पणजी: गुरगांव -हरियाणा येथिल सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशनने गेल्या नोव्हेंबर महिन्यात आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय गणित ऑलिम्पियाड परिक्षेत पीपल्स हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रादेशिक तसेच शालेय स्तरावर घवघवीत यश संपादन केले आहे.
या परिक्षेत इयत्ता नववीच्या अस्मी वाडजी हिने ‘ मेडल ऑफ डिस्टींक्शन ‘ प्राप्त केले असून अन्य विद्यार्थ्यांनी ‘ मेडल ऑफ एक्सलन्स ‘ पटकावले आहे. यात बाबूल वेळीप, गंगा उर्फ किमया खंवटे, रिफा शेख, प्राची शामेन , पी. तरुण , कीर्तीराज पै रायकर , तेजस कुबल , आरव वेलुसकर , नव्या केसरकर , शैवी कामत , धन्या के. एम , आयशा करजगी , प्रक्रती शामेन व ऋषिकेश प्रभु गांवकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका मरिलीया एस्टीव्हज , शाळा प्रभारी स्वाती कंटक , ऑलिम्पियाड समन्वयक विजयसिंह आजगांवकर , शाळा व्यवस्थापन , शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक -शिक्षक संघाने अभिनंदन केले आहे.