म्हापसा येथे मोफत गणपती अथर्वशीर्ष प्रशिक्षण शिबीर*
थिवि वाताहार
वेद व ध्यान साधना गोवा म्हापसा विभागामार्फत दिनांक १० एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान गणपती अथर्वशीर्ष वैदिक पद्धतीने प्रशिक्षण आयोजित केले आहे अशी माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली.
संस्थेचे संस्थापक वेदगुरू श्री प्रसाद देशमुख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली वेद व ध्यान साधना गोवा म्हापसा विभागामार्फत दिनांक १० एप्रिल ते १९ एप्रिल दरम्यान श्री.विठ्ठल रखुमाई देवस्थान,
विठ्ठलवाडी, अन्साभाट, म्हापसा येथे संध्याकाळी ६ ३० ते .७.४५ दरम्यान शिबीर आयोजित केले आहे.
हे शिबीर ८ वर्षावरील विध्यार्थी तसेच साधकांसाठी आहे, ह्या शिबिरामध्ये वैदिक पदतीने वेद मंत्रांचा उच्चार अर्थासहित शिकविला जाणार असून भारतीय संस्कृतीचे वेदांमधील मूळ तत्वे शिकण्याचा लाभ प्रशिक्षणार्थीना मिळणार आहे.
ह्या ९ दिवसीय शिबिरामध्ये अथर्ववेदामधील गणपती अथर्वशीर्ष, ओमकार पठन, दैनंदिन श्लोक तसेच प्रार्थनाचे प्रशिक्षण व मंत्र ध्यान शिकविले जाणार आहे, ज्यामधून एकाग्रता, स्मरशक्ती, भारतीय संस्कृतीची जाण तसेच अध्यात्मिक शक्ती मध्ये वाढ होण्यास मदत होऊ शकते.
ह्या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच साधनकानी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे सेवादल विलास पिळणकर, जयेश फलारी,दिलीप महाले व भारत बेतकीकर ह्यांनी केले आहे.
ह्या शिबिरासाठी नोंदणी करण्यासाठी ९११२८०११३६, ७०३८२५००३९ ह्या क्रमांकावर संपर्क करावा.