इस्लामिक देशात हिंदु मंदिराची उभारणी होणे, ही वैश्विक हिंदु राष्ट्र निर्मितीची नांदी ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था

.
इस्लामिक देशात हिंदु मंदिराची उभारणी होणे, ही वैश्विक हिंदु राष्ट्र निर्मितीची नांदी ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा   सिंगबाळ, सनातन संस्था
अबू धाबी – भारतात नुकतेच अयोद्धेत श्रीराम मंदिराची निर्मिती झाली आणि रामललाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना भव्य सोहळा अखिल विश्वाने अनुभवलाआता यु..सारख्या इस्लामिक देशातही भव्य अशा बी..पी.एस्मंदिराची उभारणी झाली आहेही एकप्रकारे वैश्विक हिंदु राष्ट्राच्या निर्मितीची नांदी आहेतअसे प्रतिपादन श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केलेअबू धाबी येथील मंदिर उद्घाटन कार्यक्रमानंतर त्या बोलत होत्या.

या वेळी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या म्हणाल्या कीमागील काही शतकांमध्ये भारतातील हिंदु मंदिरांवर आक्रमणे झालीमंदिरे नष्टभष्ट करण्यात आलीआता भारतातील अशा वास्तू पुन्हा कायदेशीर मार्गांनी लढा देऊन हिंदु समाजाला मिळू लागल्या आहेतत्या ठिकाणी मंदिरे उभी रहात आहेतइतकेच कायआता इस्लामी देशांत हिंदु मंदिरांची उभारणी होऊ लागली आहेहिंदु धर्माची महानता ही काळानुसार विश्वभरात पसरत चालली आहेहे कालचक्र आहेते कोणी रोखू शकत नाहीभारत हा विश्वगुरुपदाकडे वाटचाल करत असल्याचेच हे द्योतक आहे.

       पश्चिम आशियातील सर्वांत मोठे हिंदु मंदिर असलेल्या ‘बी..पी.एस्हिंदु मंदिरा’चे उद्घाटन १४ फेब्रुवारी या दिवशी भारताचे पंतप्रधान मानरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेयानिमित्ताने मंदिराच्या वतीने १५ फेब्रुवारी या दिवशी आयोजित ‘हार्मनी’ या कार्यक्रमाला सनातन संस्थेच्या वतीने सच्चिदानंद परब्रह्म डॉआठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभलीमंदिराचे पदाधिकारी श्रीरवींद्र कदम यांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये मंदिराच्या वतीने उद्घाटन समारंभाचे निमंत्रण पाठवले होतेमंदिराचे प्रमुख महंत स्वामी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडलाया कार्यक्रमाला हरिद्वार येथील आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद ‘प्रमुख पाहुणे’ म्हणून उपस्थित होतेस्वामी ब्रह्मविहारीदास महाराज यांनी स्वागतपर भाषण केले.

सनातन संस्थेच्या ३ गुरूंच्या नावे मंदिराच्या बांधकामासाठी ३ विटा अर्पण !

      जुलै २०२२ मध्ये श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या संशोधनाच्या निमित्ताने संयुक्त अरब अमिरातच्या दौर्‍यावर होत्यात्या वेळी त्यांनी ‘बी..पी.एस्हिंदु मंदिरा’ला भेट देऊन बांधकामाची पहाणी केली होती आणि सनातन संस्थेच्या ३ गुरूंच्या नावाने (सच्चिदानंद परब्रह्म डॉआठवलेश्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या नावेमंदिराच्या बांधकामासाठी ३ विटा पूजन करून अर्पण केल्या होत्या


आपला नम्र,
श्री. चेतन राजहंस,
राष्ट्रीय प्रवक्ता, सनातन संस्था,
संपर्क क्र.: ७७७५८५८३८७
——————————
PHOTO CAPTION

छायाचित्र ओळ !

1.  BAPS_C – यू.ए.ई. मधील अबुधाबी येथील बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिर !

2.  Vita_Poojan_Abu_dhabi – अबुधाबी येथील बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरासाठी तीन विटांची पूजा करतांना (वर्ष २०२३) सनातन संस्थेच्या उत्तराधिकारीपैकी एक श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

3.  Shri_SatShakti_Shri_ChitShakti_BAPS_Abhishek_in_AbuDhabi – भगवान स्वामीनारायण यांना अभिषेक घालतांना डावीकडून सनातन संस्थेच्या उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

4.  Swami Narayan Darshan_AbuDhabi – अबुधाबी येथील बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरातील श्रीराम आणि माता सीता यांचे दर्शन घेतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें