मागणी धार्मिक भावना दुखावून समाजात कलह निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

.

मागणी
धार्मिक भावना दुखावून समाजात कलह निर्माण करणार्‍यांवर कठोर कारवाई करा !

पणजी, २ फेब्रुवारी – अयोध्या येथे प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे; मात्र या ऐतिहासिक घटनेनंतर राज्यात ‘सोशल मिडीया’च्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावून समाजात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी झालेले आहेत. यामुळे समाजात तणावाचे वातावरण अनेक ठिकाणी उद्भवल्याचे अनुभवास आलेले आहे. या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन केली आहे. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये ‘धर्मजागृती सेवा समिती’चे सर्वश्री प्रवीण चंद्र चौधरी, ‘जनजागृती सेवा संघा’चे प्रकाश कुमार मिश्रा, ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे सचिव जयेश थळी,                   ‘रणरागिणी’च्या सौ. राजश्री गडेकर आणि सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांची उपस्थिती होती.
याविषयी अधिक माहिती देतांना श्री. जयेश थळी म्हणाले,‘‘ प्रभु श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्वरी, कुडचडे, डिचोली, म्हापसा, फोंडा आदी अनेक ठिकाणी धार्मिक भावना दुखावण्याच्या घटना घडलेल्या आहेत. या सर्व घटनांमागे कोण सूत्रधार आहे का? याचे अन्वेषण करावे. गोव्यात बांगलादेश घुसखोरांनी पारपत्र घेतल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सरकारने या प्रकरणी आवश्यकता भासल्यास अन्वेषणासाठी विशेष तपास पथक नेमावे.’’
गोव्यात हलाल उत्पादनांच्या विक्रीवर बंदी आणावी !
उत्तर प्रदेश सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर गोव्यात हलाल उत्पादनांची निर्मिती, साठवणूक आणि विक्री यांवर बंदी आणावी, तसेच हलाल प्रमाणपत्र देणार्‍या संस्थांवर कारवाई करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

आपला नम्र,
डॉ. मनोज सोलंकी,

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें