आयटीबी बर्लिन 2024 मध्ये गोवा पर्यटन विभागाने केले शाश्वत पर्यटन उपक्रमांचे प्रदर्शन*

.

*आयटीबी बर्लिन 2024 मध्ये गोवा पर्यटन विभागाने केले शाश्वत पर्यटन उपक्रमांचे प्रदर्शन*

*गोवा, 12 मार्च 2024* – आयटीबी बर्लिन 2024 मधील गोवा पर्यटन पॅव्हेलियनने राज्याच्या सांस्कृतिक विविधतेचे प्रदर्शन करून अभ्यागतांना मंत्रमुग्ध केले. पुनर्संचयित पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये अंतर्भूत असलेल्या प्रदर्शनापासून ते एकादश तीर्थावरील मनमोहक सादरीकरणापर्यंत, सेंट फ्रान्सिस झेवियरचे वैशिष्ट्य असलेले, दर दहा वर्षांनी एकदा होणारे एक प्रदर्शन असे सारे घटक गोवा पर्यटनाच्या दालनात प्रदर्शित झाले होते.

गोवा पर्यटनाच्या दालनात हॉटेल उद्योजक, सहल आयोजक आणि विमान वाहतूक उद्योगातील भागधारकांच्या व्यावसायिक बैठका पार पडल्या. गोव्याचे पर्यटन अधिकारी आणि प्रमुख भागधारक यांच्याशी थेट संपर्क साधून, अभ्यागतांना पर्यटन आणि परस्पर विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने भागीदारीच्या वाटा शोधण्याची संधी मिळाली. या सहयोगी भावनेने गोव्यातील पर्यटन उद्योगाचे शाश्वत विकास आणि जागतिक भागीदारांसोबत अर्थपूर्ण संबंध वाढविण्याच्या दिशेने केलेले समर्पण अधोरेखित केले.

आयटीबी बर्लिन 2024 मध्ये उपस्थित असलेल्या अधिकृत शिष्टमंडळात गोवा पर्यटन आणि माहिती आणि तंत्रज्ञान सचिव श्री संजीव आहुजा, आयएएस, गोवा पर्यटन विभागाचे सहाय्यक संचालक श्री. जयेश काणकोणकर, आणि गोवा पर्यटन विकास महामंडळाचे विपणन व्यवस्थापक श्री प्रसाद कवळेकर आदींचा समावेश होता.

*या कार्यक्रमाविषयी पर्यटन सचिव श्री संजीव आहुजा यांनी सांगितले की,”आयटीबी बर्लिन 2024 मध्ये सहभागी होणे आनंददायी अनुभव होता कारण आम्ही गोव्याचे अंतरंग जागतिक प्रेक्षकांसमोर उलगडले आहे. गोव्याच्या समृद्ध, सांस्कृतिक आणि पर्यावरणीय वारशाचे रक्षण करताना, समृद्ध करणारे अनुभव प्रदर्शित करण्याच्या आमच्या प्रयत्नावर आम्ही दृढ आहोत.”*

आयटीबी बर्लिन येथे झालेल्या प्रदर्शनात, गोवा पर्यटनाने दी पॅसिफिक एरिया ट्रॅव्हल रायटर्स असोसिएशन अर्थात `पटवा’ (PATWA)कडून कौतुकाची पावती मिळवली, प्रतिष्ठित “डेस्टिनेशन ऑफ द इयर” हा मानाचा पुरस्कार जिंकला. या पुरस्कारामुळे गोवा एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून त्याचे स्थान अधोरेखित करते. या समारंभात पर्यटन मंत्र्यांना मानाचा समजला जाणारा “टुरिझम मिनिस्टर ऑफ द इयर” पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार म्हणजे पर्यटन मंत्र्यांचे अनुकरणीय नेतृत्व आणि गोव्याला प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून स्थान देण्याच्या कटीबद्धतेचा दाखला आहे.

आयटीबी बर्लिन 2024 मधील गोवा पर्यटन पॅव्हेलियनच्या यशाने जागतिक स्तरावर सांस्कृतिक विविधता आणि शाश्वत पर्यटन पद्धतींना समर्पित, एक अग्रगण्य पर्यटन स्थळ म्हणून गोव्याने आपला ठसा उमटवला. नाविन्यपूर्ण प्रदर्शन, मोहक सादरीकरण आणि सहयोगी उपक्रमांद्वारे, पॅव्हेलियनने गोव्याचे विशिष्ट आकर्षण अव्याहतपणे प्रदर्शित केले. प्रेक्षकांवर अमिट छाप सोडली आणि भविष्यासाठी आश्वासक अशी भागीदारी वाढवली.

***

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें