‘पोस्टकार्ड्स फ्रॉम गोवा’ 25 जानेवारी 2024 रोजी रात्री 8 वाजता भारतातील नॅशनल जिओग्राफिक चॅनलवर सुरू होईल.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें