केरी शाळा समूहाची प्रजासत्ताक दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा हरमल

.

केरी शाळा समूहाची प्रजासत्ताक दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा

हरमल
भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त केरी विद्यालयात नुकतीच प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

केरी शाळा समूहा अंतर्गत येणाऱ्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. १८५७ ते १९४७ या कालावधीत भारतीय स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्या नेते व स्वातंत्र्यसेनानी तसेच या कालावधीत देशाच्या प्रगतीस योगदान दिलेल्या महानेत्यांच्या जीवनावर आधारित वेशभूषा स्पर्धा असा या स्पर्धेचा विषय होता.

यात पहिल्या गटात सरकारी प्राथमिक विद्यालय मधलावाडाची सुहानी कल्पेश गाड प्रथम, सरकारी प्राथमिक विद्यालय तळवाडाची मनस्वी मुकेश तळकर द्वितीय तर स.प्रा.वि. मधलावाडाची ईशा निलेश वेंगुर्लेकर तृतीय बक्षीस पटकावले.
दुसऱ्या गटात न्यु इंग्लीश प्राथमिक विद्यालय केरीचा तन्वेश व्यंकटेश नार्वेकर प्रथम , स.प्रा. वि. तळवाडा नवराज निलेश तळकर दुसरा, तर न्यू इंग्लिशची श्रुती सतीश फरासने तृतीय स्थान पटकावले.
तिसऱ्या गटात न्यू इंग्लिश प्रा. विद्यालय केरीची आरोही आनंद सोपटे प्रथम, स.प्रा.वि. तळवाडाची पूर्वी गीरीश तळकर द्वितीय तर मधलावाडाचा दक्ष मंगेश वेंगुर्लेकर तृतीय स्थानावर आला.
इयत्ता चौथी मधून तळवाडाचा तनुष धर्मेश तळकर प्रथम, मधला वडाचा संभव श्रीपाद वस्त दुसरा तर केरी विद्यालयाच्या पूर्वी साजिरो साळगावकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.

प्राथमिक स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये सभाधिटपणा यावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच महान नेत्यांची वेशभूषेच्या माध्यमातून अनुकरण करत मुलांनी त्यांचे गुण आत्मसात करावें या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती असे न्यू इंग्लिश विद्यालय केरीचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांनी बोलताना सांगितले.

या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नवसो परब व राजाराम नाईक यांना काम पाहिले. संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन रविराज पेडणेकर यांनी केले.

फोटो: केरी शाळा समूहाच्या वेशभूषा स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकासोबत मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, विद्या गाड, यशश्री नाईक व अन्य.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें