सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत वित्तपुरवठादारांनी पुरवठा कडक केल्याने किरकोळ पत वाढ नियंत्रित

.

 

सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत वित्तपुरवठादारांनी पुरवठा कडक केल्याने
किरकोळ पत वाढ नियंत्रित
सर्व वापरण्यायोग्य गोष्टींच्या कर्ज उत्पादनांमध्ये पत वाढ मंदावली, तर गृहकर्जाची वाढ स्थिर राहिली
नवीन कर्ज ग्राहकांचे प्रमाण कमी झाले
वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डमधील किरकोळ बिघाड वगळता बहुतेक उत्पादनांमध्ये कर्ज परतफेडीच्या कामगिरीत सुधारणा

मुंबई, भारत, ६ फेब्रुवारी २०२४: वित्तीय संस्थांनी विशेषकरून क्रेडिट कार्ड, ग्राहकोपयोगी कर्जे आणि वैयक्तिक कर्ज यांसारख्या कन्झम्शन प्रणीत उत्पादनांबाबत कर्जाचा पुरवठा कडक केल्यामुळे सप्टेंबर 2023 संपलेल्या तिमाहीत भारताच्या किरकोळ कर्जामध्ये मध्यम वाढ दिसून आली. क्रेडिट कार्ड्स आणि वैयक्तिक कर्जाव्यतिरिक्त, शिल्लक-स्तरीय कर्ज परतफेडीच्या मोजमापानुसार क्रेडिट कामगिरी, बहुतेक उत्पादनांमध्ये सुधारली आहे. सप्टेंबर 2023 साठी ट्रान्सयुनियन सीबील क्रेडिट मार्केट इंडिकेटर (CMI)* अहवालाच्या नवीनतम आवृत्तीचे हे काही निष्कर्ष होते.

CMI हे डेटा घटकांचे सर्वसमावेशक मोजमाप असून क्रेडिट मार्केटच्या आरोग्यातील बदलांचे विश्लेषण दरमहा केले जाते. चार स्तंभांखाली यांचे वर्गीकरण केले जाते: मागणी, पुरवठा, ग्राहक वर्तन आणि कामगिरी. हे घटक एका एकल, सर्वसमावेशक निर्देशकामध्ये एकत्रित केले जातात आणि स्तंभ देखील स्वतंत्ररित्या अधिक तपशीलाने पाहिले जाऊ शकतात. सप्टेंबर 2023 साठी CMI 103 होता, जो सप्टेंबर 2022 पेक्षा चार गुणांनी जास्त होता आणि सप्टेंबर 2021 मध्ये 88 च्या नीचांकीवरून वाढणारा प्रवाह चालू आहे.

चार्ट 1: क्रेडिट मार्केट इंडिकेटर (CMI) सप्टेंबर 2019- सप्टेंबर 2023

सप्टेंबर 2023 च्या CMI अहवालाच्या निष्कर्षांवर बोलताना, ट्रान्सयुनियन सीबीलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राजेश कुमार म्हणाले: “गेल्या वर्षभरात बाजारपेठीय प्रवाहांना क्रेडिट संस्थांनी सुसंगत आणि प्रभावीपणे प्रतिसाद दिल्यामुळे नवीन CMI भारतीय ग्राहक क्रेडिट बाजारामध्ये सतत स्थिरता दर्शवत आहे. ही स्थिरता आता उत्पादनांमध्ये संतुलित आणि शाश्वत पत वाढीसाठी एक मजबूत आधार पुरवत आहे. पोर्टफोलिओचे सखोल निरीक्षण, तसेच आर्थिक संधींना पात्र असलेल्या कमी जोखमीच्या ग्राहकांना त्यांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शोधणे आणि त्यांना निधी देणे यातून भारताचा पत उद्योग दीर्घकालीन वाढीच्या मार्गावर निश्चित राहू शकतो.”

CMI निष्कर्षांनी वर्ष-दर-वर्ष (YoY) एकूणच सुरुवात करण्यातील वाढीच्या दरात घट दर्शविली, परिणामी CMI पुरवठा निर्देशांक सप्टेंबर 2022 मधील 98 वरून सप्टेंबर 2023 मध्ये 95 वर आला. वैयक्तिक कर्जासह कन्झम्शन प्रणीत क्रेडिट उत्पादनांची वाढ सप्टेंबर २०२३ मध्ये संपणाऱ्या तिमाहीत मंदावली.

तक्ता १: ओरिजीनेशन मधील वर्ष-दर-वर्ष वाढ*

उत्पादन
जुलै-सप्टेंबर 2022

जुलै-सप्टेंबर 2023

गृहकर्ज
13%
0%

LAP
32%
14%

ऑटो कर्ज
13%
6%

दुचाकी कर्ज
20%
16%

वैयक्तिक कर्ज
72%
28%

क्रेडिट कार्ड
74%
5%

ग्राहकोपयोगी कर्जे
39%
2%

कमी मूल्याच्या गृहकर्जात घट झाल्यामुळे गृह कर्जाच्या वाढीवर परिणाम झाला
गृहकर्जांनी सप्टेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत 9% वाढ दर्शविली आहे. तथापि, एकूण प्रमाणाच्या बाबतीत, ओरिजीनेशनच्या ७६% भाग असलेली कमी किमतीची गृहकर्जे (< 35 लाख रु.) 4% ने घसरली आहेत. त्यामुळे एकूण गृहकर्ज उत्पत्ती वाढीवर परिणाम झाला आहे.

तक्ता 2: गृहकर्ज ओरिजीनेशनमध्ये वार्षिक वाढ

गृहकर्ज मूल्य
ओरिजीनेशन प्रमाणाच्या बाबतीतला हिस्सा
वार्षिक वाढ

मंजूर किंमतपट्टा
INR <35 Lacs
78%
-4%

INR 35 – 75 Lacs
18%
8%

INR >= 75 Lacs
7%
23%

75 लाख रु. आणि त्याहून अधिक मूल्याच्या गृहकर्जांनी, जे एकूण ओरिजीनेशनच्या 7% आहे त्यांनी वार्षिक 23% अशी लक्षणीय वाढ दर्शविली आहे. आकारातील हा बदल 2023 मध्ये मालमत्तेच्या किमतीत वाढलेल्या प्रवाहाशी जोडला जाऊ शकतो.

नवीन कर्ज घेणाऱ्या ग्राहकांच्या ओरिजीनेशनमध्ये घट
नवीन कर्ज घेणाऱ्या (NTC) ग्राहकांचा ओरिजीनेशनमधील हिस्सा सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीतील 17% वरून सप्टेंबर 2023 मध्ये संपलेल्या तिमाहीत 14% पर्यंत घसरला आहे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. परिणामी NTC ओरिजीनेशनचा वाटा सप्टेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीतील 12% वरुन सप्टेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीतील 10% पर्यंत कमी झाला आहे.

 

 

तक्ता 3: नवीन कर्ज घेणाऱ्या ओरिजीनेशनचे प्रमाण

जुलै-सप्टेंबर 2022
जुलै-सप्टेंबर 2023
वार्षिक बदल

NTC व्यवहारांची संख्या (दशलक्ष)
10.39
10.03
-3%

ओरिजीनेशनच्या प्रमाणातील हिस्सा
12%
10%
-2%

भारताच्या सतत बदलत्या लोकसंख्येमध्ये तरुण, महिला तसेच निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांचा समावेश होतो. या गटातून प्रथमच कर्ज घेणाऱ्यांचा मोठा वाटा बनतो. नव्याने कर्ज घेणाऱ्यांच्या ओरिजीनेशन प्रमाणा मधील घट या ग्राहक विभागांच्या विकासासाठी हानिकारक आहे. तरुण कर्जदार, महिला आणि ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी कर्जाच्या संधींमध्ये वाढ होण्याचा थेट संबंध देशाच्या आर्थिक इंजिनचे चालक असलेल्या या ग्राहकांच्या जीवनमानात सुधारणा आणि आर्थिक सक्षमीकरणाशी आहे.

वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डवरील चुकवेगिरी किरकोळ कमी झाली तर बहुतांश उत्पादनांमध्ये क्रेडिट कामगिरी सुधारत राहिली

क्रेडिट कार्ड्स आणि वैयक्तिक कर्जांमधील किरकोळ बिघाड वगळता एकूणच शिल्लक स्तरावरील गंभीर चुकवेगिरीत (90 दिवस किंवा त्याहून अधिक मागील देय म्हणून मोजले गेले) विविध उत्पादन श्रेणींमध्ये सुधारणा होत राहिली. ही सुधारणा ग्राहक कामगिरीसाठी CMI निर्देशकामध्ये दिसून आली. सप्टेंबर 2022 मध्ये 90 वरून 11 अंकांनी वाढून सप्टेंबर 2023 मध्ये 101 वर गेली.

तक्ता 3: कर्ज परतफेडीच्या कामगिरीत वार्षिक सुधारणा**
उत्पादन
जुलै-सप्टेंबर 2023

वार्षिक बदल (bps)

गृहकर्ज
1.01%
-20

LAP
1.93%
-83

ऑटो कर्ज
0.64%
-19

दुचाकी कर्ज
2.12%
-28

वैयक्तिक कर्ज
0.87%
10

क्रेडिट कार्ड
1.68%
23

ग्राहकोपयोगी कर्जे
1.11%
-56

ARCs वगळता *बॅलन्स लेव्हल चुकवेगिरी

वैयक्तिक कर्जाच्या थकबाकीमध्ये वार्षिक 27% वाढ असूनही, रिटेल क्रेडिट पोर्टफोलिओमधील या कर्जांचा एकूण हिस्सा 20 bps ने वाढला आहे.

“उदयोन्मुख तरुण ग्राहक, प्रथमच कर्ज घेणारे ग्राहक तसेच ग्रामीण आणि निमशहरी ग्राहकांमध्ये होत असलेल्या वाढीसह भारताच्या क्रेडिट क्षेत्रातील वाढीच्या संधी विपुल आहेत. या संधींचा फायदा घेण्यासाठी, कर्जदारांनी पात्र ग्राहकांना ओळखले पाहिजे आणि क्रेडिटसाठी प्रवेश वाढवला पाहिजे,” असे श्री कुमार म्हणाले. “त्याच वेळी वित्त पुरवठादारांनी सतत क्रेडिट वाढ आणि नफा वाढवण्यासाठी मजबूत अंडररायटिंग पद्धतींवर आणि ग्राहकांच्या वर्तनाचे नियमित आणि सूक्ष्म निरीक्षण यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.”

 

# समाप्त
* ट्रान्सयुनियन सीबील क्रेडिट मार्केट इंडिकेटर (CMI) हा स्थिर निर्देशांक नाही; त्यामुळे त्याची पातळी क्रेडिट आरोग्याचे सूचक नाही. सीएमआय क्रमांक हा वेगळा, स्वतंत्र न बघता मागील कालावधीच्या संबंधात पाहिला जाणे आवश्यक आहे. आधीच्या कालावधीच्या तुलनेत कमी CMI क्रमांक सापेक्ष क्रेडिट आरोग्यामध्ये घट दर्शवते, तर जास्त संख्या सुधारणा दर्शवते.

About TransUnion CIBIL
India’s pioneer information and insights company, TransUnion CIBIL, makes trust possible by ensuring each person is reliably represented in the marketplace. We do this by providing an actionable view of consumers, stewarded with care.
Through our acquisitions and technology investments we have developed innovative solutions that extend beyond our strong foundation in core credit into areas such as marketing, fraud, risk and advanced analytics. As a result, consumers and businesses can transact with confidence and achieve great things. We call this Information for Good® — and it leads to economic opportunity, great experiences and personal empowerment for millions of people around the world.
We serve the financial sector as well as MSMEs, corporate and individual consumers. Our customers in India include banks, financial institutions, NBFCs, housing finance companies, microfinance companies and insurance firms.

For more information visit www.transunioncibil.com

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें