क्रिएटिव कम्युनिटी ऑफ गोवाच्या “फर्स्ट फ्रायडेज” बैठकीचे सर्जनशील व्यक्तींना निमंत्रण

.

क्रिएटिव कम्युनिटी ऑफ गोवाच्या “फर्स्ट फ्रायडेज” बैठकीचे सर्जनशील व्यक्तींना निमंत्रण

पणजी, २६ फेब्रुवारी २०२४: एसआयटीपीसी, माहिती तंत्रज्ञान विभाग, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन्स आणि एडीआय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने द क्रिएटिव कम्युनिटी ऑफ गोवा (CCG)हा डिझायनर्सचा समुदाय आयोजित करत असलेली “फर्स्ट फ्रायडेज” नावाची तिसरी मासिक बैठक शुक्रवार,1 मार्च 2024 रोजी मेफेअर हॉटेलच्या तळमजल्यावर, महालक्ष्मी मंदिराजवळ, पणजी येथे होणार आहे.

गोव्यातील क्रिएटिव्ह समुदाय एकत्र येऊन सर्जनशील चर्चा व्हावी, एकमेकांमध्ये सहकार्याची भावना जोपासली जावी, नाविन्यपूर्ण विचारसरणीचे वातावरण वृद्धिंगत करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करण्याचे फर्स्ट फ्रायडेज आश्वासन देतो.

लोकांना डिझाइन धोरणाची चर्चा करण्यात लोकांना गुंतवून ठेवण्यावर या बैठकीचा भर असेल. गोव्यासाठी डिझाइन धोरण तयार करून गोव्यातील समुदायाच्या भविष्याला आकार देण्यासाठी संभाव्य मार्ग शोधणे हा या चर्चेचा उद्देश आहे. गोव्याच्या सर्जनशील पटलावर सकारात्मक परिणाम करू शकणाऱ्या आधुनिक विचारसरणीच्या डिझाइन धोरणासाठी बैठकीमध्ये सहभागी होणाऱ्या डिझायनर्सना त्यांचे विचार मांडण्याची आणि कल्पनांचे योगदान देण्याची ही एक उत्तम संधी आहे.

बैठकीच्या अजेंडाचा एक भाग म्हणून, क्रिएटिव्ह कम्युनिटी ऑफ गोवा (CCG)च्या नवीन संकेतस्थळाचे प्रात्यक्षिक देखील सादर केले जाईल. ही एक कार्यप्रक्रिया आहे. सहभागींना त्यांची मते व्यक्त करण्याची, व्यासपीठासोबत परिचित होण्याची, स्वतःचे नेटवर्क वाढविण्याची आणि प्रदेशातील सर्जनशील कलाकारांमध्ये सहयोग करण्याची संधी प्रदान करेल. गोव्याच्या सर्जनशील समुदायामध्ये विकास वाढवण्यासाठी आणि सहयोग सक्षम करण्यासाठी क्रिएटिव्ह कम्युनिटी ऑफ गोवा (CCG)च्या संकेतस्थळाची कल्पना एक प्रमुख स्त्रोत म्हणून करण्यात आली आहे.

फर्स्ट फ्रायडेच्या दुसऱ्या आवृत्तीने शालेय अभ्यासक्रमात डिझाइन शिक्षणाचा समावेश करण्याचे महत्त्व, सुरू असलेल्या उपक्रमांची आवश्यकता, डिझाईन समुदायाला समर्पित ग्रंथालय किंवा प्रयोगशाळांची स्थापना, आदिवासी समुदायाला डिझाइन स्पेसमध्ये एकत्रित आणण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचणे अशा विविध धोरणां संबंधित विषयांवर भर दिला. सर्जनशील समुदाय (क्रिएटिव कम्यूनिटी) म्हणून, गोव्याला भारताची सर्जनशील राजधानी अर्थात डिझाईन कॅपिटल म्हणून स्थापित करण्याच्या या सामूहिक प्रयत्नात सहभागी होण्यासाठी आम्ही सर्वांना आमंत्रित करतो. गोव्यातील किंवा गोव्यात संधी शोधणाऱ्या सर्व सर्जनशील कलाकारांना समर्थन देणारे धोरण विकसित करण्यासाठी आपण सहकार्य करूया.

ही संधी गमावू नका, नोंदणी करण्यासाठी आमच्याशी +91 99705 62945 या क्रमांकावर संपर्क साधा. गोव्याच्या डिझाइन पटलास पुन्हा आकार देण्याची क्षमता असलेल्या चर्चेचा भाग व्हा.

***

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar