विज्ञान शिबीर  सुश्रुत विज्ञान अकादमीने ५ ते ७ एप्रिल २०२४ या दिवसांत ८वी ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शांता विद्यालय शिवोलीं येथे ३ दिवसीय पूर्ण वेळ निवासी विज्ञान शिबीराचे आयोजन केले होते .

.

विज्ञान शिबीर
सुश्रुत विज्ञान अकादमीने ५ ते ७ एप्रिल २०२४ या दिवसांत ८वी ९ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शांता विद्यालय शिवोलीं येथे ३ दिवसीय पूर्ण वेळ निवासी विज्ञान शिबीराचे आयोजन केले होते .
ह्या शिबीरात १८ शाळेतील ८१ विद्यार्थी व १८ शिक्षकांनी भाग घेतला होता . ह्या ३ दिवसांच्या शिबीरात १४ साधन संपन्न निष्णात व्यक्तींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गणित , अनुभवात्मक विज्ञान, करिअर मार्गदर्शन , महासागर विज्ञान, कृत्रिम बुद्धीमता, हसत खेळत विज्ञान, विज्ञान प्रश्नमंजुषा, योग, शारीरिक शिक्षण ह्या विषयांवर वेगवेगळे सत्र आयोजित केले. भारतीय गणितज्ञ श्रिनीवासा रामानुजन यांच्यावरील बायोपीक चित्रपटहि दाखविण्यात आला. काहि शाळांतील मुलांनी करुन आणलेल्या विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन भरवून भाग घेतलेल्या मुलांना बक्षीस देउन गौरवण्यात आले.
विज्ञान शिबीराचे उद्घाटन गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री महेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाबाबत सल्ला दिला.
शिबीराचा समारोप आश्रयदाते व सुप्रसिद्ध शिक्षणतज्ञ श्री दिलीप बेतकेकर यांच्या नैतिक धड्याने झाला.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या संघामधील १५ सदस्य आणी ११ विद्यार्थी स्वयंसेवकांनी अथक परीश्रम घेतले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar