लॅपटॉप, आयफोन आणि ४० हजार रुपयांच्या रोख रकमेसह आणखी एका मोबाइलची चोरी केल्याप्रकरणी कँडोलीम येथील गेस्टहाऊसच्या रिसेप्शनिस्टला कळंगुट पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा अटक केली

.

कळंगुट : लॅपटॉप, आयफोन आणि ४० हजार रुपयांच्या रोख रकमेसह आणखी एका मोबाइलची चोरी केल्याप्रकरणी कँडोलीम येथील गेस्टहाऊसच्या रिसेप्शनिस्टला कळंगुट पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी उशिरा अटक केली.
13 जानेवारी रोजी चोरीची ही घटना घडली होती, याप्रकरणी रेणुका इन गेस्ट हाऊसचा चालक मनोज राजपूत यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. संशयित आरोपी हा गेस्ट हाऊसमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होता. याचा फायदा घेत संशयिताने रिसेप्शनमधून 40 हजारांची रोकड, लॅपटॉप, आयफोन मोबाईल आणि रियलमी मोबाईल असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला .अमित झा 13 जानेवारीपासून गुन्हा करून फरार होता आणि कळंगुट येथे जोरदार शोध घेतल्यानंतर तो फरार होता. अखेर त्याला हिमाचल प्रदेश येथे अटक करण्यात पोलिसांना यश आले असून आरोपीला नंतर न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें