*श्री विजयादुर्गा मंदिर संवर्धन समितीची शासनाकडे मागणी*_

.

 

दिनांक : १५.२.२०२२४

_*श्री विजयादुर्गा मंदिर संवर्धन समितीची शासनाकडे मागणी*_

*‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी १८ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या ‘वॉकिंग पिलग्रीमेज’ला अनुमती देऊ नका !*

पणजी, १५ फेब्रुवारी – गोव्याच्या पुरातत्व खात्याने घोषित केलेल्या ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी ‘आर्चडायोसीस ऑफ गोवा अँड दमण’ यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी ‘वॉकिंग पिलग्रीमेज’चे आयोजन केल्याचे घोषित केले आहे. शासनाने या ‘वॉकिंग पिलग्रीमेज’ला अनुमती देऊ नये, अशी मागणी श्री विजयादुर्गा मंदिर संवर्धन समितीने येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला सर्वश्री नितीन फळदेसाई, जयेश थळी, संदीप पाळणी, विनोद वारखंडकर, गोविंद चोडणकर, गणेश गावडे आणि सौ. शुभा सावंत यांची उपस्थिती होती.
पत्रकार परिषदेला श्री. जयेश थळी म्हणाले,‘‘ मुरगाव नियोजन आणि विकास प्राधिकरण आणि पुरातत्व खाते यांच्या अधिकार्‍यांनी २७ डिसेंबर २०२३ या दिवशी सकाळी ११ वाजता वारसा स्थळी या ठिकाणी संयुक्त सर्वेक्षण केले. संयुक्त सर्वेक्षण अहवालातून पुढील नियमबाह्य गोष्टी या ठिकाणी आढळल्या आहेत. पुरातत्व खात्याने अनुमती न घेतात ‘क्रेन’च्या साहाय्याने मंडप उभारणे, वारसा स्थळाच्या १ मिटर अंतरावर भूमी खणून खांब उभारून मंडपाचे बांधकाम करणे, वारसा स्थळाच्या प्रवेशाच्या मार्गावर लोखंडी पाईपवर १८ झेंडे उभारणे, ७ लोखंडी क्रॉस आणि १ मोठी लोखंडी क्रॅॅासची उभारणी करणे, ‘सर्व्हे प्लॉन’मध्ये अस्तित्वात नसलेले एक बांधकाम वारसा स्थळाच्या १५ मिटर अंतरावर दिसणे, वारसा स्थळी पाण्यासाठी टाक्या बसवणे, सुरक्षारक्षकांसाठी खोलीची व्यवस्था करणे आणि चॅपलच्या वळी प्रवेशद्वार उभारणे आदी नियमबाह्य गोष्टी आढळल्या आहेत. सरकारच्या खात्यांच्या सर्वेक्षणातूनच या ठिकाणी नियमबाह्यरीत्या गोष्टी करण्यात येऊनही दोषींवर कारवाई करण्याऐवजी सरकारच्या विविध खात्यांच्या सहकार्याने या ठिकाणी ७ ते १६ जानेवारी २०२४ या कालावधीत ‘फेस्ता’चे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. पुरातत्व खात्याने यापूर्वी वारसा स्थळी ‘फेस्त’ सारख्या कार्यक्रमांना अनुमती देता येणार नाही, असे अधिकृतपणे सांगितले आहे.’’ श्री. नितीन फळदेसाई म्हणाले,‘‘‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळाचे नियमानुसार संवर्धन व्हावे यासाठी वेळोवेळी गोवा सरकारचे पुरातत्व खाते, प्रशासन, पोलीस आदी यंत्रणांकडे आंदोलनाच्या माध्यमातून निवेदन देऊन अनेक वेळा मागण्या करण्यात आल्या आहेत; मात्र आतापर्यंतच्या अनुभवानुसार सरकारी यंत्रणा ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळाच्या नियमानुसार संवर्धन करण्यासाठी एकतर्फीच निर्णय घेत आहे, असे खेदाने म्हणावे लागत आहे. सरकारी यंत्रणा आता तरी या प्रकरणी सर्व बाजूंनी विचारविनियम करून कोणत्याही दबावाला बळी न पडता अपेक्षित न्याय द्यावा. यावर त्वरित तोडगा न काढल्यास याठिकाणी अयोध्येतील श्रीराम मंदिराप्रमाणे संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याविषयी आवश्यकात भासल्यास न्यायालयीन लढा देण्यासाठी समिती कटीबद्ध आहे.’’

आपले विश्वासू,
*श्री विजयादुर्गा मंदिर संवर्धन समिती*

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें