‘ युवा मास्टरस्ट्रोक ‘ चित्रकला स्पर्धेत पीपल्स हायस्कुलचे यश
—————————————
पणजी : नवनीत एज्यूकेशनच्या ‘युवा स्टेशनरी ‘ तर्फे आयोजित अखिल भारतीय ‘ युवा मास्टरस्ट्रोक ‘ चित्रकला स्पर्धेत गोवा राज्यात पणजीच्या पीपल्स हायस्कूलच्या शान्वी निलेश महाले हिने ‘ क’ गटात तर तनिशा संतोष गावडे हिने ‘ब’ गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
‘युवा’तर्फे चालु शैक्षणिक वर्षी ही चित्रकला स्पर्धा संपूर्ण भारतात एकूण २२ राज्यांत आयोजित करण्यात आली होती. त्यात एकूण ५२५१ शाळांमधील १३.६ लाख विद्यार्थी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तर महाराष्ट्र व गोवा राज्यांमधून एकूण ३७ जिल्ह्यांमध्ये ही चित्रकला स्पर्धा ‘अ’ , ‘ ब’, व ‘ क’ अशा तीन गटांत आयोजित करण्यात आली होती .
गोवा राज्यात शान्वी महाले हिने ‘क’ गटात तर तनिशा गावडे हिने ‘ब’ गटात प्रथम क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थिनींना चित्रकला शिक्षक निलेश महाले यांचे मार्गदर्शन लाभले.