*_
दिनांक : 10.02.2024
_*हिंदु जनजागृती समितीची शासकीय अधिकारी आणि विद्यालयांचे व्यवस्थापन यांच्याकडे मागणी*_
*‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी !*
पणजी, 10 फेब्रुवारी – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने म्हापसा, काणकोण, चोडण, शिवोली, डिचोली, आदी ठिकाणी शासकीय अधिकारी, तसेच विविध विद्यालयांचे व्यवस्थापन यांच्या भेटी घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही वर्षांत 14 फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा करण्याची पाश्चात्त्यांची कुप्रथा सर्वत्र रुढ झाली आहे. पाश्चात्त्यांनी व्यावसायिक लाभासाठी प्रेमाच्या नावाखाली मांडलेल्या या विकृत संकल्पनेमुळे युवा पिढी भोगवाद अन् अनैतिकता यांच्या गर्तेत ओढली जात आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर प्रेमाचे बीभत्स सादरीकरण करत हल्ली एकतर्फी प्रेमातून मुलींची छेडछाड आणि हिंसक कृत्ये घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या दिवशी संतती प्रतिबंधक साधनांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होते, हे या दिवशी होणार्या अनैतिक संबंधांतील वृद्धी दर्शवते. तसेच काही धर्मांध युवक हे युवतींना खोटी नावे सांगून त्यांना ‘लव्ह जिहाद’चा बळी बनवतात. महाविद्यालयांत ‘व्हॅलेंटाईन डे’चे दुष्परिणाम, तसेच भारतीय संस्कृतीची महती सांगणार्या व्याख्यानाचे आयोजन करणे, महाविद्यालयात ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा करण्यास अनुमती न देणे आणि या दिवशी गैरप्रकार आढळल्यास त्वरित कारवाई करणे, अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
आपला नम्र,
*डॉ. मनोज सोलंकी, राज्य समन्वयक,*
हिंदु जनजागृती समिती, (संपर्क क्रमांक : 9326103278)